मालिका ३ तृतीया

श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे.


॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥
(॥ रुप पाहातां लोचनी॥ ) आणि (॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)
अभंग -- १
श्री नामदेव महाराज वाक्य--
वैष्णवां घरीं सर्वकाळ । सदा झणझाणती टाळ ॥१॥
कण्या भाकरीच खाणें । गाटी रामनाम नाणे ॥१॥॥धृ०॥
बैसावयासी कांबळा । द्वारी तुळसी रंगमाळा ॥२॥
घरी दुभे कामधेनु । तुपावरी तुळशी पानु ॥३॥
फराळासी पीठ लाह्या । घडी घडी पडती पायां ॥४॥
नामा ह्मणे नेणति कांही । चित्राअखंडीत विठठल पायी ॥५॥॥धृ०॥
ऐसे नाममंत्रें जेणे । धातया अढंच करणें । याचे स्वरुप ऐक ह्मणे । श्रीकांतु तो ॥४१॥
तरी सर्व मंत्राचा राजा तो प्रणव आदिवर्ण बुझा आणि तत्कारु दुजा । तिजा सत्कारु ॥३४२॥ ॥धृ०॥ ज्ञा०अ०१७

अभंग -- २
श्रीनामदेव वाक्य--
संताचे लक्षण ओळखवया खूण । जो दिसें उदासीन देहभावा ॥१॥
संताचे अंतरी प्रेमाचा जिव्हाळा । वाचे वसे चाळा रामकृष्ण ॥२॥
त्या संताचे चरण देखीन मी दृष्टीं । जळती कल्पकोटी पापराशी ॥३॥
जयाच्या ह्र्दयीं प्रेमाचा जिव्हाळा । जीवें भावें गोपाळा न विसंबती ॥४॥
त्याचे अंगणीचा होईन सांडवा मग तुं केशवा नुपेक्षिसी ॥५॥
तुझ्या ध्यानी ज्याचे सदा भरलें मन । विश्व तुंचि म्हणोन भजती भावें ॥६॥
त्याच्या उष्टावळींचा होईन मागता । तरीच पंढरी नाथा भेटी देसी ॥७॥
ऐसे त्या नजि बोधें जे निवाले । ते जीवा वेगळें न करी नामा म्हणें ॥८॥॥धृ०॥
त्या नांव कृपाळुता । हे पहीले लक्षण संता । दुसरे ते अद्रोहता । ऐक आता सांगेन ॥८
हे जाणपा अद्रोहता । तिसरे लक्षण तत्वता । तीतीक्षा ते ऐक आतां । सहनशीलता साधुशी ॥८३५॥
शांति सकळ वैभवेशी । अखंड असे संतापासी । यालागीं सहनशीलता तयासी । अहर्निशी अनीवार ॥८३९॥
यापरी सत्यसंत दृष्टी । सत्यसार आले पुष्टी संत बळे वाढले सृष्टीसत्ये भेटी परब्रह्मी ॥८४४॥
ज्यासी सबाह्य सत्यत्वे तुष्टी । जे सत्ये धालिदे ढेंकर दृष्टि । ज्याची वाचा उठी सत्यत्वे ॥८४७॥
या नांव जाणा सत्याचे सार । हे मज मान्ये संतसाचार । मी निरंतर त्यापाशी ॥८४८॥ ए०भा०अ०११

जिही सत्याची वाउनी आण । ज्यामाझी सत्य सप्रमाण । जे सदा सत्यत्वे संपन्न । ;हे मुख्ये लक्षण साधुचे ॥८४९॥
या नांव सत्याचार । संतलक्षण साचार । हा चौथा गुण साधर । आनवद्या आसार ते ऐक ॥८५०॥
निंदा आसुयादी दोष समस्त । निज आत्मबोधे प्रक्षाळीत अत्यंत निर्मळ केले चित्त । आनंदीत नीजबोधे ॥८५१॥
गुरु आज्ञातीर्थे न्हाला । माघाची सर्वांगी निवाला । त्रिविध तापे सांडवला ॥ पवित्र झाला मद्र्पे ॥८५२॥
काय सांगु त्याची पवित्राता । तीर्थे मागती चरण तीर्था । मी ही पदरज बांछित । इतरांची कथा कायेसी ॥८५३॥
कृष्ण म्हणे उध्दवा । हा अनवद्य गुण पाचवा । ऐक आता सहावा । समसर्वा समभावें ॥८५४॥
निजरुपे सर्वसमता । समची देखे सर्व भुता । निज द्वेषानिमाली विषमता । जेवी सैंधवता सागरी ॥८५५॥
नाना अलंकार पदार्थ । सोनेपणें विकत घेता ॥ ते ते पदार्थ न मोडितां ॥ स्वभावना समसोने ॥८५६॥
तैसे नानाकार नानानाम । आवघे जगदीसे विषम । साधुसी चिद्रुप सर्वसम । न देखे । विषम निजबोधे ॥८५७॥
ऐशिये सर्व साम्ये आवस्थेशी । दैवे आलीया सुखदु:खासी । तेहि मुकली द्वंद्व भावासी । सहजे समरसी । निजसाम्ये ॥८५८॥
सव्ये मिनळि या महा नदीसी । आपमध्ये आल्या गावरसासी । गंगा डोही तेही समरसी । गुणदोषशि उडवुनी ॥८५९॥
तेथे पवित्र अपवित्रता । बोलूची नये सर्वथा ॥ गोड कडुपणाची वार्ता । निजांगे समस्त करि गंगा ॥८६०॥
तैसे सुखदु:खाचे भान साधुसी समत्वे समान । सदा निजबोधे संपन्न । हे आगाध लक्षण संताचे ॥८६१॥
जैसे भयाभय वार्ता । द्वैतभाव उठी सर्वथा । साधु उभयमे साम्ये पुरता । भय निर्भयता तो नेणे ॥८६३॥
द्वंद्व साम्ये परिपूर्ण ॥ साधुचा हा सहावा गुण । एक सातवे लक्षण । परोपकारी पण तयाचे क॥८६४॥
तैसा कायावाचा मावसापाणे । साधु वाढला उपकाराकारणे । आपुले पारखे ह्मणे नेणे । उपकार करणे सर्वासी ॥८६८॥
कावळे चंद्रासी हेळसीती चकोर चंद्रामृत सेविती । तेवी दुष्ट साधुते धि:कारिती । भावार्थी पावती निजलाभु ॥८७२॥
लक्षणाच्या उभारा । सांगितले परोपकारा । पुढील लक्षणे अकरा । सम निर्धारा सांगत ॥८७३॥
एवं उभयपरी पाहतां । काम नीमाला सर्वथा । आठवे लक्षण तत्वता । सकामता साधुची ॥८७८॥
बाहे इंद्रिये करीता नेम । अंतरीचे प्रगटे ब्रह्म । हा ब्राह्मेंद्रियाचा नेम । आत्माराम जाणती ॥८८३॥
ऐसी बाह्येंद्रिय नियमकता । हे जाणवी दाकता । हा नववा गुण तत्वता । ऐक आतां दशमाते ॥८८६॥
पींजल्या कापसाचा गोळा । फोडूं नेणे कोणाच्या कपाळा । तैसा साधुचा जीव्हाळा । आति जिव्हाळा सर्वासी । साधुची अति मृदुता या नांव जाणा सर्वथा हे दशम लक्षण योगता । एक आतां आकरावे ॥८८९॥
साधुची जे शुचिष्मता । ते भगवद्भक्तीजनांचे तत्वता । व्रत तप दानादि तीर्ता । शुचिष्मता त्याचेनी ॥८८९॥
परदारा आणि परधना सर्वथा नातळी ज्याचे मन । गंगादि तीर्थे त्याचे जाण । चरण दर्शन वांछीत ॥८९०॥
पडली या मगर मीठी न सांडी प्राण संकटी सापडे ते सगळेची घोटी । तैसी पडली मीठि जीव ब्रम्हा ॥८९३॥
कर्म करी तो लोक म्हणती । तो वर्तताहे ब्रह्मास्थिती । लोक:प्रतीति कळेना ॥८९५॥
कुलाल भांडे करुनी उतरी । चक्र भोवो पूर्वील भवरी । तैसा साहु पूर्व संस्कारी स्वकर्मे स्वकरी वृत्ती शून्यें ॥८९६॥
हे साधु लक्षण अत्यंत अती पवित्र । ऐक विचित्र ते बारावे ॥८९७॥
स्फटीकु काजळी दिसे काळा । आरक्ती आरक्त टिळा । नीळ वर्णी भासे नीळा । तरी तो वेगळा शुध्दत्वें ॥८९९॥
चिन्मात्रे जडले मन । विश्व झाले चैतन्ये घन । बुडाले परिग्रहाचे भान । आकिंचन पण या नावो ॥९०४॥ ए०भा०अ०११

ज्ञा०अ०९ -- जैसा दिपे दिपु लाविजे तेथें आदिल कोण हे नीळ खीजे । तैसा सर्वस्वे जो मज भजे । तो मीची होऊनि ठाके ॥४२८॥

अभंग -- ३
श्रीतुकाराम महाराज वाक्य --
गंगाजळ पाही पाठीं पोट नाहीं । अवगुण तो कांही अमृतासी ॥१॥
रवि दीप काळिमा काय जाणे हिरा । आणिकां तिमिरा नाश तेणी ॥२॥
कर्पूर कांडणी काय कोंडाकणी सिंधु मिळवणी काय चाले ॥३॥
परिस चिंता मणि आणिकाचा गुणी । पालटे लागोनि नव्हे तैसा ॥ तुका म्हणी तैसे जाणा संतजन । सर्वत्रे संपूर्ण गगन जैसा ॥५॥ ॥धृ०॥
माधुर्ये चांदिका । सरिसी राया रंका । तैसा जो सकळिकां भूता सम ॥२०४॥
आघविया जगा एक । सेव्य जैसे उदक  तैसें जयातें तिन्ही लोक । काक्षिती गा ॥२०५॥

अभंग -- ४
श्रीतुकाराम महाराज वाक्य --
तरिच शोभे वेडी । नग्न होय धडफाडी ॥१॥
काय बोलाचे गौरव । आंत वरी दोन भांव ॥२॥
मृगजळ न्याहाळितां । ताहान नवजे सेवितां ॥३॥
न पाहे आणिकांची आस । शूर बोलिजे तयास ॥४॥
तुका म्हणे या लक्षणे । संत अळकांर लेणे ॥५॥॥धृ०॥
ज्ञा. अ. १२ -- जो खांडवया घावो घाली । का लावणी जयाने केली । दोघा एकची साउली । बृक्षे जैसा ॥१०९९॥
ना तरी ईक्षुदंडु ॥ पाळितया गोडु गाळी तया कडु ॥ नोहेची जेवी ॥२००॥

अभंग -- ५
श्रीतुकाराम महाराज वाक्य --
भक्त ऐसे जाणा जे देही उदास । गेले आशापाश निवारोनी ॥१॥
विषय तो त्यांचा झाला नारायण । नावडे धनजन मातापिता ॥२॥
निर्वानी गोविंद असे मागे पुढें पै कांहीच सांकडे पडो नेदी ॥३॥
तुका ह्मणी सत्य कर्मा व्हावे साह्य । घातलिया भय नर्का जाणे ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा. अ. १२ -- जो यथालागे न तोखे । आलाभे न पारुखे । पाउसेवीण न सुके । समुद्र जैसा ॥२१०॥
यशलाभ हानी मृत्यु । देहासी आदृष्टे आसे होतू । ज्ञाता देहासि आलिप्तु । जैसा घटातु चंद्रमा ॥६४५॥

अभंग -- ६
श्रीतुकाराम महाराज वाक्य --

मुक्ति पांग नाहीं विष्णुचियां दासां । संसार तो कैसा न देखती ॥१॥
बैसला गोविंद जडोनियां चित्ती । आदि तेचि अंति अवसानी ॥२॥
भोग नारायणा देऊनि निराळी । ओविया मंगळी तोचि गाती ॥३॥
बळबुध्दी त्यांची उपकारासाठी । अमृत तें पोटी सांठविले । दयावंत तरी देवाच सारिखी ॥ आपुली पारखी नोळखती ॥५॥
तुका ह्मणे त्यांचा जीव तोचि देव । वैकुंठ तो ठाव वसती ते ॥६॥ ॥धृ०॥
ज्ञा. अ. १२ वा -- आही तयाचे करुं ध्यान । ते आमुचे देवतार्चन । त वाचुनि आन । गोमटे नाही ॥२३६॥
तयाचे आम्हां व्यसन । ते आमुचे निधिनिधान ॥ किंबहुना समाधान । ते मीळती पै ॥२३७॥

अभंग -- ७
श्रीतुकाराम महाराज वाक्य --

उपकारी असे आरोनि उरला । अपुले तयाला पार नाही ॥१॥
लाभा वरिद्यावें सांपडले काम । आपला तो श्रेम न विचारी ॥२॥
जिवा ऐसे देखे आणिका जिवांसी । न कळेचि राणी गुणांचीच ॥३॥
तुका ह्मणे देव तयाचा पांगिला । न भंगे संचला धीर सदा ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा. अ. १२ -- पार्था जयाचि या ठायी । वैषम्याची वार्ता नाहीं रिपू मित्र दोहि । सारिखा पाडु ॥९७॥
कां घरिचियां उजेड करावा । पारखिया आंधार पाडावा । हें लेणेंचि गा पांडवा दीप जैसा ॥९८॥

अभंग -- ८
श्रीतुकाराम महाराज वाक्य --

वैष्णव तो जया । अवघी देवावरी माया ॥१॥
नाहीं आणिक प्रमाण । तनधन तृष्ण जन ॥२॥
पडातां जड भारी ॥ नेमा न टळे निर्धारी ॥३॥
तुका म्हणे याती । होका तयाची भलती ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा. अ. १२ -- आणिकहि जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव । तयां मी वाचुनि धांव । आनौती नाही ॥७९॥

अभंग -- ९
श्रीतुकाराम महाराज वाक्य --

जे कां रंजले गांजले । त्यासी ह्मणे जो आपुले ॥१॥
तोचि साधु ओळखावा देव तेथेचि जाणावा ॥२॥
मृदुसबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ॥३॥
ज्यासि आपांगिता नाही । त्यासी धरी जो ह्र्दयी ॥४॥
दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ॥५॥
तुका ह्मणे सांगू किती । तोचि भगवंताची मूर्ती ॥६॥ ॥धृ०॥
ज्ञा. अ. १२ -- जे पुरुषार्थ सिध्दी चौथी । घेऊनि आपुलिया हाती । रिगाला भक्तिपंथी ॥ जगा देत ॥२१९॥
तयाचिया गुणांची लेणी । लेववूं आलिये वाणी । तयाची कीर्ती श्रवणी । आम्ही लेऊं ॥२२२॥
तो पाहावा हे डोहळे । ह्मणोनि अचक्षुसि मज डोळे । हातीचेनि लीला कमळे । पुजूं तयातें ॥२२३॥

अभंग -- १०
श्रीतुकाराम महाराज वाक्य --

हिरा ठेवितां ऐरणी । वांचे मारिता तो घणी ॥१॥
तोची मोलां पांवे खरा ॥२॥
मोहरा तोचि आगे । सूत न जळे ज्याचे संगे ॥३॥
तुका ह्मणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा. अ. १० -- अगा अवचिया कां पुरा । माजि सांपडला हिरा । वरि पडलियां नीरा । नागवे कांही ॥७८॥
तैसा मनुष्य लोकां यांत । तो जरी जाहला प्राकृत । प्रकृति दोषाची मातू । नेणेचि की ॥७९॥

अभंग -- ११
श्रीतुकाराम महाराज वाक्य--

ज्ञानध्यान जप तप ते साधन । ते हे संत निधान सखे माझे ॥१॥
संतापायी आधी जावे वो शरण । संसार बोळवण होय तेणे ॥२॥
तयाचे हें मूल संताचे ते पाय । आणिक उपाय नाहीं नाही ॥३॥
द्वैत आद्वैताचा न संरचि कोंभ । तो हाचि स्वयंभ संत संग ॥४॥
एक जनार्दनि परब्रह्म नाम । द्वैतकिर्या कर्म तेथें नाही ॥५॥
ज्ञा. अ. ६ -- ऐसे भक्त चकोर चेंद्रे । बोलिले गुणसमुद्रे । त्रिभुवनै कनरेंद्रें । संजय ह्मणे ॥४८६॥

अभंग -- १२
श्रीतुकाराम महाराज वाक्य--

सांगता हें नय सुख । कीती मुख न पुरे ॥१॥
आवडीनें सेवन करुं । जीवीच ॥२॥
उपमा या देतां लाभा । कशा शोभा सारखी ॥३॥
तुका ह्मणे नुचली डोई । ठेविली पाय़ी संताअचे ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा. अ. १२ -- कैवल्याचा अधिकारी । मोक्षाचि सोडि बांधीकरी । की अलाचिये परी । तळवट घे ॥२२०॥

भजन
श्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥
आरत्या --
१ झाले समाधान । तुमचे देखि०
२ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी०  
३ प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ०
४आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥
भजन --
घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥
अभंग नाचाचे ---मागणे हे एक तुजप्रती ।
भजन---ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम
प्रसाद ---पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि०
शेजआरती --
१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार
२. चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥
मागील मालिकेप्रमाणे म्हणावे
पुंडलीक वरदे हरि विठठल श्रीज्ञानदेव तुकाराम

N/A

References : N/A
Last Updated : December 05, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP