मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह| श्रीरामजन्माचे अभंग निवडक अभंग संग्रह निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ६ निवडक अभंग संग्रह ७ निवडक अभंग संग्रह ८ निवडक अभंग संग्रह ९ निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह १२ निवडक अभंग संग्रह १३ निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १५ निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १७ निवडक अभंग संग्रह १८ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २२ श्री हनुमानजन्माचे अभंग श्रीरामजन्माचे अभंग श्रीकृष्ण जन्माचे अभंग मंगलाचरण पहिले काकड आरतीचे अभंग श्रीसदगुरु महिमा संतसंगमहिमा गौळण दळण विनंतीचे अभंग उपसंहार व वरप्रसाद श्रीसंत सदन महिमा क्षीरापतीचे अभंग प्रारब्धपर अभंग नक्र उद्धार नामधारकाची अधिकारश्रेष्ठता मुका काल्याचे अभंग जोहार जातें एडका दत्तस्तुती दान महात्म्य (महिमा) भजन ज्ञानेश्वर माउली बहिरा आरत्या मदालसा एकादशीचे अभंग द्वादशीचे अभंग चांगदेव पासष्टी श्रीरामजन्माचे अभंग श्रीरामजन्माचेअभंग Tags : abhangramअभंगराम श्रीरामजन्माचे अभंग Translation - भाषांतर *कुळगुरु वसिष्ठ सांगे नृपवरा । असती गरोदरा तुझ्या कांता ॥१॥ धर्मशास्त्र ऎसें डोहळे पुसावें । त्यांचे पुरवावे मनोरथ ॥२॥ ऎकोनियां ऎसें आनंद मानसीं । कैकयी सदनासी जाता झाला ॥३॥ मंचकी बैसली होती ते पापिणी । देखतां नयनीं पहुडली ॥४॥ सुदरपणाचा अभिमान मनीं । त्यावरी गर्भिणी नामा म्हणे ॥५॥ * राजा म्हणे इच्छा तुझिये मानसीं । डोहळे मजसी सांग आतां ॥१॥ येरी म्हणे ऎसें वाटतसे जीवा । कनिष्ठासी द्यावा राज्यपट ॥२॥ ज्येष्ठासी धाडावें दुरी दिगंतरा । नये समाचारा त्याचा आम्हां ॥३॥ जनांत हें निंद्य वेदबाह्य कर्म । करितां अधर्म पाप बहु ॥४॥ माझिये मस्तकी ठेवावा हा दोष । तुम्हांकडे लेश काहीं नाहीं ॥५॥ निंदितील जन मज वाटे सुख । ऎकतांची दु :ख राया झालें ॥६॥वृश्र्चिकाचें पेंवीं तक्षक पडत । घालिताती घृत अग्निमुखीं ॥७॥ऎसी व्यथा होय नामा म्हणे त्यासी । उठिला त्वरेसी तेथोनियां ॥८॥*येतसे दशरथ सुमित्रामंदिरी । देखतां सामोरी येती झाली ॥१॥न माये आनंद तियेचें मानसीं। ठेवी मस्तकासी चरणावरी ॥२॥घालोनी आसन प्रक्षाळी चरण । सर्वांगी लेपन तीर्थोदकें ॥३॥गंध धूप दीप पुष्पांचिया माळा । अर्पूनी तांबुला उभी राहे ॥४॥कैकयीचें दु:ख विसरला राव । पाहोनियां भाव सुमित्रेचा ॥५॥होती जे डोहळे तुझिये मानसीं । सांग मजपाशी पतिव्रते ॥६॥प्राणनाथ ऎसें वाटतसें जीवा । वडिलांची सेवा अहर्निशीं ॥७॥आवडे हे एक नावडे आणिक । द्यावें मज एक हेंचि आतां ॥८॥ऎकतांचिअ ऎसें कांतेचें वचन । आनंदे निमग्न मन होय ॥९॥घेऊनियां हातीं रत्नांचें भूषण । टाकी ओवाळून नामा म्हणे ॥१०॥*दशरथ राजा उठिला तेथूनी । कौसल्येसदनीं जाता झाला ॥१॥पाहातसे दृष्टी तेव्हां श्रावणारी । न माये अंतरी तेज तिचे ॥२॥तुझिये मानसी होती जे डोहाळे । सांग वो वेल्हाळे मजपासी ॥३॥उदरांत असे भक्तांचा कैवारी । तेथें उरी देहभावा ॥४॥सदा समाधिस्थ रामरुप झाली । कौसल्या माऊली नामा म्हणे ॥५॥*न बोलेचि कांहीं इसीं काय झालें । भूतें झडपिलें निश्र्चयेसी ॥१॥माझिये अदृष्टीं नाहीं हा नंदन । म्हणोनियां विघ्न ओढवले ॥२॥निवारी हें विघ्न वैकुंठनायका । रक्षीं या बाळका सुदर्शने ॥३॥तुझा मी किंकर आजि अंबुजाक्षा । द्यावी मज भिक्षा हेंचि आतां ॥४॥नामाचा उच्चार ऎकतांचि कानीं । नेत्र उघडोनि पाहती झाली ॥५॥राजा म्हणे कां हो ऎसी अवस्था । कां हो भ्रम चित्ता झाला असे ॥६॥विश्वाचा मी आत्मा स्वयें असे राम । मजमाजीं भ्रम कैचा असे ॥७॥अवतार महिमा वाणी वेद माझा । सुरवरांच्या काजा नामा म्हणॆ ॥८॥*रावणे हें केलें लग्नामाजी विघ्न । असे कीं स्मरण तुजलागी ॥१॥आणि रे धनुष्य मारीन रावणा । लंका बिभीषण देईन मी ॥२॥अंगद सुग्रीव जांबुवंत वीरा । हनुमंत पाचारा लवकरी ॥३॥टाकोनी पर्वत बुजवा रे सागरा । पायवाट करा जावयासी ॥४॥लंकेपुढे मोठे माजवीन रण । तोडीन बंधन सुरवराचें ॥५॥विश्वामित्र याग नेईन मी सिद्धि । मारीन कुबुद्धि दोघा जणा ॥६॥खर दुषणाचा घेईन मी प्राण । धनुष्य मोडीन भुजाबळे ॥७॥ध्याती मज त्यासी बहुत आवडी । न विसम्बे घडी त्यासी एक ॥८॥बोलीला वाल्मिक तैसेंचि करीन । वर्तोनि दावीन नामा म्हणे ॥९॥*परब्रम्ह पूर्ण आलें माझे घरीं । न कळे अंतरीं नृपाचिया ॥१॥करीती बडबड होती भूत चेष्टा । पाचारा वसिष्ठा लवकरी ॥२॥येऊनि वसिष्ठ पाहे कौसल्येसी । नावरती तियेसी अष्टभाव ॥३॥राजा म्हणे कैसें विपरीत झालें । वसिष्ठा झडपिलें महाभूतें ॥४॥श्रावणवधाचें अध नाहीं जळालें । दुजें हें निर्मिलें प्रारब्धासी ॥५॥ऎकतांचि हासे सावध होऊनि । बोलतसे झणी नामा म्हणे ॥६॥*विरंचीचा बाप क्षीरसागरवासी । ध्याती योगी त्यासी निरंतर ॥१॥पुरेहूनिपर वैखरीहूनि दुरी । कौसल्येंचे उदरीं तोचि असे ॥२॥बोलियेंलें जें जें नव्हे असत्य वाणी । न येऊं दे मनीं शंका कांही ॥३॥माझें हें संचित धन्य धन्य आतां । पाहीन मी कांता लक्षुमीचा ॥४॥धन्य धन्य धन्य अयोध्येचे लोक । वैकुंठनायक पाहतील ॥५॥धन्य पशुपक्षी श्वापदें तरुवर । राजा रघुवीर पाहतील ॥६॥त्रैलोक्यांत धन्य तूंचि एक नृपा । नामयाच्या बापा पाहशील ॥७॥*उत्तम हा चैत्रमास । ऋतु वसन्ताचा दिवस ॥१॥शुक्लपक्षी ही नवमी । उभे सुरवर ते व्योमीं ॥२॥मध्यान्हासी दिनकर । पळभरी होय स्थिर ॥३॥धन्य मीच त्रिभुवनीं । माझे वंशीं चक्रपाणि ॥४॥सुशोभित दाही दिशा । आनंद नरनारी शेषा ॥५॥नाहीं कौसल्येसी भान । गर्भी आले नारायण ॥६॥अयोनी सम्भव । प्रगटला हा राघव ॥७॥नामा म्हणे डोळां । पाहीन भूवनत्रयपाळा ॥८॥ N/A N/A Last Updated : January 23, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP