मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह| निवडक अभंग संग्रह ७ निवडक अभंग संग्रह निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ६ निवडक अभंग संग्रह ७ निवडक अभंग संग्रह ८ निवडक अभंग संग्रह ९ निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह १२ निवडक अभंग संग्रह १३ निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १५ निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १७ निवडक अभंग संग्रह १८ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २२ श्री हनुमानजन्माचे अभंग श्रीरामजन्माचे अभंग श्रीकृष्ण जन्माचे अभंग मंगलाचरण पहिले काकड आरतीचे अभंग श्रीसदगुरु महिमा संतसंगमहिमा गौळण दळण विनंतीचे अभंग उपसंहार व वरप्रसाद श्रीसंत सदन महिमा क्षीरापतीचे अभंग प्रारब्धपर अभंग नक्र उद्धार नामधारकाची अधिकारश्रेष्ठता मुका काल्याचे अभंग जोहार जातें एडका दत्तस्तुती दान महात्म्य (महिमा) भजन ज्ञानेश्वर माउली बहिरा आरत्या मदालसा एकादशीचे अभंग द्वादशीचे अभंग चांगदेव पासष्टी निवडक अभंग संग्रह ७ निवडक अभंग संग्रह ७ Tags : abhangअभंग निवडक अभंग संग्रह ७ Translation - भाषांतर * जें सुख क्षीरसागरीं ऎकिजे । तें या वैष्णवामंदिरीं देखिजे ॥१॥ धन्य धन्य तें वैष्णवमंदिर । जेथें नामघोष होय निरंतर ॥२॥ दिंडी पताका द्वारी तुळसीवृंदावनें । मन निवताहे नामसंकीर्तनें ॥३॥ ज्याच्या दरुशनें पाप ताप जाये । भानुदास तयासी गीत गाये ॥४॥ * ब्रह्मीं स्फ़ुरें जें स्फ़ुरण शुद्ध सत्वांचे लक्षण । तो तुं लक्ष्यातीत परिपूर्ण रे ॥१॥ कान्हू सच्चिदानंदु शब्द अरुता रे । त्याही परता तूं निजानंदु रे ॥२॥ जेथें नाहीं गुणागुण नाहीं कार्यासी कारण । तो तूं गुणी गुणातीत परिपूर्ण रे ॥३॥ एका एकी जनार्दन भेद भाष्य वचन । तो तूं शब्दासी गिळून राहिलासी रे ॥४॥ * सर्व सुखाची लहरी । ज्ञानाबाई अलंकापुरी॥१॥ शिवपीठ हें जुनाट । ज्ञानाबाई तेथें मुगुट ॥२॥ वेदशास्त्र देती ग्वाही । म्हाणती ज्ञानबाई आई ॥३॥ ज्ञानाबाईचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥ * उदार भक्त उदार भक्त । त्रैलोकी मात जयाची ॥१॥ केला भगवदगीते अर्थ। ऎसे समर्थ तिहीं लोकीं ॥२॥ बोलविला रेडा चालविली भिंती । चांगदेवाते उपदेशिती ॥३॥ एका जनार्दनी समर्थ ते भक्त । देव त्यांचा अंकित दास होय ॥४॥ * भाव धरुनियां वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरि तयावरी ॥१॥ स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्नु अर्जुनेसी ॥२॥ तेचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचे । भय कळिकाळाचें नाही तया ॥३॥ एका जनार्दनीं संशय सांडोनी । दृढ धरी मनीं ज्ञानेश्वरी ॥४॥ * गीता गीता गीता वाचे जे म्हणती । नाहीं पुनरावृत्ति तया नरां ॥१॥ नित्य नेम वाचे वदतां अक्षरें । भवसिंधु तरे अर्धक्षणीं ॥२॥ एका जनार्दनीं जयाचा हा नेम तया पुरुषोत्तम न विसंबे ॥३॥ * भक्ति प्रेमावीण ज्ञान नको देवा । अभिमान नित्य नवा तयामाजी ॥१॥ प्रेम सुख देई प्रेम सुख देई । प्रेमवीण नाहीं समाधान ॥२॥ रांडवेनें जेविं शृंगार केला । प्रेमवीण झाला ज्ञानी तैसा ॥३॥ एका जनार्दनी प्रेम अति गोड । अनुभवी सुरवाड जाणतील ॥४॥ * अगाध तुझी लीला आकळे कैसेनी कळे । ब्रह्मा मुंगी धरुनी तुझें स्वरुप सांवळें ॥१॥ तुज कैसे भजावें आपणा काय देखावें । तुजमाजीं राहुनि तुजला कैसें सेवावें ॥२॥ अगा देव तूं आम्हां म्हणसी मानवी । हेम अलंकार वेगळे निवडावें केंवी ॥३॥ एका जनार्दनीं सबाह्याभ्यंतरी नांदे । मिथ्या स्वप्नजात जेंवि जाय ते बोधे ॥४॥ * झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम ह्रदयीं शेजे आला ॥धृ॥ गुरुकृपा निर्मळ भागिरथी । शांति क्षमा यमुना सरस्वती । असीपदें एकत्र जेथें होती । स्वानुभव स्नान हें मुक्तास्थिती ॥१॥ सद्बुद्धीचें घालुनि शुद्धासन । वरी सद्गुरुची दया परिपूर्ण । शमदम विभूति चर्चुनी जाण । वाचे उच्चारी केशव नारायण ॥२॥ बोध पुत्र निर्माण झाला जेव्हां । ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हां । भक्ति बहीण धावूनि आली गांवा। आतां संध्या कैसी मी करूं केव्हां ॥३॥ सहज कर्में झालीं तीं ब्रह्मार्पण । जन नोहे हा अवघा जनार्दन । ऎसें ऎकतां निवती साधुजन । एका जनार्दनीं बाणली निज खुण ॥४॥ * सगुण चरित्रें परम पवित्रें सादर वर्णावीं । सज्जन वृंदे मनोभावें आधीं वंदावीं ॥१॥ संतसंगे अंतरंगें नाम बोलवें । कीर्तनरंगी देवा सन्निध सुखें डोलावें ॥२॥ भक्तिज्ञानाविरहित गोष्टी इतर न कराव्या । प्रेमभरें वैराग्याच्या युक्ति विवराव्या ॥३॥ जेंणें करुनि मूर्ति ठसावी अंतरी श्रीहरीची । ऎसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरचीं ॥४॥ अद्वय भजनें अखंड स्मरणें वाजवी करटाळी । एका जनार्दनीं मुक्त होय तत्काळीं ॥५॥ N/A N/A Last Updated : January 23, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP