मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ज्ञानोदय भजनी मालिका| विश्वव्रह्म आरती आणि विश्वब्रह्मकृत श्लोक सप्तक ज्ञानोदय भजनी मालिका परिचय अनुक्रमणिका मालिका १ प्रतिपदा मालिका २ द्वितिया मालिका ३ तृतीया मालिका ४ चतुर्थी मालिका ५ पंचमी मालिका ६ षष्टी मालिका ७ सप्तमी मालिका ८ अष्टमी मालिका ९ नवमी मालिका १० दशमी मालिका ११ एकादशी मालिका १२ द्वादशी मालिका १३ त्रयोदशी मालिका १४ चतुर्दशी मालिका १५ पौर्णिमा आरती काल्याचे अभंग कीर्तन महात्म्य पंढरी महात्म्य ज्ञान महात्म्य विश्वव्रह्म आरती आणि विश्वब्रह्मकृत श्लोक सप्तक विश्वव्रह्म आरती आणि विश्वब्रह्मकृत श्लोक सप्तक श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे. Tags : bhajandnyanodaymarathiज्ञानोदयभजनमराठी विश्वव्रह्म आरती आणि विश्वब्रह्मकृत श्लोक सप्तक Translation - भाषांतर आरती विश्वव्रह्माची आरती विश्वब्रह्मासी ॥ ज्ञान वैराग्ये शीलासी ॥ मुर्ती सात संवत्सराची ॥ बुध्दी विदेह स्थितीची ॥१॥ ॥आ०॥भक्तीचे प्रेम असे भारी ॥ सांगु तरी काय वर्णू थोरी ॥ निशिदीनी निष्ठा भजनासी ॥ चातका मेघ बिंदु जैसी ॥२॥ ॥आ०॥पांचवें संवत्सरी मुहुर्त ॥ केली विद्या सुरवात ॥ एक पक्षाचे आतंत ॥ ॐ स्वर व्यंजनें सहीत ॥३॥दुसरे पक्षी शिक्षण ॥ बाराखडी अंक पाढे हे पूर्ण ॥ सहा मासापर्यंत ॥ ज्ञानेश्वरी भागवत वाचवी ग्रंथ ॥४॥॥आ०॥दो मासी शिक्षण ज्योतिषपंचांग अर्थ ज्ञन ॥ सातवे संवत्सरे भरती ॥ सांगे भूतभविष्य गणती ॥५॥ ॥आ०॥जनका आत्मजे बोले बोली ॥ पिताजी तुमची सेवा सरली ॥ मृत्यु समयाची वेळ ॥ सांगे स्वमुखें प्रांजळ ॥६॥ ॥आ०॥आषाढ वद्य नवमीचे दिवशी ॥ तिसरे प्रहर समयासी ॥ आले ह्मणे देवदूत ॥ पुष्पवटीके सहीत ॥७॥ ॥आ०॥चला ह्मणती प्रेमयुक्त ॥ मजला जाने निश्चित ॥ स्वामीसी कष्ट वणे नोव्हो ॥ माते अंती आली गांवे ॥८॥ ॥आ०॥मातेनें ह्रदयीं अलिंगीली ॥ मांडीवरी शयनिली ॥ आईजी ह्मणी सरली सेवा ॥ मजला महीवरी निजवा ॥९॥ ॥आ०॥धरणीवरी नीजविता क्षणी मातेसी ह्मणी स्मरा चक्रपाणी ॥ आप्तजना पांचारी जनक जननीस नमस्कारी ॥१०॥ ॥आ०॥आणा ह्मणे तुळसी दळ ॥ स्वमुखें घाला मोक्ष वेळ ॥ स्वमुखें बोले रामध्वनी ॥ गेला मोक्षाचे सदनी ॥११॥ ॥आ०॥नाही मोहामध्यें फसला ॥ धन्य तो वज्ररुप झाला ॥ महिमा वर्णु तरी काय ॥ लक्षुमण पदी ठेवी डोई ॥१२॥आरती विश्वब्रह्मासी ॥धृ०॥==॥ विश्वब्रह्मकृत श्लोक सप्तक ॥जगीं ब्रह्म तो विश्वी विश्वास मनिली ॥ तयाची दुर्मती विश्वी ज्ञान बहुति आटली ॥१॥तया नराचा धन्य नरदेह फळला ॥ तया फळे पीयुष परी रस गोड आला ॥२॥तया रसे पुनर्जन्म निमाला ॥ सागरी लाट सागरात जिरला ॥३॥तया नराची भेटी व्हावें त्वरेनी ॥ मागणें हेची असे चक्रपाणी ॥४॥तयाचे दर्शनें धन्य लाभ झाला ॥ ज्ञान गभस्ती उगवता तिमीरी शत्रुचा नाशांत झाला ॥ शून्यांत आकार ऊकार मिळवीता ॥तो आकारासी आला तत्वता ॥६॥जयाचे दर्शनें पूर्ण विचार करित ॥ तो पूर्णची उरे पूर्णता ॥७॥ N/A References : N/A Last Updated : December 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP