मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
सद्‌गुरु स्वरूप

वेदांत काव्यलहरी - सद्‌गुरु स्वरूप

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


सद्नुरुस्वरूप न कळे, किंवा त्याचें महात्म्य सर्वांना ॥
आपण जसें तसेंची, गुरुचें रूपासि पाहतो जाणा ॥१॥
शिव भजतांच नये, शिव आपणचि जाहल्याविणें पूर्ण ॥
तैसा सद्रुरु न कळे, आपण गुरुरूप जाल्यावीण ॥२॥
गुरु, हरिहर, विधि सम तो, कोणा साक्षात ब्रम्हची दिसतो ॥
याचें कारण, गुरुसी बघणाराही तसाच तो बनतो ॥३॥
हर तामस, विधि राजस, हरि सात्विक, ब्रम्ह त्रिगुणविरहीत ॥
याच गुणें हर, विधि, हरि, ब्रम्ह बनोनी गुरूकडे बधता ॥४॥
हर गुरूकाया भजतो, विधि गुरुवाचेसि देतसे मान ॥
हरि गुरूमनास भजतो, ब्रम्ह स्वयें तो गुरूच कीं जाण ॥५॥
यापरि गुरुचे असती भक्त चतुर्विध, जगांत साचार ॥
बद्ध, मुमुक्षू, साधक, सिद्ध अनुक्रमें प्रकार हे चार ॥६॥
बद्ध, मुमुक्षू,  साधक धरिती अभिमान नामरूपाचा ॥
“माझा गुरू तुझा गुरू,” ऐसा हा वाद चालतो त्यांचा ॥७॥
गुरु मरतां हें रडती तीघेजण, धरुनि स्थूल अभिमान ॥
परमार्थ बुडे यांचा, कारण नाहीं तया स्वरुपज्ञान ॥८॥
“अभिमानाविण न चले” परमार्थंहि, स्वार्थ सांग मग कैसा ॥
परि अभिमान प्रयोजक असणें, नसणेंच मूळरूप ठसा ॥९॥
मुलगा शेजार्‍याचा मरतां येई रडें, प्रयोजक हें ॥
अपुला मरतां रडतो अभिमानें, मूळरूप त्याचें हें ॥१०॥
रडतो बद्ध, रडाया येई मुक्तास, हा फरक मोठा ॥
अंत:करणाचा तो धर्म, अहंकार तो परी खोटा ॥११॥
यास्तव गुरुबोधानें झालें गुरुरूप त्यांस शोक नसे ॥
अभिमान नामरूपीं वेठ बिगारी जशी, तसाच असे ॥१२॥
सिद्धांस कळे सद्रुरु, त्याचें माहात्म्य, इतर अज्ञान ॥
गुरुचें महात्म्य वर्णिति, पोथ्या अथवा पुराण वाचून ॥१३॥
वंध्येस कळे कैसी प्रसुतीची वेदना, जरी वर्णी ॥
पुस्तक पाहुन, तैसें न कळे गुरुराज बोल बोलोनी ॥१४॥
ज्ञान्यांस ओळखावें ज्ञान्यानें, योगियांस योग्यानें ॥
ओळखणें सद्रुरुसी तैसा, जो गुरु स्वयं असें त्यानें ॥१५॥
चांभार भक्त गुरुचे, गुरु चर्माकार दिसतसे त्यांना ॥
ब्राह्मण भक्त गुरुचें, गुरु केवल ब्रह्म दिसतसे ज्यांना ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP