TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
वस्तू

वेदांत काव्यलहरी - वस्तू

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


वस्तू असून न दिसण्याचें कारण
वस्तू अनुनी न दिसे, त्याला प्रतिबंध ते नऊ असतां ॥
दूर, निकट जरी वस्तू न दिसे, एकाग्र जरि मनोवस्था ॥१॥
दिल्लींत वस्तु आहे दूर, म्हणुनिया जशी दिसेना ती ॥
तैशीच दिसेना कीं काजळ, डोळ्यांत असुनि निकट अती ॥२॥
राजपथांतुनि वाजत गाजत गेली जरी मिरवणूक ॥
कार्यांत गर्क अपुल्या, त्यास दिसेना परी कुणी एक ॥३॥
इंद्रियघात जरी हो, किंवा अतिसूक्ष्म ती जरी वस्तू ॥
व्यवधान मधें येतां न दिसे, रवि आड ये जरी केतू ॥४॥
अभिभव म्हणजे जेथें मोठयामाजी लहान समावे ॥
जैसे सूर्यप्रकाशीं, यात्‍याचें तेज असुनि हरपावें ॥५॥
मिश्रण सजातियांचें, त्यास समानाभिहारची म्हणती ॥
मिसळुनि एकें ठायीं, ओळखितां काय वेगलें येती ॥६॥
संस्काररूप वस्तू जाण अनुद्भव, जसें दुधांत दही ॥
बीजांत वृक्ष असुनी न दिसे, प्रतिबंध हे नऊ पाही ॥७॥
तैसा ईश्वर असुनी न दिसे, प्रतिबंध त्यासही म्हणुनी ॥
प्रतिबंध दूर होतां, ईश्वर उघडाच तो जनीं विजनीं ॥८॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-04-17T20:56:58.9270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ustilago

  • पु. Bओत्. युस्टिलॅगो 
RANDOM WORD

Did you know?

मरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात? त्याचा प्रेताशी काय संबंध?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.