मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
स्वधर्म

वेदांत काव्यलहरी - स्वधर्म

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


बरवें मरण स्वधर्मीं, धर्म भयावह कनिष्ठ परक्यांचा ॥
विगुण स्वधर्म जरी तो, कल्याणप्रद असे सुखद साचा ॥१॥
घृत सकस जलाहुनि परि, मीन जगे काय तो घृतामाजी ॥
ज्याचें जीवन त्याला श्रेष्ठ, स्वधर्मीं असा सदा राजी ॥२॥
धर्म कशास म्हणावें, तेंच प्रथम स्पष्ट पाहिजे कळलें ॥
धर्म यवन हिंदूचे नव्हती, कुल-जात धर्मही अपुलें ॥३॥
ज्यावांचुनि ज्याचें नच असणें, तो धर्म, समज रे त्याचा ॥
धर्म प्रकाश रविचा, दाहकता धर्म जाण अग्नीचा ॥४॥
संस्कार पूर्व जैसें, त्यापरि अपुला स्वभावही बनतो ॥
स्वाभाविक गुणकर्मालागीं, म्हणती स्वधर्म निश्चित तो ॥५॥
सात्विक राजस, तामस गुणभेदे, वर्ण चार कल्पियले ॥
द्विज, क्षत्रिय, वैश्य तसे शूद्र स्वभावामुळेंच ते झाले ॥६॥
द्विज, क्षत्रिय, वैश्याचा, शूद्राचा जो स्वभावधर्म असे ॥
तोच स्वधर्म तयाचा, आचरिता भय कुठेंच त्यास नसे ॥७॥
तामस स्वधर्म जरि तो शुद्राचा, मोक्ष त्यांतची त्याला ॥
आनंद त्याच कर्मीं, समरसता सहज प्राप्तकर्माला ॥८॥
ब्राह्मणकर्म जमेना शूद्राला, शूद्रकर्म विप्राला ॥
क्षत्रियकर्म जुळेना वैश्याला, विश्यकर्म वीराला ॥९॥
कोणाहुनि नच कोणी श्रेष्ठ, सकल श्रेष्ठ ते स्वधर्मांत ॥
एकाविण एकाचें जीवन दिसतें अपूर्ण जगतांत ॥१०॥
हे चार वर्ण मिळुनी, एकच तें अंग विश्वपुरुषाचें ॥
एकास दु:ख तेंची सर्वांना, श्रेष्ठता कुणा कैचें ॥११॥
अपुलेंच अंग पाही, तेथेंही चार वर्ण दिसतात ॥
मस्तक द्विज कर्म करी, क्षत्रिय कर्मास धांवती हात ॥१२॥
पोट करी वैश्याच कर्म, करी पाय कर्म शूद्राचें ॥
परि सांग कोण यांतुनि अधिक उणा, नीच कर्म कोणाचें ॥१३॥
हा स्थूल धर्म कथिला, “देहचि मी” यापरी म्हणे त्यांचा ॥
“मी देह नव्हे” म्हणती, ऐके त्यांचा स्वधर्म मुक्तीचा ॥१४॥
सकलहि धर्मामाजीं धर्म परम श्रेष्ठ सुखद, निजरूपीं ॥
असणें, स्वधर्म तोची, बाकीचें पाडिती विषयकूपीं ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 16, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP