मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
आत्मज्ञानमहिमा

वेदांत काव्यलहरी - आत्मज्ञानमहिमा

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


पद --- (अर्ध तुनु वारुली)

विवेक वैराग्याची जोडी, फुटतां कामा नये ॥
नातरि साधका फसतो स्वयें ॥१॥
प्रपंच त्यागुनि वनीं राहिला, तीर्थें कीं हिडला ॥
व्यर्थ जंव आत्मा नच जाणला ॥२॥
जंव न गुरुमुखें प्रतिति बाणली जपतप साधन फुकें ॥
विरेना अज्ञानाचें धुकें ॥३॥
जटाभर पंचाग्नी अथवा धूम्र वायु भक्षणें ॥
फोल ज्ञानाविण हीं साधनें ॥४॥
त्रिपुटि खंडुनी अभेद सुख जो नाहीं त्या चाखिलें ॥
मिटेना तळमळ, तोंवरि सळे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 21, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP