मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह| संतसंगमहिमा निवडक अभंग संग्रह निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ६ निवडक अभंग संग्रह ७ निवडक अभंग संग्रह ८ निवडक अभंग संग्रह ९ निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह १२ निवडक अभंग संग्रह १३ निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १५ निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १७ निवडक अभंग संग्रह १८ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २२ श्री हनुमानजन्माचे अभंग श्रीरामजन्माचे अभंग श्रीकृष्ण जन्माचे अभंग मंगलाचरण पहिले काकड आरतीचे अभंग श्रीसदगुरु महिमा संतसंगमहिमा गौळण दळण विनंतीचे अभंग उपसंहार व वरप्रसाद श्रीसंत सदन महिमा क्षीरापतीचे अभंग प्रारब्धपर अभंग नक्र उद्धार नामधारकाची अधिकारश्रेष्ठता मुका काल्याचे अभंग जोहार जातें एडका दत्तस्तुती दान महात्म्य (महिमा) भजन ज्ञानेश्वर माउली बहिरा आरत्या मदालसा एकादशीचे अभंग द्वादशीचे अभंग चांगदेव पासष्टी संतसंगमहिमा संतसंगमहिमा Tags : abhangअभंग संतसंगमहिमा Translation - भाषांतर संतसंगे हरे पाप । संतसंगे निरसे ताप । संतसंगे निर्विकल्प । होय मानस निश्र्चळ ॥१॥संतसंगे वैराग्य घडे । संतसंगे विरक्ती जोडे । संतसंगे निजशांति वाढे । साधन ह्रदयी अखंडीत ॥२॥संत संगे हरिची भक्ति । संतसंगे ज्ञान विरक्ती । संतसंगे भुक्ती मुक्ती । साधका वरिती अनायसे ॥३॥निळा म्हणे साधु संत। महाभाग्याचे हे भाग्य । सेविती ते स्वरुप चांग । पार्वती आत्मया श्रीहरिचे ॥४॥*ऎसी प्रात्पी कै लाहीन । संत संगती राहीन । त्यांचे संगती मी ध्याईन । नामा गाईन अहर्निशी ॥१॥भावे धरलिया संतसंग । सकळ संगा होय भंग । अभ्यासिता आकळे योग । पळे भवरोग आपभये ॥२॥सेविलीया संतचरण तीर्था । तीर्थे पायवणी वोढविती माथा । सुर नर असुर वंदिती तत्वतां । ब्रह्म सायुज्यताघर रिघे ॥३॥संत चरणरज मस्तकी पडे । देह संदेह समूळ उडे । उघडिली मुक्तिचि कवाडे । कोंदाटे पुढे परब्रह्म ॥४॥दृढ धरलिया सत्संगती । अलभ्य लाभ आतुडे हाती । चारी पुरुषार्थ चारी मुक्ति । पायां लागती निजदास्य ॥५॥जै कृपा कारिती संत । जन विजन होय जनार्दन । एका जनार्दनी शरण । ब्रह्म परिपूर्ण तो लाहे ॥६॥*ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले । उद्धरावया आले दीन जनां ॥१॥ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी । नाम घेता वदनी दोष जाती ॥२॥हो कां दुराचारी विषयी आसक्त । संत कृपे त्वरित उद्धरती ॥३॥अखंडित नामा त्यांचा वास पाहे । निशिदिनी ध्याये सत्संगती ॥४॥ N/A N/A Last Updated : January 23, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP