मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह| काकड आरतीचे अभंग निवडक अभंग संग्रह निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ६ निवडक अभंग संग्रह ७ निवडक अभंग संग्रह ८ निवडक अभंग संग्रह ९ निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह १२ निवडक अभंग संग्रह १३ निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १५ निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १७ निवडक अभंग संग्रह १८ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २२ श्री हनुमानजन्माचे अभंग श्रीरामजन्माचे अभंग श्रीकृष्ण जन्माचे अभंग मंगलाचरण पहिले काकड आरतीचे अभंग श्रीसदगुरु महिमा संतसंगमहिमा गौळण दळण विनंतीचे अभंग उपसंहार व वरप्रसाद श्रीसंत सदन महिमा क्षीरापतीचे अभंग प्रारब्धपर अभंग नक्र उद्धार नामधारकाची अधिकारश्रेष्ठता मुका काल्याचे अभंग जोहार जातें एडका दत्तस्तुती दान महात्म्य (महिमा) भजन ज्ञानेश्वर माउली बहिरा आरत्या मदालसा एकादशीचे अभंग द्वादशीचे अभंग चांगदेव पासष्टी काकड आरतीचे अभंग काकड आरतीचे अभंग Tags : abhangअभंगकांकड आरती काकड आरतीचे अभंग Translation - भाषांतर १उठा उठा हो साधुसंत । साधा आपुले हित । गेला गेला हा नरदेह । मग कैचा भगवंत ॥ १ ॥उठोनि वेगेंसी । चला जाऊं राऊळासी ।जळती पातकाच्या राशी । काकड आरती देखलिया ॥ २ ॥उठोनियां पहाटे । विठ्ठल पाहा उभा विटे ।चरण तयाचे गोमटे । अमृतदृष्टी अवलोका ॥ ३ ॥जागे करा रुक्मिणीवरा । देव आहे निदसुरा ।वेगें निंबलोण करा । दृष्ट होईल तयासी ॥ ४ ॥पुढें वाजंत्री वाजती । ढोल दमामे गर्जती ।होते काकड आरती । पांडुरंगरायाची ॥ ५ ॥सिंहनाद शंख भेरी । गजर होतो महाद्वारीं ।केशवराज विटेवरी । नामा चरण वंदितो ॥ ६ ॥२ उठा जागे व्हा रे आतां । स्मरण करा पंढरीनाथा ।भावें चरणीं ठेवा माथां । चुकवीं व्यथा जन्माच्या ॥ १ ॥धन दारा पुत्र जन । बंधू सोयरे पिशून ।सर्व मिथ्या हें जाणून । शरण रिघा देवासी ॥ २ ॥माया विघ्नें भ्रमला खरें । म्हणता मी माझेनि घरे ।हें तों संपत्तीचें वारें । साचोकारें जाईल ॥ ३ ॥आयुष्य जात आहे पाहा । काळ जपतसे महा ।स्वहिताचा घोर वहा । ध्यानीं राहा श्रीहरीच्या ॥ ४ ॥संतचरणी भाव धरा । क्षणाक्षणा नामा स्मरा । मुक्ति सायुज्यता वरा । हेंचि करा बापांनों ॥ ५ ॥विष्णुदास विनवी नामा । भुलूं नका भव कामा ।धरा अंतरी निजप्रेमा । न चुका नेमा हरिभक्ति ॥ ६ ॥३उठा पांडुरंगा आतां दर्शन द्या सकळीं ।झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळां ॥ १ ॥संतसाधुमुनी अवघे झालेती गोळा ।सोडा सेजसुख आतां पाहुं द्या मुखकमळा ॥ २ ॥रंगमंडपीं महाद्वारीं झालीसे दाटी । मन उतावीळ रूप पाहावया दृष्टी ॥३॥राही रखुमाबाई तुम्हां येऊ द्या दया ।सेजें हालउनि जागे करा देवराया ॥४॥गरुड हनुमंत पुढे पाहती वाट ।स्वर्गीचे सुरवर घेऊनि आले बोभाट ॥५॥झालें मुक्तद्वार लाभ झाला रोकडा ।विष्णुदास नामा उभा घेऊनि काकडा ॥६॥४उठा अरुणोदय प्रकाश झाला । घंटा गजर गर्जिन्नला ।हरि चौघडा सुरु झाला । काकड आरती समयाचा ॥ १ ॥महाद्वारीं वैष्णवजन । पूजा सामुग्री घेऊन ।आले द्यावे तयांसी दर्शन । बंदिजन गर्जती ॥ २ ॥सभामंडपी कीर्तन घोष । मृदंग टाळ विणे सुरस ।आनंदे गाती हरिंचे दास । परम उल्हास करूनियां ॥ ३ ॥चंद्रभागे वाळ्वंटी । प्रातःस्नानाची जनदाटी ।आतां येतील आपुले भेटी । उठीं उठीं गोविंदा ॥ ४ ॥ऐसे विनवी रुक्मिणी । जागृत झाले चक्रपाणी ।नामा बद्धांजुळी जोडुनि । चरणीं माथा ठेवितसे ॥ ५ ॥५उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला ।वैष्णवांचा मेळा गरुडपारीं दाटला ॥ १ ॥वाळवंटापासूनि महाद्वारापर्यंत ।सुरवरांची दाटी उभे जोडूनि हात ॥ २ ॥शुकसनकादिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी ।कवाडा आडूनि पाहताती जगजेठी ॥ ३ ॥सुरवरांची विमाने गगनीं दाटली सकळ ।रखुमाबाई माते वेगी उठवा घननीळ ॥ ४ ॥रंभादिक नाचती उभ्या जोडूनि हात ।त्रिशूळ डमरू घेऊनि आला गिरजेचा कांत ॥ ५ ॥पंचप्राण आरत्या घेऊनियां देवस्त्रिया येती ।भावें ओवाळिती राही रखुमाईचा पती ॥ ६ ॥अनंत अवतार घेसी भक्तांकारणें ।कनवाळु कृपाळु दीनालागी उद्धरणें ॥ ७ ॥चौयुगांचा भक्त नामा उभा कीर्तनीं ।पाठीमागे डोळे झांकुनि उभी ती जनी ॥ ८ ॥६सहस्त्र दींपे दीप कैसी प्रकाशली प्रभा ।उजळल्या दशदिशा गगना आलीसे शोभा ॥ १ ॥काकड आरती माझ्या कृष्ण सभागिया ।चराचर मोहरलें तुझी मूर्ति पाहाया ॥ २ ॥कोंदलेसे तेज प्रभा झालीसे एक ।नित्य नवा आनंद ओवाळितां श्रीमुख ॥ ३ ॥आरती करितां तेज प्रकाशले नयनीं ।तेणें तेजें मिनला एकाएकीं जनार्दनीं ॥ ४ ॥७कां हो तुम्ही निश्र्चितीनें निजलाती हरी ।मानिलें हें सुख आम्ही वाचुं कैशापरी ॥ १ ॥उठा सावध व्हावे क्षेम सकळां द्यावें ।जया जी वासना तयां तैसे पुरवावें ॥ २ ॥जन्मोजन्मीं सांभाळिलें क्षमा करा अन्याय ।कृपा करी देवा आम्हां तूंचि बापमाय ॥ ३ ॥तुका म्हणे करा वडीलपणा दानासी ।जेणें सुख होय सकळ हे जनासी ॥ ४ ॥८अवघे हरिजन मिळोनि आले राउळा ।दोन्ही कर जोडोनि विनविती गोपाळा ॥ १ ॥उठा पांडुरंगा हरिजना सांभाळी ।पाहुं द्या वदन वंदूं पायांची धूळी ॥ २ ॥उगवला दिनकर झाल्या निवळस दिशा ।कोठवरी निद्रा आतां उठा परेशा ॥ ३ ॥तुका म्हणे आम्ही उभे तिष्ठत द्वारासी ।दोन्ही कर जोडोनि गाई गोपाळ सेवेसी ॥ ४ ॥९तुझिये निढळीं कोटी चंद्र प्रकाशे ।कमल नयन हास्य वदन हांसे ॥ १ ॥हाल कां रे कृष्णा डोल कां रे ।घडिये घडिये घडिये गुज बोल कां रे ॥ २ ॥उभा राहोनियां कैसा हालवितो बाहो ।बाप रखुमादेविवरू विठ्ठलु नाहो ॥ ३ ॥१०भक्तीचिया पोटीं बोध काकडा ज्योती ।पंचप्राण जीवें भावे ओवाळू आरती ॥ १ ॥ओवांळू आरती माझ्या पंढरीनाथा ।दोन्ही कर जोडोनि चरणीं ठेवीन माथा ॥ २ ॥काय महिमा वर्णू आतां सांगणे किती ।कोटी ब्रह्महत्या मुख पाहतां जाती ॥ ३ ॥राही रखुमाई दोही दो बाहीं ।मयूर पिच्छ चामरें ढाळिती ठायीं ठायीं ॥ ४ ॥तुका म्हणे दीप घेऊनी उन्मन ती शोभा ।विटेवरी उभा लावण्यगाभा ॥ ५ ॥ N/A N/A Last Updated : January 16, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP