मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह| मंगलाचरण पहिले निवडक अभंग संग्रह निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ६ निवडक अभंग संग्रह ७ निवडक अभंग संग्रह ८ निवडक अभंग संग्रह ९ निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह १२ निवडक अभंग संग्रह १३ निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १५ निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १७ निवडक अभंग संग्रह १८ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २२ श्री हनुमानजन्माचे अभंग श्रीरामजन्माचे अभंग श्रीकृष्ण जन्माचे अभंग मंगलाचरण पहिले काकड आरतीचे अभंग श्रीसदगुरु महिमा संतसंगमहिमा गौळण दळण विनंतीचे अभंग उपसंहार व वरप्रसाद श्रीसंत सदन महिमा क्षीरापतीचे अभंग प्रारब्धपर अभंग नक्र उद्धार नामधारकाची अधिकारश्रेष्ठता मुका काल्याचे अभंग जोहार जातें एडका दत्तस्तुती दान महात्म्य (महिमा) भजन ज्ञानेश्वर माउली बहिरा आरत्या मदालसा एकादशीचे अभंग द्वादशीचे अभंग चांगदेव पासष्टी मंगलाचरण पहिले मंगलाचरण पहिले Tags : मंगलाचरण मंगलाचरण पहिले Translation - भाषांतर जय जय रामकृष्णहरि*रुप पाहतां लोचनीं । सुख झालें वो साजणी ॥१॥तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥२॥बहुता सुकृताची जोडी । म्हणोनि विठ्ठलीं आवडी ॥३॥सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवर ॥४॥*वचन ऎका कमळापती । माझी रंकाची विनंती ॥१॥कर जोडितों कथेकाळीं । आपण असावें जवळीं ॥२॥घ्यावी घ्यावी माझी भाक । जरीं कां मागेन आणिक ॥३॥तुकयाबंधु म्हणे देवा । शब्द इतुकाची राखावा ॥४॥*राहो आतां हेंचि ध्यान । डोळां मन लंपट ॥१॥कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें पूजीन ॥२॥होईल येणें कळसा आलें । स्थिरावलें अंतरीं ॥३॥तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पायां पडो द्या ॥४॥*तुज पाहतां सामोरी । दृष्टि न फिरे माघारी ॥१॥माझें चित्त तुझ्या पायां । मिठी पडली पंढरीराया ॥२॥नव्हे सारितां निराळें । लवण मेळवितां जळें ॥३॥तुका म्हणे बळी । जीव दिला पायातळीं ॥४॥*तुम्ही सनकादिक संत । म्हणवितां कृतावंत ॥१॥एवढा करा उपकार । देवा सांगा नमस्कार ॥२॥माझी भाकावी करुणा । विनवा पंढरीचा राणा ॥३॥तुका म्हणे मज आठवा । मुळ लवकरी पाठवा ॥४॥*आतां तुम्ही कृपावंत । साधुसंत जिवलग ॥१॥गोमटें तें करा माझें । भार ओझें तुम्हांसी ॥२॥वंचिलें तें पायांपाशीं । नाहीं यासी वेगळें ॥३॥तुका म्हणे सोडिल्या गांठी। दिली मिठी पायांसी ॥४॥*लेकुराचें हित । वाहे माउलीचें चित्त ॥१॥ऎसी कवळ्याची जाती । करी लाभाविण प्रीति ॥२॥पोटीं भार वाहे । त्याचें सर्वस्वही साहे ॥३॥तुका म्हणे माझें । तुम्हां संतांवरी ओझे ॥४॥*करुनि उचित । प्रेम घाली ह्र्दयांत ॥१॥आलों दान मागायास । थोर करुनियां आस ॥२॥चिंतन समयीं । सेवा आपुलीच घेई ॥३॥तुकयाबंधु म्हणे भावा । मज निरवावे देवा ॥४॥*न धरी उदास । माझी पुरवावी आस ॥१॥ऎका ऎका नारायणा । माझी परिसा विज्ञापना ॥२॥मायबाप बंधुजन । तुंचि सोयरा सज्जन ॥३॥तुका म्हणे तुजविरहित । कोण करील माझें हित ॥४॥*गरुडाचे पायीं । ठेवी वेळोवेळां डोई ॥१॥वेगीं आणावा तो हरी । मज दीनातें उद्धरी ॥२॥पाय लक्ष्मीच्या हातीं । तिसीं यावे काकुळती ॥३॥तुका म्हणे शेषा । जागे करा ह्रषीकेशा ॥४॥*येग येग विठाबाई । माझे पंढरींचे आई ॥१॥भिमा आणि चंद्रभागा । तुझ्या चरणींची गंगा ॥२॥इतुक्यासहित त्वां बा यावें । माझें रंगणीं नाचावें॥३॥माझा रंग तुझे गुणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥ N/A N/A Last Updated : December 29, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP