मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
खास पदे

वेदांत काव्यलहरी - खास पदे

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


श्रवणमहिमा
पद --- (राधे कृष्ण बोल)
श्रवण सुलभ थोर साधन ॥धृ०॥
चाल :--- विधिध साधनें लोकीं । जपदान व्रतादी आणखी ।
परि त्यांत कष्ट धोर ॥१॥
श्रवणींच आतुडे भक्ती । श्रवणेंच आयती मुक्ती ।
श्रवण एकसार ॥२॥
संदेह सर्वही निवळे । श्रवणेंच ज्ञानही प्रबळे ।
भवरोग करी पार ॥३॥
==
ज्ञानाशिवाय सर्व व्यर्थ
पद चाल --- [ही एक आस मनिं उरली कन्हैया]

जोंवरी ज्ञान नच, शीण तोंवरी, फोल सकल केले ॥धृ०॥
चाल :--- तीर्थ व्रतें तप दान । हरिपूजन जप वा ध्यान ।
काशीस देइ कां प्राण । तरि जनन मरण नच चुकले ॥१॥
अंधारनाश कैं होय । या एक प्रकाश उपाय ।
अज्ञान त्यापरी जाय । जरि एक कोण मी कळलें ॥२॥
==
आत्मप्रेम
पद १ --- [प्रीति जी दुज्यावरि०]

अभिमान आपणा आपुला । इतरावरि कुठुनि आला । उमज रे ॥
कुलरूप धनाचा बाळा । म्हणशी जरि भ्रम तो सगळा । उमज रे ॥
चाल :--- सुतगेह, अपुला देह, यावरी मोह, कुठवरी जडला ।
घात जों न अपुला झाला ॥१॥
इतुका प्रिय आत्मा असुनी । विषयीं पियता कां म्हणुनी । सांग रे ॥
कावीळ जाहली म्हणुनी । जग पीत पाहतो प्राणी । उमजे ॥
चाल --- हा रोग, जिवाचा भोग, तसा भवरोग ।
आत्मया जडला ॥ विक्षेप म्हणुनि हा झाला ॥२॥
पद २ --- [गाइये गणपति]
कांहिं न प्रिय आपणहुनि जगर्ती ।
प्रेम दिसे जरी इतरावरती ॥धृ०॥
चाल :--- वित्त असे प्रिय, पुत्र त्याहुनी ।
पुत्राहुनि निजपिंड घ्या मनीं ।
इंद्रिय प्रिय, प्रिय प्राण त्याहुनी ।
प्राणाहुनि आत्म्यावरि प्रीती ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : April 21, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP