TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
वेदविहित धर्म

वेदांत काव्यलहरी - वेदविहित धर्म

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


वेदविहित धर्म-ईश्वरोपासना
वेदविहित कर्माला धर्म असें नांव, सर्व शास्त्रांत ॥
वेदविहित म्हणजेची ज्ञानानें युक्त, स्पष्ट हा अर्थ ॥१॥
मग घटका दो घटका, संध्यास्नानादि कर्म तितुकाच ॥
“धर्म”; अशी आकुंचित संज्ञा म्हणतां नये कधीं साच ॥२॥
वेदविहित जें तेंची, ज्ञानसहित कर्म बुद्धि-पूर्वक जें ॥
पूर्ण विचाराअंतीं घडलें, तो धर्म म्हणुनिया साजे ॥३॥
दिनरात्र धर्म चाले, ज्ञान्याच्या सहज सर्व कर्मांत ॥
मग तो असो कुठेंहीं, कांहिं करो कर्म, धर्म ये त्यांत ॥४॥
ईश्वरपूजन, म्हणजे, ज्ञानाची ती उपासना शुद्ध ॥
कारण ईश्वरस्वरूपा, “प्रज्ञानं ब्रह्म” बोलती बुद्ध ॥५॥
ज्ञान्याचे आचरणी, धर्म असे सहज ईश्वरी पूजा ॥
अज्ञान्याचा धर्महि, ज्ञानावांचुनि अधर्मची समजा ॥६॥
कृत्रिम आंबा वाटे साचापरि, जों असेल अज्ञान ॥
आंबा म्हणतांहि स्फुरे लांकुड, त्याचें यथार्थ जों ज्ञान ॥७॥
ज्ञानोत्तर जग दिसतें, म्हणतो तैसें, परी प्रतित आत्मा ॥
मी जीव म्हणत असतां, ब्रह्मचि तो सर्वकाळ परमात्मा ॥८॥
आंबा लांकुड; तैसा जीवचि तो ब्रह्म; ज्ञान-अज्ञानीं ॥
वस्त्‌ कळो तुम्हासी न कळो, जैसें तसेंच पूर्णपणीं ॥९॥
कांहीं म्हणो, करो वा कर्मे, ज्ञान्यास ज्ञानची स्फुरतें ॥
म्हणणें, करणें दिसणें, सर्वहि आकार ज्ञानची धरितें ॥१०॥
ऐसें यथार्थ ज्याचें ज्ञान, खरा वेद-पुरुष तो जाणा ॥
सकलहि त्याचीं कर्में वेदविहित, निश्चयें खुशाल म्हणा ॥११॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-04-16T23:37:43.4500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

हर्की

  • स्त्री. १ वादांत ज्याचा जय होतो , त्यानें हर्ष झाल्याबद्दल सरकारांत द्यावयाचें द्रव्य ; नजर . कुंभार खरे झाले त्यांजपासून हरकी घेतली - वाडसभा ३ . २६५ . २ हरवलेली वस्तु आणून देणारास दिलेली बक्षिसी . ३ चांगली नोकरी केल्याबद्दल , एकदम , लाभ झाला असतां , एकाएकीं मित्रभेट झाली असतां , कोणतेहि आनंददायक कृत्य चालू असतां वाटावयाचें बक्षीस . [ सं . हर्ष ; म . हरख ] 
  • ०पत्र न. बक्षीसपत्र . 
  • ०शिरिणी शेरणी --- स्त्री . १ हरकी अर्थ १ पहा २ आनंदाचे प्रसंगीं वांटलेली मेवामिठाई . [ शेरणी = मिठाई ] 
RANDOM WORD

Did you know?

Are we transliterating everything? Do we copy that from some other websites?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.