TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वेदान्त काव्यलहरी|
सर्वकर्म

वेदांत काव्यलहरी - सर्वकर्म

सदर ग्रंथाची किंमत होती - जो जी देईल ती.
सदर पुस्तकाबद्दल दैनिक सकाळ २६/०६/१९३८ चे अंकात अभिप्राय छापून आलेला आहे.


आत्मज्ञानंविना पार्थ सर्वकर्म निरर्थकं
आत्मज्ञानावीणें जें करणें सर्व शीण तो जाण ॥
अद्वैतग्रंथ त्याविण ग्रंथ इतर, देति ना समाधान ॥१॥
अद्वैतग्रंथ श्रवणें मननें, मलनाश चित्तविक्षेप ॥
फलयुक्त इतर पोथ्या शास्त्राचे श्रवण, तें असे पाप ॥२॥
वाचो गुरुलीलामृत, शनिमाहात्म्यास, सत्यदेव जरी ॥
पुजिला ब्राह्मण हस्तें, “मी चा शनिदेव बैसतोच उरी ॥३॥
“मी माझ्या मोहाचे जो मोहनभोग खाउनी धाला ॥
त्यानेंच सत्यदेवा पुजिलें, जाणेल तोच गुरुलीला ॥४॥
तीर्थ, व्रतें, गो, भू, तिलदानादिक धर्म कर्मही केलें ॥
बापी तडाग बांधी, धर्मालय अन्नछत्र स्थपियलें ॥५॥
हें पुण्य जन्ममृत्यूकारण, अभिमान दाटतो यांत ॥
हें पुण्य पापरूपी, हरिप्राप्ती आड येतसे खचित ॥६॥
नाना विचित्न साधन, सामर्ध्यें थोर मंत्र तंत्रविधी ॥
बहु श्रौत स्मार्त कर्मे, व्यर्थ भजोनीहि शंभु विष्णुविधी ॥७॥
अष्टांग योगसाधन, वेदपठण यज्ञयाग जे कांहीं ॥
स्वर्गफलांतें देतिल; परि आत्माराम भेटला नाहीं ॥८॥
वैराग्य बहु दाटुनि, विरजा होमांत अर्पि सर्वस्व ॥
परमात्मा दुर्लभ, जरि टाकुनि संसार घेइ संन्यास ॥९॥
मी माझेंपण जोंवरि, स्वर्गनरक पापपुण्य संकल्पीं ॥
मुकला आत्मज्ञाना, समजावा थोर तोच कीं पापी ॥१०॥
पापाभिमान किंवा पुण्याचा तो असेल अभिमान ॥
दोन्ही समान जाणा, पतनासी पाप कीं असो पुण्य ॥११॥
नसते स्थीर तराजू, खाली वर होय पारडे झुकणें ॥
सोन्याच्या वजनानें किंवा लोखंड माप वजनानें ॥१२॥
मापासमान सोनें भरता, कांटा बने जसा स्थीर ॥
पापसमान पुण्यें लेखीं, स्थितप्रज्ञ तोच साचार ॥१३॥
अज्ञान द्वैत मोठें, पाप नसे याहूनि अधिक दुसरें ॥
अज्ञानांतचि आहे पाप तसें पुण्य, द्वैत तें सारे ॥१४॥
नाना विचित्र साधन, जोडी पुण्यास कीं दुजे पाप ॥
परिणाम साधनांचा ऐसा, वाढेल उलट संताप ॥१५॥
रविरश्मीनें तपला त्यांसी, शीतल करील कां अग्नी ॥
संसारतप्त त्यासी, साधनची बंधनास करिल झणी ॥१६॥
यास्तव साधन असलें, कारण बंधास:सांगतील कुणी ॥
नायिक बोल तयाचें, त्यास न घरि आण, जा न त्या सदनीं ॥१७॥
आचारशील सुकृती ब्राह्मण, अभिमान ज्यास परि जडला ॥
दु:संग जाण त्याचा, षट्‌शास्त्रें चार वेदही पढला ॥१८॥
भ्रष्ट दुराचारी, परि जळला अभिमान ज्ञानवन्हींत ॥
त्याच्या पदधूळाची ये न सरी, ती कुणास जगतांत ॥१९॥
ब्राह्मण त्यास म्हणावें जों जाणुनि ब्रह्म त्यांतची विरला ॥
श्रेष्ठ असे त्रैलोकीं, जनद्दष्टया भ्रष्ट तो जरी दिसला ॥२०॥
नाथ मछिदर झाला लुब्ध बहू सक्त नारिराज्यांत ॥
अग्नीच, परी लोपे राखेनें त्यापरीच तो असत ॥२१॥
परि एक फुंकरानें सूप्त जसा अग्नि होय दैदीप्य ॥
तैसा ‘गोरख आया’ ऐकुनि तो सिद्ध स्मरत निजरूप ॥२२॥
जावो तोल कितीही, सर्कसपटु जाउ देइना तोल ॥
ज्ञानी तसा न निसरे, विषयेंद्रियघोळक्यांत निज मोल ॥२३॥
जरि पोहणार पडला नाहीं पाण्यांत वर्ष पन्नास ॥
तदनंतर जरि पडला, जलधीमाजीं बुडे न तो खास ॥२४॥
झालें निजरूपाचें ज्ञान पुरें एक वेळ गुरुयुक्त ॥
स्मरला कीं विस्मरला निजरूपा, तो असे सदा मुक्त ॥२५॥
कर्म अकर्मालागीं नातुडतो, विधिनिषेध त्या कसलें ॥
तो जे करि तोचि विधी, न करी तेची निषेध त्यांस भले ॥२६॥
नुगवे भूमीमाजीं शेतकरी बीज भाजलें पेरी ॥
अभिमान दग्ध कर्में ज्ञान्यांची, जन्म मरण केंवि वरि ॥२७॥
लौकिकद्दष्ठया दिसलें ब्रह्मज्ञान्यांत काम क्रोध रिपू ॥
परि नच शिवती, त्याचीं ब्रह्मस्वरुप जाहली असेच वपू ॥२८॥
सर्प भयंकर मोठा, गारोडी खेळवीत लीलेनें ॥
इतरे जन जरि धरितिल, घेइल तो सर्प प्राण दंशानें ॥२९॥
ब्रह्मज्ञ करिल तैसें न करावें, बोल ऐकणें त्याचे ॥
साधक जीवें त्यापरि वागावें, त्यास मरणभय कैचें ॥३०॥
टाकुनि सकलहि धर्मा शरण मला ये सख्या झणी पार्थ ॥
घेईन तुझी पापें हरि वदला, पाववीन निजअर्था ॥३१॥
त्यापरि साधन टाकी, वाढवि जे नित्य मीपणा थोरी ॥
प्रेमें चरण धरावें ज्ञात्याचें, भीपणास जो मारी ॥३२॥
मीपण न मरे शस्त्रें, उलटेंतें साधनें अधिक उफळें ॥
जाणुनि वर्मु, चतुर तो, वेगी सद्रुरु पदावरी लोळे ॥३३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2014-04-16T10:36:29.1030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

steel belt

  • पोलादी पट्टा 
RANDOM WORD

Did you know?

प्रासंगिक पूजा म्हणजे काय? त्या कोणकोणत्या?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.