मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह| निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ६ निवडक अभंग संग्रह ७ निवडक अभंग संग्रह ८ निवडक अभंग संग्रह ९ निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह १२ निवडक अभंग संग्रह १३ निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १५ निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १७ निवडक अभंग संग्रह १८ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २२ श्री हनुमानजन्माचे अभंग श्रीरामजन्माचे अभंग श्रीकृष्ण जन्माचे अभंग मंगलाचरण पहिले काकड आरतीचे अभंग श्रीसदगुरु महिमा संतसंगमहिमा गौळण दळण विनंतीचे अभंग उपसंहार व वरप्रसाद श्रीसंत सदन महिमा क्षीरापतीचे अभंग प्रारब्धपर अभंग नक्र उद्धार नामधारकाची अधिकारश्रेष्ठता मुका काल्याचे अभंग जोहार जातें एडका दत्तस्तुती दान महात्म्य (महिमा) भजन ज्ञानेश्वर माउली बहिरा आरत्या मदालसा एकादशीचे अभंग द्वादशीचे अभंग चांगदेव पासष्टी निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह २ Tags : abhangअभंग निवडक अभंग संग्रह २ Translation - भाषांतर ----------------------------- कुंचे पताकांचे भार । आंले वैष्णव डिंगर । भेणें पळती यमाकिंकर । नामें अंबर गर्जतसे ॥१॥ आले हरिदासांचे थाट । कळिकाळा नाहीं वाट । विठ्ठलनामें करिती बोभाट । भक्ता वाट सांपडली ॥२॥ टाळ घोळ चिपळिया नाद । दिंडी पताका मकरंद । नाना बागडियाचे छंद। कवच अभेद नामाचें ॥३॥ वैष्णव चालिले गर्जत । महावीर ते अदूभुत। पुढें यमदूत पळत । पुरला अंत महादोषा ॥४॥ निवृत्ति संत हा सोपान । महावैष्णव कठीण । मुक्ताबाई तेथें आपण । नारायण जपतसे ॥५॥ ज्ञानदेव वैष्णव मोठा । विठ्ठनामें मुक्तपेठा । स्नान दान घडे श्रेष्ठा । वैकुंठवाटा संत गेले ॥६॥ ----------------------------- काय करिसी सकळ देवांचे वैभव विलास । माझिया स्वामीविण ते अवघे ते उद्वस रया ॥१॥ तपन त्या कमळा कमळीं विकासु । सुकवी मयंकु काय करिसी सुधांशु ॥२॥ साताहि वारांचे दिवसु एकियाचि सुरिजे । तैसें सर्वीं सर्वपण माजीये न श्रीराजे ॥३॥ सर्वज्ञ सुंदर देव होतुकां भलतैसे । परि जडातें चेष्टविते आणिकां पैं नसे ॥४॥ जया नांव नाहीं रुप चिन्ह कांहीं । नाम रुप चिन्ह स्वयेंचि पाहीं ॥५॥ बापरखुमादेविवरु आहे तैसाचि पुरे । काय करिसी आणिकां देवांचीं गोवारें रया॥६॥ ----------------------------- रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा ॥१॥ चरण कमळद्ळु रे भ्रमरा । भोगीं तुं निच्श्रळु रे भ्रमरा ॥२॥ सुमन सुगंध रे भोंवरा । परिमळ विदूगदु रे भोंवरा ॥३॥ सौभाग्य सुंदरुं रे भ्रमरा । बापरखुमादेविवरु रे भ्रमरा ॥४॥ ----------------------------- आकार स्थुळ नाशिवंत । हें तरी जाईल भुमिआंत । तयावरी हरि चालत । तेणें होईल कृतकृत्य ॥१॥ देह जावो अथवा राहो । पांडुरंगीं दृढ भावो ॥२॥ दूजा गुण आपीं मिळे । तरी मी होईन गंगाजळे । हरि अभिषेक अनुदिनीं । सुखें सर्वांगावरी खेळे ॥३॥ तिजा गुण तेजरुप । तरि मी होईन महदीप । हरि रंगणीं दीपमाळा । दीप उजळीन समीप ॥४॥ वायु व्यापक चौथा गुण । तरि मी विंजणा होईन । हरि अष्टांगें निववीन । ऎशा दृढ धरीन खुणा ॥५॥ आकाश पांचवा गुण । तरी मी प्रासादीं राहेन । बापरखुमादेविवरा । अखंड तुझें अनुसंधान ॥६॥ ----------------------------- निमिष नलगे मन वेधितां । येवढी तुझी स्वरुपता ॥१॥ विठोबा नेणॊ कैसी भेटी । उरणें नाहीं जीवेसाठीं ॥२॥ उरणें उपाधि कारणें । तें तों नेमिलें दर्शनें ॥३॥ निवृत्तिदासा वेगळें । सांगावया नाहीं उरलें ॥४॥ ----------------------------- पैल तो गे काऊ कोकताहे । शकुन गे माये सांगतसे ॥१॥ उडरे उडरे काऊ तुझे सोन्यानें मढीन पाऊ । पाहुणे पंढरीराऊ घरां कैं येती ॥२॥ दहिभाताची उंडी लावीन तुझ्या तोंडीं । जीवापढीये त्याची गोडी सांग वेगीं ॥३॥ दुधें भरुनी वाटी लावीन तुझे ओठीं । सत्य सांगें गोठी विठो येईल काई ॥४॥ आंबया डाहाळीं फ़ळें चुंबीं रसाळीं । आजिचे रे काळीं शकुन सांगें ॥५॥ ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे । भेटती पंढरीराणे शकुन सांगे ॥६॥ ----------------------------- कान्होबा तुझी घोंगडी चांगली । आम्हांसी कां दिली वांगली रे ॥धृ॥ स्वगत सच्चिदानंद मिळोनी शुद्ध सत्त्व गुण विणली रे । षडूगुण गोंडे रत्नजडित तुज श्यामसुन्दरा शोभली रे ॥१॥ काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभुतांनी विणली रे । रक्त रेतु दुर्गंधी जंतु नरक मुतानें भरली रे ॥२॥ षडूविकार षडूवैरी मिळोनी तापत्रयानें विणली रे । नवा ठायीं फ़ाटूनि गेली ती त्वां आम्हांसि दिधली रे ॥३॥ॠषी मुनी ध्यातां मुखीं नाम गातां संदेहवृत्ती विणली रे । बापरखुमादेविवरु विठ्ठलें त्वत्पदीं वृत्ति मुरली रे ॥४॥ ----------------------------- यम नियम पाप पुन्य आम्हांसी । आपण भलतेंचि करिसी । तुझिया थोरपणा बिहुनि असावें कवणें शंकावें रायासी । प्रत्यक्ष जगीं बाटली नारी तिचें स्मरण लोकांसी । पुराणी डांगोरा पिटिताती हें पतिव्रतापण तयेसी रया ॥१॥ आवडे तें करिसी देवा कवण करी तुझा हेवा रे ॥धृ॥ बहुता परी उणें एकिजे पांडवा सांगों या गोष्टी । पांचांपासुनि जन्मले पांचैजण एक पत्नीच्या पोटीं । गोत्र वधु करुनि राज्य करिती विश्र्वासी वंद्य शेवटीं । जनमेजया ऎसें बोलिला सत्य तो पापिया झाला कुष्टी ॥२॥ प्राण जाई तंव बोभाईला तुज । पतन तया दशरथा । गणिका एक पाखिरु पोखिलें होतें पाचरिलें प्राण जातां । कीं तयेसी ऊर्ध्वगति ऎसीं बोलतीं पुराणें . कासया न मिळे पाहतां । बोलणें खुंटलें तुजपासी देवा वेव्हारु नाहीं सर्वथा ॥३॥तपाचा जो राशी पुण्यपणें थोर । तीर्थरुप सर्वां तीर्थां मंत्राचा अवतार । देव आणि शक्ति सुर्य तैसा विचारितां । तो मांडव्य ऋषि वाहिला सुळी एक ऊ जाला वधितां । पुत्रा पाचारिलें पापिये दुर्जनें तो वैकुंठी अजामेळु सरतारे रे ॥४॥यज्ञमुखीं अवदानें देती त्या करिसी वांकडें तोंड । लोणी चोरावया जासी घरोघरी उघडिसी त्यांचीं कवाडें । छप्पन्न कोटी यादव संगति हे तुझे ते त्वां केले शापावरपडे । कोळियानें तुज विंधिलें पायीं त्यासी सायज्जता कोडें रया ॥५॥अष्टांगयोगें शरीर दंडिलें तुजलागी झालीं पिसी । पुत्रदारा धन सांडुनियां जन हिंडताती वनवासी। गाती वाती पूजिती तूतें त्यांसी निजपद सायासीं । विष पाजुं आली पुतना राक्षसी सायुज्जता देणें तियेसि रया ॥६॥वारया मोट बांधेल कोण आकाशासि कुंप कायसा । सुर्यापूढें दिवा लाऊनियां चालणें वाउअगाची शिण जैसा । विचित्र तुझें रुप अव्हेरुन जासी सर्वेशा ॥ ज्ञानदेव म्हणे देवाधिदेवा । जन भांबाविला ऎसा मावा रया ॥७॥-----------------------------परियेसी गव्हारा सादर । कर्मे निर्वंश झाले सगर । भिल्लें विंधिले शारंगधर । झाला पुरंदर सहस्त्रनयन ॥१॥कर्मे मन्मथ झालासे राख । कर्मे चंद्रासि घडला दोष । कर्मे भार वाहती कूर्म शेष । कर्में खरमुख ब्रह्म देखा ॥२॥कर्में वासुकी लंके दिवटा । कर्मेंहनुमंताउदरी कांसोटा । कर्में शकुदेव गर्मी कष्टा । पाताळ वाटा बळी गेला ॥३॥ कर्मे दशरथ वियोगे मेला । कर्में श्रीराम वनवासा गेला । कर्में रावण क्षयो पावला । वियोग घडलासीतादेवी ॥४॥कर्में दुर्योधनादि रणीं नासले । कर्में पाडंव महापंथे गेले । कर्में सिंधु जळ शोषिलें । नहुष झाला सर्प देखा ॥५॥कर्मातें शुभ मानी आपण । किती पळसी कर्माभेण । बापरखुमादेविवरा विठ्ठला शरण । केलीं कर्में निवारी नारायण ॥६॥-----------------------------उपजोनि संसारी आपुला आपण वैरी । मी माझें शरीरीं घेऊनि ठेला । या देहातें म्हणे मी पुत्र दारा धन माझें । परि काळाचें हें खाजें ऎसें नेणतु गेला॥१॥कामक्रोधमद मत्सराचेनि गुणें । बांधला आपण नेणे भ्रमित जैसा । मिथ्या मोह फ़ांसा शुक नळिके जैसा । मुक्त परि अपैसा पळों नेणे ॥२॥जळचरु आमिष गिळी जैसा कां लागलासे गळीं । आपआपणापें तळमळी । सुटिका नाहीं तैसें आरंभीं विषयसुख गोड वाटे इद्रियां । फ़ळपाकीं पापिया दु:ख भोगी ॥३॥राखोंडी फ़ुंकिता दिप नलगे जयापरी । तैसा शद्ध ब्रम्हकुसरी ज्ञान न पवे । व्रत तप दान तीर्थ भजन वेंचिलें । पोटा दंभाच्या खटपटा सिणतु गेला ॥४॥ मृगजळाची नदी दुरुनी देखोनि धावें । परि गंगोदक न पवे तान्हेंला जैसा । तैसें विषयसुख नव्हेचि हित । दु:ख भोगितो बहुत परि सावधान नव्हे ॥५॥ परतोनि न पाहे धांवतो सैरा । करितो येरझारा संसरींच्या । ज्ञानदेव म्हणे बहुतां जन्मांचा अभ्यासु । तरीच होय सौरसु परब्रम्हीं ॥६॥-----------------------------नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी । उचलुनि घेतला कडियेवरी । भक्त सुखें निवाला ॥१॥नाम बरवया बरवंट । नाम पवित्र आणि चोखट । नाम स्मरे निळकंठ । निजसुखें निवाला ॥२॥जें धुरुसी आठवलें । तेंचि उपमन्यें घोकीलें । तेंचि गजेंद्रा लाधलें । हित झालें तयाचें ॥३॥नाम स्मरे अजामेळ । महापातकी चांडाळ । नामें झालासे सोज्वळ । आपणांसहित निवाला ॥४॥वाटपाडा कोळीकु । नाम स्मरे तो वाल्मीकु । नामें उद्धरिले तिन्ही लोकु । आपणांसहित निवाला ॥५॥ऎसे अनंत अपार । नामें तरलें चराचर । नाम पवित्र आणि परिकर । रखुमादेविवराचें ॥६॥-----------------------------अंडज जारज स्वेदज उदुभिज आटे । हरिनाम नाटे तें बरवें ॥१॥जें नाटे तें नाम चित्तीं । रखुमादेविपति श्रीविठ्ठलाचें ॥२॥शरीर आटे संपत्ति आटे । हरि नाम नाटे तें बरवें ॥३॥बापरखुमादेविवराचें नाम नाटें । युगें गेली परि उभा विटे ॥४॥-----------------------------सोनयाचा दिवस आजि अमृतें पाहाला । नाम आठवितां रुपीं प्रगट पैं झाला ॥१॥गोपाळा रे तुझें ध्यान लागो मना । आनु न विसंबे हरि जगत्रजीवना॥२॥तनुमनु शरण विनटलों तुझ्या पायीं । बापरखुमादेविवरावांचुनी आनु नेणें कांही ॥३॥-----------------------------जें शुंभुनें धरेलें मानसीं । तेंचि उपदेशिलें गिरीजेसी ॥१॥नाम बरवें बरवें । निज मानसीं धरावें ॥२॥गंगोदकाहुनि निकें । गोडी अमृत झालें फ़िकें ॥३॥शीतळ चंदनाहुनि वरतें । सुंदर सोनियाहूनि परतें॥४॥भुक्तिमुक्ति दायक । भवबंधन मोचक ॥५॥बापरखुमादेविवरें । सुलभ नाम दिधलें सोपारें ॥६॥-----------------------------कर्म आणि धर्म आचरिजे जयालागीं । साधक शिणले साधन साधितां अभागी ॥१॥गोड तुझें नाम विठोबा आवडतें मज । दुजें उच्चारितें मना येत असे लाज॥२॥भुक्ति आणि मुक्ति नामापासीं प्रत्यक्ष। चार्ही वेद साहिं शास्त्रें देताती साक्ष ॥३॥काया वाचा चित्त चरणीं ठेवलें गहाण । बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण ॥४॥ N/A N/A Last Updated : January 23, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP