मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह| निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ६ निवडक अभंग संग्रह ७ निवडक अभंग संग्रह ८ निवडक अभंग संग्रह ९ निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह १२ निवडक अभंग संग्रह १३ निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १५ निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १७ निवडक अभंग संग्रह १८ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २२ श्री हनुमानजन्माचे अभंग श्रीरामजन्माचे अभंग श्रीकृष्ण जन्माचे अभंग मंगलाचरण पहिले काकड आरतीचे अभंग श्रीसदगुरु महिमा संतसंगमहिमा गौळण दळण विनंतीचे अभंग उपसंहार व वरप्रसाद श्रीसंत सदन महिमा क्षीरापतीचे अभंग प्रारब्धपर अभंग नक्र उद्धार नामधारकाची अधिकारश्रेष्ठता मुका काल्याचे अभंग जोहार जातें एडका दत्तस्तुती दान महात्म्य (महिमा) भजन ज्ञानेश्वर माउली बहिरा आरत्या मदालसा एकादशीचे अभंग द्वादशीचे अभंग चांगदेव पासष्टी निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ५ Tags : abhangअभंग निवडक अभंग संग्रह ५ Translation - भाषांतर * अवघाची संसार सुखाचा करीन । आनंदे भरीन तिन्ही लोक ॥१॥ जाईन गे माये तया पंढरपुरा । भेटेन मोहरा आपुलिया ॥२॥ सर्व सुकृतांचे फ़ळ मी लाहीन । क्षेम मी देईन पांडुरंगीं ॥३॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलाची भेटी । आपुलिये संवसाठीं करुनि ठेला ॥४॥ * पाहे पां ध्वजेचें चिरगुट । राया जतन करितां कष्ट ॥१॥ तैसा मी एक पतित । परि तुझा मुद्रांकित ॥२॥ मसीपत्र तें केवढें । रावो चालवी आपुल्यापाडें ॥३॥ बापरखुमादेविवरदा । सांभाळावें आपुल्या ब्रिदा ॥४॥ * गुरु हा संतुकुळीचा राजा । गुरु हा प्राणाविसावा माझा । गुरुवीणा देव दुजा । पाहतां नाहीं त्रिलोकीं ॥१॥ गुरु हा सुखाचा सागरु । गुरु हा प्रेमाचा आगरु । गुरु हा धैर्याचा डोंगरु । कदाकाळी डळमळीना ॥२॥ गुरु वैराग्याचें मुळ । गुरु हा परब्रह्म केवळ । गुरु सोडवी तात्काळ । गांठ लिंगदेहाची ॥३॥ गुरु हा साधकांशीं साह्य । गुरु हा भक्तांलागीं माय । गुरु हा कामधेनु गाय । भक्तांघरीं दुभतसे ॥४॥ गुरु घाली ज्ञानांजन । गुरु दाखवी निज धन । गुरु सौभाग्य देऊन । साधुबोध नांदवी ॥५॥ गुरु मुक्तीचे मंडन । गुरु दुष्टांचें दंडन । गुरु पापाचें खंडन । नानापरी वारितसे ॥६॥ काया काशी गुरु उपदेशी । तारक मंत्र दिला आम्हांसी । बापरखुमादेविवरासी । ध्यान मानसीं लागलें ॥७॥ * नित्य धर्म नाम पाठ । तेचि वैकुंठींची वाट । गुरुभजनीं त्याचा जो विनट । तोचि हरिभक्तु जाणावा ॥१॥ धन्य धन्य धन्य त्यचा वंश । धन्य तो आला जन्मास । तयाजवळीम ह्रुशीकेश । सर्वकाळ नांदतु असे ॥२॥ रामकृष्ण स्मरण जप । तेंचि तयाचें अमूप तप । तो वास करील कोटी कल्प । वैकुंठपीठ नगरीसीं ॥३॥ज्ञानदेवीं जप केला । हरि समाधीसी साधेला । हरिमंत्रे प्रोक्षिला सर्व संसार निर्धारें ॥४॥ * मन हें धालें मन हें धालें पूर्ण विठ्ठलचि झालें । अंतर्बाह्य रंगुनि गेलें विठ्ठलाची ॥१॥ विठ्ठल म्हणतां हरलें पाप । पदरीं आलें पुण्य माप । धाला दीनाचा माय बाप विठ्ठलची ॥२॥ विठ्ठल जळीं स्थळीं भरला। रिता ठाव नाहीं उरला । आजि म्यां दृष्टीने पाहिला । विठ्ठलची ॥३॥ ऎसा भाव धुरुनि मनीं । विठ्ठल आणिला निजध्यानीं । अखंड वदो माझी वाणी विठ्ठलची ॥४॥ तो हा चंद्रभागे तीरा । पुंडलीकें दिधला थारा । बापरखुमादेविवरा । जडलें पायीं विठ्ठलची ॥५॥ * घरदार वोखटें त्यजूं म्हणसी तरी शरीराएवढं जाड । माय बाप वोखटीं त्यजू म्हणसी तरी अहंकार अविद्येचें कोड । बंधु सखे त्यजूं म्हणसी तरी काम क्रोध मद मत्सर अवघड । बहिणी पाठीच्या त्यजूं म्हणसी आशा तृष्णा मायाचे बंडरया ॥१॥ त्यजिलें तें काय कासया म्हणजे सांग पा मजपासीं ऎसें । जया भेणें तू जासी वनांतरा तंव तुजचि सरिसे रया ॥२॥ स्त्री वोखटी त्यजूं म्हणसी तरी कल्पने एवढी भोक्ती । पुत्र अपत्य त्यजूं म्हणती तरी इंद्रियासी नाहीं निवृत्ति । सकळ गणगोत त्यजूं म्हणसी तरी हे अष्टधा प्रकृति । अवघेचि त्यजूं पाहे म्हणसी तरी मनी नाही नजि शांति रया ॥३॥अवघेचि तुज जवळीं दुमदुमित असतां वरी वरी मुंडसी कां करिसी विटंबना । सहज संतोषें असोनि जैसा तैसा परि तो सदगुरु पाविजे खुणा । आपुले आश्रमी स्वधर्मी असतां सर्वत्र एकुचि जाणा । बापरखुमादेविवरु विठ्ठलु इतुकियासाठीं नेईल वैकुंठभुवना ॥४॥ * कां सांडिसी गृहाश्रम । कां सांडिसी क्रियाकर्म । कासया सांडिसी कुळींचे धर्म । आहे तें वर्म वेगळेची ॥१॥ भस्मउधळण जटाभारु । अथवा उदास दिगंबरु । न धरीं लोकांचा आधारु । आहे तो विचारु वेगळाची ॥२॥ जप तप अनुष्ठान । क्रिया कर्म यज्ञ दान । कासया इंद्रिया बंधन । आहे तें निधान वेगळेंची ॥३॥ वेदशास्त्र जाणीतलें । आगमीं पूर्ण ज्ञान झालें । पुराणा मात्र धांडोळिलें । आहे तें राहिलें वेगळेंची ॥४॥ शब्दब्रह्में होसी आगळा । म्हणसी न भिये कळिकाळा बोधेंविण सुख सोहळा । आहे तो जिव्हाळा वेगळाची ॥५॥ याकारणें श्रीगुरुनाथु । जंव मस्तकीं न ठेवी हातु । निवृत्तिदास असे विनवितु । तंव निवांतु केविं होय ॥६॥ * जंववरी रे तंववरी जंबुक करी गर्जना । तंव त्या पंचानना देखिलें नाही बाप ॥१॥ जंववरी रे तंववरी वैराग्याच्या गोष्टी । जंव सुंदर वनिता दृष्टी देखिली नाहीं बाप ॥२॥ जंववरी रे तंववरी मैत्रत्व संवाद । जंववरी अर्थेसि संबंध पडिला नाहीं बाप ॥३॥ जंववरी रे तंववरी युद्धाची मात । जंव परमाईचा पूत देखिला नाही बाप ॥४॥ जंववरी ते तंववरी समुद्र करी गर्जना । जंव अगस्ती ब्राह्मणा देखिलें नाहीं बाप ॥५॥ जंववरी ते तंववरी बाधी हा संसार । जंव रखुमादेविवरा देखिला नाहीं बाप ॥६॥ *दुर्लभु रे दुर्लभु रे दुर्लभु संसार तुम्ही कां नेणां । आहार निद्रेसाठी दवाडितां माणुसपणा ॥१॥आड ना विहिरी बावि ना पोखरणी । सरिता ना सागर कल्पतरु रानोरानीं ॥२॥बावो याची खुण ज्ञानदेवो जाणे । तयाचें करणें तें अधिकचि होणें ॥३॥*मोक्ष मेल्यापाठी आम्हांसी होईल । ऎसें जे म्हणतील अतिमूर्ख ॥१॥दीप गेल्यावरी कैचा जी प्रकाश । झांका झांकी त्यास कासयाची ॥२॥जंववरी देह आहे तंववरी साधन । करुनिया ज्ञान सिद्ध करा ॥३॥गृह दग्ध न होतां शिंपीजे उदक । शेखी तो निष्टंक काय कीजे ॥४॥आहे मी हा कोण करावा विचार । म्हणे ज्ञानेश्र्वर निवृत्तीचा ॥५॥*अनुपम्य मनोहर । कासें शोभे पितांबर । चरणीं ब्रिदाचा तोडर । देखिला देवो ॥१॥योगियाची कसवटी । दावितसे नेत्रपुटी । उभा भिवरेच्या तटीं । देखिला देवो ॥२॥बापरखुमादेविवरु । पुंडलिका अभंयकरु । परब्रह्म साहाकारु । देखिला देवो ॥३॥*पदोपदीं निजपदा गेलें वो । कर्म संचित सकर्म जालें वो ॥१॥तेथें आपुलें नाठवे कांहीं वो । आप आपणा न सांपडे डाई वो ॥२॥श्रीगुरुप्रसादें ज्ञान बोधु झाला वो । नव्हे तें ठाउकें पडिलें माय वो ॥३॥*दुरुळ अंबुला केला गे बाई । ब्रह्मादिकां तो न पडे ठाई ॥१॥हालों नये चालों नये । सैरावैरा कांही बोलों नये ॥२॥अंबुला केला धावे जरि मन । बुडती बेताळीस जाती नाक कान ॥३॥मागील केलें तें अवघें वावो । बापरखुमादेविवरु विठ्ठल नाहो ॥४॥*शरीर वरिवरि कां दंडिसी जंव वारिलें न करी तुझें मन । जळीं नेत्र लाऊनि ठोकती अविंशा लागोनि तैसें नको नको बकध्यान रया ॥१॥चित्त सुचित्त करी मन सुचित्त करी । नधरी तूं विषयाची सोय । वनीं असोनी वनिता चिंतिसि तरि तपचि वाउगें जाय रया ॥२॥त्रिकळ स्नान करिसी तिर्थजळीं परि नवजाती मनींचें मळ । तुझियानि दोषें तीर्थ कुश्र्चित जाली जैसी त्या रजकाची शीळ रया ॥३॥आतां करिसी तरी चौखटची करी त्यासी साक्ष तुझें तुज मन । लटिकेन झकवसी तर्ही देव दुर्हा होसी बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण ॥४॥*मायविवर्जित जालें वो । माझें गोत तें पंढरिये राहिलें वो ॥१॥पतिव्रता मी परद्वारिणी । परपुरषेसी व्यभिचारिणी ॥२॥साचारि चौदा जाली वो । सेखी अठरा घोकुनी राहिलें वो ॥३॥निवृत्तिप्रसादें मी गोवळी वो । माझा भावो तो विठ्ठलु न्याहाळीं वो ॥४॥ N/A N/A Last Updated : January 23, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP