TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
खोटी समजूत

वेदांत काव्यलहरी - खोटी समजूत

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


खोटी समजूत
समजुत बहु लोकांची, कष्टाविण तो हरी कसा भेटे ॥
दंडण, मुंडण करणें ॥ तीर्थ-व्रतादीक धालणें खेटे ॥१॥
कष्टेच हरी मिळतां, गर्दभ तो काय कष्ट करि थोडे ॥
कष्टाच्या मानानें, हरि जवळी येई, मानिति वेडे ॥२॥
हरि सह्जसुलभ आहे, जवळीं ह्रदयीं विचारवंताला ॥
बसल्या घरींच तेथें, कष्टाविण भेट देइ भक्ताला ॥३॥
कष्टाच्या मानानें व्यस्त पडें द्रव्य तें कसें पदरीं ॥
पाही विचार करुनि, मजुराला काय लाभते मजुरी ॥४॥
राबुनि बहुत बिगारी, पैसे चोवीस घेइ पदरांत ॥
गंवडी राबोनी कमी, घे रुपया दीड रोज हातांत ॥५॥
मिस्त्री मुळि नच राबे, नजरेनें मिळवि तीन रुपये तो ॥
रुपये सहस्र घेऊनि, इंजिनियर एक तो सही करतो ॥६॥
कष्ट कमी वेतन बहु, यांतिल तें काय जाणरे वर्म ॥
बुद्धीचें बळ जितुकें, स्थूल सुटें हातिचें बिकट कर्म ॥७॥
यापरि साधक असती चार; अधम, मध्य आणि उत्तम ते ॥
अधमाधमही असती, साधनही चार भिन्न त्या साजे ॥८॥
उत्तम सहजावस्था, मध्यम तो ध्यानधारणा करितो ॥
अधमासि मूर्तिपूजा, अधमाधम तीर्थ करित तो फिरतो ॥९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-04-16T10:34:52.6730000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

slurrying

  • न. गारा करणे 
RANDOM WORD

Did you know?

एका क्षणासाठी निमिष ही संज्ञा कशी प्राप्त झाली?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.