मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह| द्वादशीचे अभंग निवडक अभंग संग्रह निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ६ निवडक अभंग संग्रह ७ निवडक अभंग संग्रह ८ निवडक अभंग संग्रह ९ निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह १२ निवडक अभंग संग्रह १३ निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १५ निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १७ निवडक अभंग संग्रह १८ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २२ श्री हनुमानजन्माचे अभंग श्रीरामजन्माचे अभंग श्रीकृष्ण जन्माचे अभंग मंगलाचरण पहिले काकड आरतीचे अभंग श्रीसदगुरु महिमा संतसंगमहिमा गौळण दळण विनंतीचे अभंग उपसंहार व वरप्रसाद श्रीसंत सदन महिमा क्षीरापतीचे अभंग प्रारब्धपर अभंग नक्र उद्धार नामधारकाची अधिकारश्रेष्ठता मुका काल्याचे अभंग जोहार जातें एडका दत्तस्तुती दान महात्म्य (महिमा) भजन ज्ञानेश्वर माउली बहिरा आरत्या मदालसा एकादशीचे अभंग द्वादशीचे अभंग चांगदेव पासष्टी द्वादशीचे अभंग द्वादशीचे अभंग Tags : abhangdvadashiअभंगद्वादशी द्वादशीचे अभंग Translation - भाषांतर द्वादशीचे अभंग शरण शरण एकनाथा । पायां माथा ठेविला ॥१॥नका पाहुं गुण दोष । झालों दास पायांचा ॥२॥आतां उपेक्षितां मज । तरि ते लाज कवणासी ॥३॥तुका म्हणे भागवत । केलें श्रुत सकळां ॥४॥*सन्त जाती हरिकीर्तना । त्यांच्या वाहीन मोचे वाहाणा ॥१॥हेंचि भवसिंधूचें तारुं । तेणें उतरुं पैलपारु ॥२॥जन्मोजन्मींचे भेषज । ते हे सन्तचरणरज॥३॥सन्तचरणींच्या पादुका । झाला जनार्दन एका ॥४॥*गातों एका ध्यातों एका । अंतरबाहीं पाहतों एका ॥१॥अगुणी एका सगुणी एका । गुणातीत पाहातों एका ॥२॥जनीं एका वनीं एका । निरंजनीं देखों एका ॥३॥सन्तजना पढीये एका । जनार्दना कडिये एका ॥४॥*करुनी आइती सत्यभामा मंदिरीं । वाट पाहे तों टळोनी गेली रात्रीं । न येतां देव येती काम लहरी । पडिली दुश्र्चिती तंव तो कवाड टिमकारी वो ॥१॥सर परता कळला तुझा भाव । कार्यापुरतें दाविसी लाघव । बोलतोसी ते अवघी तुझी माव । जाणोनि आलासी उजडता समयो रे ॥२॥मीच वेडी तुजलागीं बोल नाहीं । दानावेळें विटंबना झाली काई । मागुती रुद्रासी भेटी दिली तई । विश्वास तो तुझ्या बोला अझुनि तरी नाहीं रे ॥३॥भ्रम होता तो अवघा कळों आला । मानवत होतें मी भला भला । नष्ट क्रिया नाहीं मा तुझिया बोला । तुकयाबंधुस्वामी कानड्या कौसल्या ॥४॥*उंच नीच काही नेणॆं भगवंत । तिष्ठे भाव भक्त देखोनियां ॥१॥दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी । दैत्याघरीं रक्षी प्रल्हादासी ॥२॥चर्म रगूं लागे रोहिदासा संगे । कबीराचे मागें शेले विणी ॥३॥सजन कसाया विंकू लागे मांस । माळ्या सांवत्यास । खुरपूं लागे ॥४॥नरहरी सोनारा घडूं फ़ूंकु लागे । चोखामेळ्यासंगे ढोरें ओढी ॥५॥नामयाचे जनीसवें वेची शेणी । धर्माघरी पाणी वाहें झाडी ॥६॥नाम्यासवें जेवीं नव्हे संकोचित । ज्ञानियाची भिंत अंगे ओढी ॥७॥गौळियांचे घरी अंगे गाई वळी । द्वारपाळ बळीव्दारीं झाला ॥८॥अर्जुनाचे रथीं होय हा सारथी । भक्षी पोंहे प्रीतीं सुदाम्याचें ॥९॥येंकोबाचें ऋण फ़ेडी ह्रषीकेशी । अंबऋषीचें सोशी गर्भवास ॥१०॥मीराबाईसाठीं घेतो विष प्याला । दामाजीचा झाला पाडेवार ॥११॥घडी माती वाहे गोर्या कुंभाराची । हुंडी त्या मेहत्याची अंगे भरी ॥१२॥पुंडलीकासाठी अझुनी तिष्ठत । तुका म्हणे मात धन्य त्याची ॥१३॥*श्रवणें कीर्तनें झाले ते पावन । सनकादिक जाण परमभक्त ॥१॥झाली ते विश्रांती याचकां सकळां । जीवी जीवनकळा श्रीमूर्ति रया ॥२॥पादसेवनें अक्रूर झाला ब्रह्मरुप । प्रत्यक्ष स्वरुप गोविंदाचें ॥३॥स्वरुपणें अर्जुन नरनारायण । सृष्टी जनार्दनी एकरुप ॥४॥दास्यत्व निकट हनुमंतें पै केलें । म्हणोनी देखिले रामचरण ॥५॥बळी आणि भीष्म प्रल्हाद नारद । बिभीषण वरद चंद्रार्क ॥६॥व्यास आणि वसिष्ठ वाल्मिकादिक । आणिक पुंडलिका शिरोमणी ॥७॥शुकादिक योगी रंगले श्रीरंगीं । परिक्षितीच्या अंगी ठसावलें ॥८॥उद्धव यादव आणि ते गोपाळ । गोपिकांचा मेळ ब्रम्हरुप ॥९॥अनंत भक्तराशी तरले वानर । ज्ञानदेवा घर चिदानंदी ॥१०॥*अंगीकार ज्यांचा केला नारायणॆं । निंद्य तेही तेणें वंद्य केले ॥१॥अजामेळ भिल्ली तारिली कुंटणी । प्रत्यक्ष पुराणीं वंद्य केली ॥२॥ब्रह्महत्या राशी पातकें अपार । वाल्मीक किंकर वंद्य केला ॥३॥तुका म्हणे येथें भजन प्रमाण । काय थोरपण जाळावें तें ॥४॥*स्मरतां निवृत्ति पावलों विश्रांती । संसाराची शांती झाली माझ्या ॥१॥नमिता ज्ञानदेवा पावलों विसावा । अंतरीचा हेवा विसरलों ॥२॥सुखाचा निधाण तो माझा सोपान । विश्रांतीचें स्थान मुक्ताबाई ॥३॥चांगदेव माझा आनंदाचा तारुं । सुखाचा सागरु वटेश्वर ॥४॥सुखाचा सागर विसोबा खेचर । नरहरि सोनार प्राण माझा ॥५॥आठवितां नामा पावलों विश्रामा । मोक्षमार्गी आम्हां वाटा झाली ॥६॥परिसा भागवत जीवा आवडता । गोरा आणिअ सावंत सखे माझें ॥७॥जन जसवंत सुरदास सन्त । नित्य प्रणिपात वैष्णवासी ॥८॥वंदू भानुदास वैष्णवांचें कुळीं । ज्यासी वनमाळी मागें पुढें ॥९॥बाळपणीं जेणें भानु आरधिला । वंश निरविल देवराया ॥१०॥धन्य त्याचा वंश धन्य त्याचें कुळ । परब्रम्ह केवळ त्याचे वंशी ॥११॥एका जनार्दनीं सन्ताचें स्तवन । जनीं जनार्दन नमियेला ॥१२॥*पंढरीये माझें माहेर साजणी । ओविया कांडणी गाऊं गीती ॥१॥राही रखुमाई सत्यभामा माता । पांडुरंग पिता माहियेर ॥२॥उद्धव अक्रूर व्यास अंबऋषि। भाई नारदासी गौरवीन ॥३॥गरुड बंधु लडीवाळ पुंडलिक । यांचे कवतुक वाटे मज ॥४॥मज बहु गोत सन्त आणि महंत । नित्य आठवित ओवियेसी ॥५॥निवृत्ति ज्ञानदेव सोपान चांगया । जिवलगा माझिया नामदेवा ॥६॥नागो जगमित्रा नरहरि सोनारा । रोहिदास कबीरा सोईरीया ॥७॥परिसा भागवत सूरदास सांवता । गाईन नेणता सकळीकासीं ॥८॥चोखा मेळा सन्त जिवाचे सोईरे । न पडे विसर यांचा घडी ॥९॥जीवींच्या जीवना एका जनार्दना । पाठक हा कान्हा मीराबाई ॥१०॥आणिकही सन्त महानुभव मुनी । सकळां चरणीं जीव माझा ॥११॥आनंदें ओविया गाईन मी त्यांसी । जाती पंढरीसी वारकरी ॥१२॥तुका म्हणे माझा बळिया मायबाप । हर्षे नांदे सये घराचारी ॥१३॥*निवृत्ति शोभे मुगुटाकार । ज्ञान सोपान वटेश्वर ॥१॥विठू पंढरीचे राणे । ल्याले भक्तांचीं भूषणें ॥२॥खचेर विसा जगमित्र नागा । कुंडलें जोडा विठोबा जोगा ॥३॥बहु शोभे बाहुवट । गोरा सांवता दिकपाट ॥४॥कंठी जाणा एक विंद । तो हा जोगा परमानंद ॥५॥गळां शोभे वैजयंती । तिसी मुक्ताई म्हणती ॥६॥अखंड शोभे माझ्या बापा । पदकीं शोभे नामा शिंपा ॥७॥कटीसूत्र कटावरी । तो हा सोनार नरहरि ॥८॥कांसे कसिला पीतांबर । तो हा जाणावा कबीर ॥९॥जानू जघन सरळ । ते हे कन्होपात्रा विशाळ ॥१०॥दंतपंक्ति झळाळ । तो हा कान्हया रसाळ ॥११॥चरणींच्या क्षुद्र घंटा । नामयाचा नारा विठा ॥१२॥वामचरणींचा तोडर । परिसा रुळतो किंकर ॥१३॥चरणी वीट निर्मळ । तो हा झाला चोखामेळ ॥१४॥चरणातळीत ऊर्ध्वरेखा । झाला जनार्दन एका ॥१५॥*पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांची नांवें ॥१॥नेघे माझी वाचा तुटी । महालाभ फ़ुकासाठीं ॥२॥विश्रांतिचा ठाव । पायीं सन्ताचिया भाव ॥३॥तुका म्हणे पापें । जातीं सन्ताचिया जपें ॥४॥*रन्तजडित सिंहासन । वरी बैसले आपण ॥१॥कुंचे ढळती दोन्हीं बाहीं । जवळीं रखुमाई राही ॥२॥नाना उपचारी । सिद्धि वोळगती कामारी ॥३॥हातीं घेऊनि पादुका । उभा बंदीजन तुका ॥४॥*झाले ज्ञानेश्र्वर वाणी । आले सामुग्री घेऊनी ॥१॥पर्वकाळ व्दादशी । दिली सामुग्री आम्हासी ॥२॥ज्ञानदेवाचे चरणीं । शरण एका जनर्दनीं ॥३॥*उठोनि प्रात:काळीं ओढितां कांचोळी । जातो वेळोवेळीं महाव्दारीं ॥१॥अहो जी दातारा विनंती अवधार । तुम्ही यावें घरा भोजनासी ॥२॥रखुमाईमातें तुम्हीं यावें तेथें । सामुग्री सांगातें चालवावी ॥३॥सडा संमार्जन हें माझें करणें । उदक भरीन सुगंधेसीं ॥४॥शेष पत्रावळी काढीन उष्टावळीं । नित्य वेळोवेळीं हेंचि कामा ॥५॥नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही जेवा । प्रसाद तो ठेवा सेवकासी ॥६॥ N/A Last Updated : January 23, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP