मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह| निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ६ निवडक अभंग संग्रह ७ निवडक अभंग संग्रह ८ निवडक अभंग संग्रह ९ निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह १२ निवडक अभंग संग्रह १३ निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १५ निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १७ निवडक अभंग संग्रह १८ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २२ श्री हनुमानजन्माचे अभंग श्रीरामजन्माचे अभंग श्रीकृष्ण जन्माचे अभंग मंगलाचरण पहिले काकड आरतीचे अभंग श्रीसदगुरु महिमा संतसंगमहिमा गौळण दळण विनंतीचे अभंग उपसंहार व वरप्रसाद श्रीसंत सदन महिमा क्षीरापतीचे अभंग प्रारब्धपर अभंग नक्र उद्धार नामधारकाची अधिकारश्रेष्ठता मुका काल्याचे अभंग जोहार जातें एडका दत्तस्तुती दान महात्म्य (महिमा) भजन ज्ञानेश्वर माउली बहिरा आरत्या मदालसा एकादशीचे अभंग द्वादशीचे अभंग चांगदेव पासष्टी निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १६ Tags : abhangअभंग निवडक अभंग संग्रह १६ Translation - भाषांतर * हेंचि थोर भक्ति आवडते देवा । संकल्पावी माया संसाराची ॥१॥ ठेविलें अनंतें तैसेचि राहावें । चित्तीं असा द्यावें समाधान ॥२॥ वाहिल्या उद्वेग दु :खचि केवळ । भोगणॆं तें फ़ळ संचिताचें ॥३॥तुका म्हणे घालूं तयावरी भार । वाहूं हा संसार देवापायीं ॥४॥*आपुला तो एक देव करुनि घ्यावा । तेणेंवीण जीवा सुख नव्हे ॥१॥येर तीं माईकें दु:खाचीं जनिती । नाहीं आदि अंती अवसानीं ॥२॥अविनाश करी आपुलिया ऎसें । लावीं मना पिसें गोविंदाचें ॥३॥तुका म्हणॆ एका मरणॆंचि सरे । उत्तमचि उरे कीर्ति मागें ॥४॥*चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलविते हरीवीण ॥१॥देखवी ऎकवी एक नारायण । तयाचें भजन चुको नको ॥२॥मानसाची देव चालवी अहंता । मीचि एक कर्तां म्हणोनियां ॥३॥वृक्षाचेंही पान हाले ज्याची सत्ता । राहिली अहंता मग कोठें ॥४॥तुका म्हणे विठो भरला सबाहीं । तया उणें काहीं चराचरीं ॥५॥*विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥आइका जी तुम्ही भक्त भागवत । कराल तें हित सत्य करा ॥२॥कोणाही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचें ॥३॥तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दु:ख जीव भोग पावे ॥४॥*चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती । व्याघ्रही न खाती सर्प तया ॥१॥विष तें अमृत आघात तें हित । अकर्तव्य नीत होय त्यासी ॥२॥दु:ख तें देईल सर्व सुख फ़ळ । होतील शीतळ अग्निज्वाळा ॥३॥आवडेल जीवां जिवाचिये परी । सकळां अंतरीं एक भाव ॥४॥तुका म्हणॆ कृपा केली नारायणें । जाणिजे तें येणें अनुभवें ॥५॥*संतकृपा झाली । इमारत फ़ळा आली ॥१॥ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिले देवालया ॥२॥नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ॥३॥जनार्दन एकनाथ । ध्वज उभारिला भागवत ॥४॥भजन करा सावकाश । तुका झालासें कळस ॥५॥बहिणी म्हणे पडकती ध्वजा । निरुपण केले वोजा ॥६॥*देखोनियां तुझ्या रुपाचा आकार । उभा कटीं कर ठेवूनियां ॥१॥तेणें माझ्या चित्ता होय समाधान । वाटतें चरण न सोडावे ॥२॥मुखें गातों गीत वाजवितों टाळी । नाचतों राउळीं प्रेमसुखें ॥३॥तुका म्हणे मज तुझ्या नामापुढें । तुच्छ हें बापुडें सकळही ॥४॥*मी अवगुणी अन्यायी । किती म्हणॊन सांगो काई । आतां मज पायी । ठाव देई विठ्ठले ॥१॥पुरे पुरे हा संसार । कर्म बळिवंत दुस्तर । राहों नेदी स्थिर । एके ठायीं निश्र्चळ ॥२॥अनेक बुद्धिचे तरंग । क्षणक्षणां पालटती रंग । धरुं जातां संग । तंव तो होतो बाधक ॥३॥तुका म्हणॆ आतां । अवघी तोडी माझी चिंता । येउनी पंढरीनाथा । वास करी ह्र्दयीं ॥४॥*पडतां जड भारी । दासीं आठवावा हरी ॥१॥मग तो हाऊं नेदी सीण । आड घाली सुदर्शन ॥२॥नामाच्या चिंतनें । बारा वाटा पळतीं विघ्नें ॥३॥तुका म्हणॆ प्राण । करा देवीसी अर्पण ॥४॥*आनंदाच्या कोटी । सांठवल्या आम्हां पोटीं ॥१॥प्रेम चालिला प्रवाहो । नाम ऒघ लवलाहो ॥२॥अखंड खंडेना जीवन । राम कृष्ण नारायण ॥३॥थडी आहिक्य परत्र । तुका म्हणे समतीर ॥४॥*अंतरींची घेतो गोडी । पाहे जोडी भावाची ॥१॥देव सोयरा देव सोयरा । देव सोयरा दीनाचा ॥२॥ आपुल्याच वैभवें । शृंगारावें निर्मळॆं ॥३॥तुका म्हणे जेवी सवें । प्रेम द्यावे प्रीतीचें ॥४॥*देह तिहीं बळें धरिला सायासें । करुनियां नास उपाधीचा ॥१॥पूर्वपक्षी धातु धिक्कारिलें जन । स्वयें जनार्दन तेचि झाले ॥२॥तुका म्हणॆ यासी न चले तांतडी । अनुभवें गोडी येईल कळों ॥३॥*ब्रह्मरस घेई काढा । जेणें पीडा वारेल ॥१॥पथ्य नाम विठोबाचें । आणीक वाचे न सेवी ॥२॥भवरोगा ऎसें जाय । आणीक काय क्षुल्लकें ॥३॥तुका म्हणे नव्हे बाधा । आणीक कदा भूतांची ॥४॥*संसार तो कोण लेखे । आम्हां सखे हरिजन ॥१॥काळ ब्रह्मानंदें सरे । आवडी उरे संचली ॥२॥स्वप्नीं तेही नाहीं चिंता । रात्रीं जाता दिवस ॥३॥तुका म्हणे ब्रह्मरसें । होय सरिसें भोजन ॥४॥*संसाराच्या नांवें घालूनियां शून्य । वाढता हा पुण्य धर्म केला ॥१॥हरिभजनें हें धवळिलें जग । चुकविला लाग कळिकाळाचा ॥२॥कोणाहि नलगे साधनांचा पांग । करणें केला त्याग देहबुद्धी ॥३॥तुका म्हणे सुख समाधी हरिकथा । नेणें भवव्यथा गाईल तो ॥४॥ N/A N/A Last Updated : January 23, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP