मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह| आरत्या निवडक अभंग संग्रह निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ६ निवडक अभंग संग्रह ७ निवडक अभंग संग्रह ८ निवडक अभंग संग्रह ९ निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह १२ निवडक अभंग संग्रह १३ निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १५ निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १७ निवडक अभंग संग्रह १८ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २२ श्री हनुमानजन्माचे अभंग श्रीरामजन्माचे अभंग श्रीकृष्ण जन्माचे अभंग मंगलाचरण पहिले काकड आरतीचे अभंग श्रीसदगुरु महिमा संतसंगमहिमा गौळण दळण विनंतीचे अभंग उपसंहार व वरप्रसाद श्रीसंत सदन महिमा क्षीरापतीचे अभंग प्रारब्धपर अभंग नक्र उद्धार नामधारकाची अधिकारश्रेष्ठता मुका काल्याचे अभंग जोहार जातें एडका दत्तस्तुती दान महात्म्य (महिमा) भजन ज्ञानेश्वर माउली बहिरा आरत्या मदालसा एकादशीचे अभंग द्वादशीचे अभंग चांगदेव पासष्टी आरत्या आरत्या Tags : abhangअभंग आरत्या Translation - भाषांतर करुनी आरती । चक्रपाणि ओंवाळिती ॥१॥आजि पुरले नवस । धन्य काळ हा दीवस ॥२॥पाहा वो सकळां । पुण्यवंत तुम्ही बाळा ॥३॥तुका वाहे टाळी । उभा सन्निध जवळीं ॥४॥*प्रेम सप्रेम आरती । गोविंदातें ओवाळीती ॥१॥धन्य धन्य ते लोचनी । नित्य करिती अवलोकन ॥२॥बाळा प्रौढा आणि मुग्धा । ओंवाळिती परमानन्दा ॥३॥नामा म्हणे केशवातें । देखुनी राहिलों तटस्थें ॥४॥*युगे अठ्ठावीस विटेवरी उभा । वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा । पुंडलिका भेटी परब्रम्हा आलें गा । चरणीं वाहे भीमा उद्धरी जगा ॥१॥जयदेव जयदेव जय पांडुरंगा । रखुमाईवल्लभा राहीच्या वल्लभा पावे जीवलगा । जयदेव जयदेव ॥धृ॥तुळसीमाळा गळां कर ठेऊन कटीं । कांसे पीताबंर कस्तुरी लल्लाटीं । देव सुरवर नित्य येती भेटी । गरुड हनुमंत पुढे उभे राहाती ॥२॥आषाढी कार्तिकी भक्तजन येती । चंद्रभागेमाजी स्नानें जे करिती । दर्शन हेळामत्रे तया होय मुक्ति । केशवासी नामदेव भावें ओवाळिती ॥३॥*आरती ज्ञानराजा । महा कैवल्य तेजा । सेविती साधु संत । मनु वेधला माझा ॥१॥आरती ज्ञानराजा ॥धृ॥लोपलें ज्ञान जगीं । हित नेणती कोणी । अवतार पांडुरंग । नांव ठेविलें ज्ञानी ॥२॥प्रगट गुह्य बोले । विश्व ब्रह्माचि केले । रामा जनार्दनीं । पायीं टकचि ठेले ॥३॥*आरती एकनाथा । महाराजा समर्था । त्रिभुवनीं तूंचि थोर। सदगुरु जगन्नाथा ॥१॥आरती एकनाथा ॥धृ॥एकनाथ नाम सार । वेदशास्त्रांचें गुज संसार दु:ख नासे । महामंत्रांचें बीज ॥२॥एकनाथ नाम घेतां । सुख वाटलें चित्ता । अनंत गोपाळ दासा । धणी न पुरे गातां ॥३॥*आरती तुकारामा । स्वामी सद्गुरुधामा । सच्चिदानंद मूर्ति । पाया दाखवी आम्हां ॥१॥आरती तुकारामा ॥धृ॥राघवे सागरांत । पाषाण तारिलें । तैसे तुकोबाचे अभंग रक्षिलें ॥२॥तुकितां तुळनेसी । ब्रह्म तुकासी आलें । म्हणोनि रामेश्वरे । चरणीं मस्तक ठेविलें ॥३॥ N/A N/A Last Updated : January 23, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP