मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|निवडक अभंग संग्रह| निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह निवडक अभंग संग्रह १ निवडक अभंग संग्रह २ निवडक अभंग संग्रह ३ निवडक अभंग संग्रह ४ निवडक अभंग संग्रह ५ निवडक अभंग संग्रह ६ निवडक अभंग संग्रह ७ निवडक अभंग संग्रह ८ निवडक अभंग संग्रह ९ निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह ११ निवडक अभंग संग्रह १२ निवडक अभंग संग्रह १३ निवडक अभंग संग्रह १४ निवडक अभंग संग्रह १५ निवडक अभंग संग्रह १६ निवडक अभंग संग्रह १७ निवडक अभंग संग्रह १८ निवडक अभंग संग्रह १९ निवडक अभंग संग्रह २० निवडक अभंग संग्रह २१ निवडक अभंग संग्रह २२ श्री हनुमानजन्माचे अभंग श्रीरामजन्माचे अभंग श्रीकृष्ण जन्माचे अभंग मंगलाचरण पहिले काकड आरतीचे अभंग श्रीसदगुरु महिमा संतसंगमहिमा गौळण दळण विनंतीचे अभंग उपसंहार व वरप्रसाद श्रीसंत सदन महिमा क्षीरापतीचे अभंग प्रारब्धपर अभंग नक्र उद्धार नामधारकाची अधिकारश्रेष्ठता मुका काल्याचे अभंग जोहार जातें एडका दत्तस्तुती दान महात्म्य (महिमा) भजन ज्ञानेश्वर माउली बहिरा आरत्या मदालसा एकादशीचे अभंग द्वादशीचे अभंग चांगदेव पासष्टी निवडक अभंग संग्रह १० निवडक अभंग संग्रह १० Tags : abhangअभंग निवडक अभंग संग्रह १० Translation - भाषांतर * कृष्णा माझी माता कृष्णा माझा पिता । बहिणीबंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥ कृष्ण माझा गुरु कृष्ण माझें तारुं । उतरी पैल पारुं भवनदी ॥२॥ कृष्ण माझें मन कृष्ण माझे जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥ तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥४॥ * गाढवाचे घोडें । आम्ही करुं दृष्टीपुढें ॥१॥ चघळी वाहाणा । माघारिया बांडा सुना ॥२॥ सोंग संपादणी । तरी करुं शुद्ध वाणी ॥३॥ तुका म्हणे खळ । करुं समयी निर्मळ॥४॥ * दिनरजनी हाचि धंदा । गोविंदाचे पवाडे ॥१॥ संकल्पिला देह देवा । सकळ हेवा तये ठायीं ॥२॥ नाहीं अवसान घडी । सकळ जोडी इंद्रियां ॥३॥ किर्ती मुखें गर्जे तुका । करी लोकां सावध ॥४॥ * धर्माचे पाळन । करणें पाखांड खंडण ॥१॥ हेंचि आम्हां करणें काम । बीज वाढवावें नाम ॥२॥ तीक्ष्ण उत्तरें । हातीं घेऊनि बाण फ़िरे ॥३॥ नाहीं भीड भार । तुका म्हणे साना थोर ॥४॥ * धन्य देहु गांव पुण्यभूमि ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ॥१॥ धन्य क्षेत्रवासी लोक ते दैवाचे । उच्चारिती वाचे नामघोष ॥२॥ कर कटी उभा विश्वाचा जनिता । वामांगी ते माता रखुमादेवी ॥३॥ गरुडपारीं उभा जोडूनियां कर । अश्वत्थ समोर उत्तरामूख ॥४॥ दक्षिणे शंकर लिंग हरेश्वर । शोभे गंगा नीर इंद्रायणी ॥५॥ लक्ष्मीनारायण बल्लाळाचे बन । तेथें अधिष्ठान सिद्धेश्र्वर ॥६॥ विघ्नराज द्वारी बहिरव बाहेरी । हनुमंत शेजारी सहित दोघे ॥७॥ तेथें दास तुका करितो कीर्तन । ह्रुदयी चरण विठोबाचे ॥८॥ * मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदू ऎसे ॥१॥ मेले जित असो निजलिया जागें । जो जो जें जें मागे तें तें देऊं ॥२॥ भले तरी देऊं गांडीची लंगोटी । नाठाळाचे काठी देऊं माथा ॥३॥ मायबापहूनि बहु मायावंत । करुं घातपात शत्रुहूनि ॥४॥ अमृत तें काय गोड आम्हांपुढे । विष तें बापुडें कडू किती ॥५॥ तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड । जया परे कोड त्याचे परी ॥६॥ * मागें बहुता जन्मी । हेंचि करीत आलों आम्ही । भवतापश्रमीं । श्रमले जे विनवूं त्या ॥१॥ गर्जो हरीचे पवाडे । मिळों वैष्णव बागडे । पाझर रोकडे । काढूं पाषाणामध्यें ॥२॥ भाव शुद्ध नामावळी । हर्षे नाचों पिटूं टाळी । घालुं पायातळी । कळिकाळ त्याबळें ॥३॥ काम क्रोध बंदीखानी । तुका म्हणे दिले दोन्ही । इंद्रियांचे धनी । आम्ही झालों गोसावी ॥४॥ * वेद अनंत बोलिला । अर्थ इतकाचि साधिला ॥१॥ विठोबासी शरण जावें । निजनिष्ठे नाम गावे ॥२॥ सकळ शास्त्रांचा विचार । अंती इतुकाची निर्धार ॥३॥ अठरा पुराणीं सिद्धांत । तुका म्हणे हाचि हेत ॥४॥ * न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो ॥१॥ ऎसी माझी वाचा मज उपदेशी । आणिक लोकांसी हेंची सांगे ॥२॥ विटंबो शरीर होत कां विपत्ती । परि राहो चित्तीं नारायण ॥३॥ तुका म्हणे नाशिवंत हें सकळ । आठवे गोपाळ तेंचि हित ॥४॥ * श्रीसंतांचिया माथा चरणावरी । साष्टांग हे करी दंडवत ॥१॥ विश्रांती पावलों साभाळा उत्तरी । वाढलें अंतरी प्रेमसुख ॥२॥ डौरली हे काया कृपेच्या वोरसें । नव्हे अनारिसें उद्धरलों ॥३॥ तुका म्हणे मज न घडतां सेवा । पूर्वपुण्यठेवा ऒढवला ॥४॥ * अर्भकाचेसाठीं । पंतें हातीं धरिली पाटी ॥१॥ तैसें संत जगीं । क्रिया करुनी दाविती अंगी ॥२॥ बाळकाचे चाली । माता जाणूनि पाऊल घाली ॥३॥ तुका म्हणे नाव । जनासाठीं उदकीं ठाव ॥४॥ * अवघा तो शकुन । ह्रुदयी देवाचे चरण ॥१॥ येथें नसतां वियोग । लाभा उणें काय मग ॥२॥ संग हरीच्या नामाचा । शुचिर्भुत सदा वाचा ॥३॥ तुका म्हणे हरीच्या दासा । शुभ काळ दाही दिशा ॥४॥ N/A N/A Last Updated : January 23, 2008 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP