मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ज्ञानोदय भजनी मालिका| मालिका ४ चतुर्थी ज्ञानोदय भजनी मालिका परिचय अनुक्रमणिका मालिका १ प्रतिपदा मालिका २ द्वितिया मालिका ३ तृतीया मालिका ४ चतुर्थी मालिका ५ पंचमी मालिका ६ षष्टी मालिका ७ सप्तमी मालिका ८ अष्टमी मालिका ९ नवमी मालिका १० दशमी मालिका ११ एकादशी मालिका १२ द्वादशी मालिका १३ त्रयोदशी मालिका १४ चतुर्दशी मालिका १५ पौर्णिमा आरती काल्याचे अभंग कीर्तन महात्म्य पंढरी महात्म्य ज्ञान महात्म्य विश्वव्रह्म आरती आणि विश्वब्रह्मकृत श्लोक सप्तक मालिका ४ चतुर्थी श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे. Tags : bhajandnyanodaymarathiज्ञानोदयभजनमराठी उपदेशपर विचार Translation - भाषांतर ॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥(॥ रुप पाहातां लोचनी॥ ) आणि (॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)अभंग -१श्री नामदेव महाराज वाक्य--शब्दाचें सुख श्रवणाचे ने द्वारे । माझिया दातारे ऐसें केले ॥१॥स्पर्शाच सुख त्वचेचेनि द्वारे । माझि ॥२३॥रुपाच सुख नेत्राचेनि द्वारे । माझि० ॥३॥रसाचे सुख रसनेचेनि द्वारे । माझि० ॥४॥गंधाचे सुख नामाचेनि द्वारे । माझि० ॥५॥नामा ह्मणे ऐसे जयाचे उपकार । तयासी गव्हार विसरले ॥६॥॥धृ०॥ए०भा०अ०२ -- निजागींचा नीजप्रभा । आगांसी आणिली शोभा । काय ब्रह्मविद्येचा गाभा । शोभे नवप्रभा ॥ शोभायमान ॥१९६॥नीजहृदयीचे ब्रह्मज्ञान ॥ परीपाके प्रकाशले पूर्ण । तेची निजांग मंडन । इतर भूषण त्या नाही ॥१९७॥मनुष्ये देहीचेनी आयुष्ये । विषयी सायास करी ती कैसी । अमृत देऊनी घे जैसे । तान्हे सावकाश मृगजळ ॥२२२॥गंधर्व नगरीची ठाणी । घेतली देउनी चिंतामणी । तैसी लट्ली यालागी आठवणी । विषयसाधनी नरदेह ॥२२३॥नित्य प्रपंचाची कटकट । सदा विषयाची खटपट । कदां आरोळ्या चोखट स्वच्छ सारी पाट खेळणे ॥२२६॥नाना विनोद टवाळी नित्य विषयाची चाळी । त्यासी जपता रामनामावळी पडे दातकीळे आसंभव्ये ॥२२७॥घरा आली कामधेनू । दवडीति न पोसवे ह्मणूनी तेवी श्रीरामनाम उच्चारुनी । नाडला जाण नरदेही ॥२२८॥अकरा ही इंद्रिय वृत्ती । कैशा लावाव्य भगवद्भक्ती । ऐक राया तुज प्रती । साक्षेप स्थिती सांगेन ॥२९०॥मने करावे हरीचे ध्यान । श्रवणे करावे किर्ती श्रवण । जिव्हेनें करावें नामस्मरण । हरि कीर्तन अहर्निशी ॥२९१॥करी करावे हरि पूजन । चरणी देवालया गमण घ्राणीं तुलसी अमोदग्रहण । जिवी हरिचरण पूजिले ॥२९२॥नित्य निमेत्य मिरवेशिरी चरण तिर्थे आम्हांवरी । हरि प्रसाद ज्याचे उदरी । त्या देखोनि दुरी भवभये पळे ॥२९३॥निज ह्र्दयीचे ब्रह्मज्ञान । परिपाके प्रकाशले पूर्ण । तेचि निजांग मंडन इतर भूषण त्या नाही ॥१९७॥अभंग - २श्री नामदेव महाराज वाक्य--पवित्र आणि परिकर । उभविलें मंदिर । दिपेविण मनोहर । शोभा न पावे श्यामांगी तरुणी सुंदर होय रमणी । पुरुषावीण कामिन शोभा न पवे ॥२॥द्रव्यावीण नर जरी झाला सुंदर । तो त्यावीण चतूर ॥ शोभा न पवे ॥३॥योगिया आणि कठीण । इंद्रिया नाही दमन । षटु कर्मेवीण ब्रह्मज्ञान ॥ शोभा न पावें ॥४॥नामा म्हणे सुंदरा । रखुमादेवीवर तुजवीण दातांरा शोबा न पावे ॥५॥ए०भा०अ०९--जेणे उपजे विरक्ती । तो विवेक जाणावा निश्चिती । एवविवेके वैराग्यप्राप्ती । निजयुक्ती नरदेही ॥२५७॥इतर देहांच्याठायी । हा विचारुचि नाही । केवळ शिश्नोदर पाही । व्यर्थ व्यवसायो देही करिताती ॥२५८॥यालागी नरदेह, निधान । जेणें ब्रह्मसायु ज्यतां घडे गमन देव वांछती मनुष्यपणे देवाचे स्तवन नरदेहा ॥२५९॥अभंग -- ३श्रीनामदेव महाराज वाक्य--दुर्लभ नरदेह झालां तुम्हां आह्मां । येणें सांधू प्रेमा राघोबाच्या ॥१॥अवघे हातोहातीं तरों भवसिंधु । आवडी गोविंद्र जाऊं गीती ॥२॥हिताचिया गोष्टी सांगू एकमेकां शोक मोह दु:खा निरसूं जेणे एकमेका करुं सदा सावधान । नामीं अनुसंधान तुटो नेदू ॥४॥घेऊं सर्वभावें रामनाम दीक्षा विश्वासें सकळिकां हेचि सांगो ॥५॥नामा म्हणे शरण रिधी पंढरिनाथा ॥ न उपेक्षी सर्वथा दीनबंधु ॥६॥ ॥धृ०॥ए० भा० अ० ९ -- साक्षेपें मनुष्यदेह जोडे । ऐसें करितां तव न घडे । अवचट हाता चढे । भाग्य चोखडे जयाचें ॥३७५॥मोले आराध्य र्थ्यारत्नें येती । तैसा चिंतामणी नये हाती तेवी बहुत योनिये जन्म होती ॥ परी मनुष्यदेह प्राप्ती दुर्लभ ॥३७६॥ऐसा नरदेह पावोनि देखा जो न सांधीती ब्रह्म सुख । तो जनामाजीं परम मूर्ख । विश्वा घातक देवाचा ॥३७७॥अभंग --४श्रीतुकाराम महाराज वाक्य--ऐका गा हे अवघे जन । शुध्द मन तें हित ॥१॥अवघा काळ नये जरी । समयावरी जाणावा ॥२॥नाहीं कोणी सवें येतां संचिता या वेगळा ॥३॥बरवा आवकाश आहे । करा साहे इंद्रियें ॥४॥कर्मभूमी ऐसा ठाव । व्यवसाव जाणावा ॥५॥तुका ह्मणे उत्तम जोड । जातीं घडी नरदेह ॥६॥ ॥धृ०॥ज्ञा०अ० १२ -- किंबहुना इयापरी बाह्य चोख अवधारी । आणि ज्ञानदीप अंतरी म्हणोनि शुध्द ॥४६७॥अभंग --५श्रीतुकाराम महाराज वाक्य--बहुतां जन्माअंती । जोडी लागली हे हाती ॥१॥मनुष्य देहा ऐसा ठाव । धरी पांडुरंगी भाव ॥२॥बहु केला फेरा । येथें सांपडला थारा तुका ह्मणे जाणे । ऐसे दुर्लभ ते शहाणे ॥४॥ए० भा० अ० २ -- मने करावे हरिचे ध्यान । श्रवणे करावे कीर्ती श्रवण । जीव्हेने करावे नामस्मरण । हरि कीर्तन अहर्निशी ॥२९१॥करिता रामकृष्ण स्मरण । उठोनी पळे जन्ममरण । तेथें भवभयाचे तोंड कोण । धैर्यपण धरावया ॥२९६॥अभंग --६श्रीतुकाराम महाराज वाक्य--अरे गिळिलें हो संसारे । कांही तरि राखा खरें । दिला करुणा करें मनुष्यदेह सत्संग ॥१॥येथें न घाली न घाली आड । संचितसा शुध्द नाड । उठाउठी गोड । बीजे बीज वाढवी ॥२॥केले क्रियमाण । झालें ते संचित म्हण । प्रारब्ध जाण । उरर्वरित उरलें ते ॥३॥चित्त खोटे चालीवरी । रोग भोगाचे अंतरी । रसना अनावरी तुका ह्मणी ढुग वाहे ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ० ३ -- तेवी शुध्द ब्रह्मी संकल्पु नाहीं । शेखी न दिसे केवळ देहीं । माझारी वासनेच्या ठायी । देहाभिमानें पाही संसार भासे ॥६०॥जागृती देहाचा विसर पडे । सवेची स्वप्नदेह दुजे जोडे । तेणें मिथ्ये प्रपंचु वाढे । स्वप्नी स्वप्नकुडें कदा न मनें ॥६१॥जेवी मृगजळा मिथ्य भासे । तेवी ब्रह्मी प्रपंच नसे । तो निरसावया कैसे । साधनें पीसे पिशाचे ॥६४॥माय म्हणावी येणें भावें । जे मी कदा विद्यावान नव्हे या लागी अविद्या येणें नांवे ॥ वेदानुभवे गर्जती शास्त्रे ॥४१॥भ्रमू तो मायचे निज मूळ । भ्रंती हेचि फुल सोज्वळ । भुली ते इचे साजूक फळ । विषय रसाळ सदा फळित ॥४२॥हे नसतेही निरुपे रुपा आली । सत्यासत्ये गरोदर जाहली । तेथें असयताची पिली स्वये ठयाली असंख्ये ॥४३॥शशविषाण पादुका । लेऊनी ते चाले देखा । तिसी क्तो अहंकार सखा । आणि नेट्का जेष्टपुत्र ॥४७॥कुळ विस्तारा लागी पाही । ममता व्याली ठायी ठायी । मोहे उपजवुनी देही । घरजावई त्या केला ॥४८॥अह मोह ममता योगे । जग विस्तरले आंगे । स्थूळ सबळ प्रयोगे ॥ ममता निजांगे वाढवी ॥४९॥आरसा काय प्रतिबिंब असे जो पाहे तोची आभासे । तेवीं आपुलेनि संकल्प वसे । माया उल्हासे नसतीची ॥५६॥जेवी सूर्यासी संकल्प नसे । तरी नसता त्याच्या ठायी दिसे । जेव्हां का निजकारण वसे । अग्नि प्रकाशि सूर्यकांती ॥७०॥अहंकार वाढता देहात्मता । विसरे आपुली चिद्रूपता । तो विसरू वाढवी विषय चिंता । तोचि तत्वता महामाया ॥१०९॥समूळ मावळल्या अभिमान । कैची बुध्दी कैचे मन । बुडे चित्तांचे चित्तपण । ब्रह्मपरी पूर्ण कोंदाटे ॥११४॥ज्ञा.अ.८ -- देहवैकल्याचा वारा । झण लागले या सकुमारा । म्हणोनि आत्म बोधाचा पिंजरा । सुर्ये तयातें ॥१३२॥वरि आपुलिया स्मरणाची उवाइली । हीव ऐसी करी साऊली । ऐसनि नित्य बुध्दी संचली । मी आणि तयाते ॥१३३॥अभंग -- ७श्रीज्ञानदेव महाराज वाक्य--चोरासिया संगे क्रमितां पै पथ । ठकुनिया घात करितील ॥१॥काम क्रोधे लोभ घेऊनिया संगे । परमार्थासि रिघे तोचि मूर्ख ॥धृ०॥बांधोनिया शिळा पोहू जाता सिंधू । पावें मतिमदु मृत्यु शीघ्र ॥२॥देह गेह भ्रांती सोडुनिया द्यावे ॥ साधन करावे शुध्द मार्गे ॥३॥ज्ञान देव ह्मणे तरीच साधेल । नाही तरी चळेल मध्यभाग ॥४॥ए०भा०अ० ३ -- तेवी विषयाहुनि सुखें सुख न पावतीच ब्रह्मादिक, विषयाचा जे मानिती हरिख ते परममूर्ख पशूदेही ॥२४४॥अभंग --८श्रीतुकाराम महाराज वाक्य-- मोलाचे आयुष्य वेचुनियां जाय । पूर्वपुण्ये होय लाभ याचा ॥१॥अनंत जन्मांचा शेवट पाहतां ॥ नरदेह आला तुझ्या ॥२॥कराल ते जोडी येईल कार्यासी । घ्यावे विठठलासी सुखालागी ॥३॥सांचलिया धन होईल ठेवणें । तैसी नारायणा जोडी करा ॥४॥करा हरिभक्ती परलोकी कामा । सोडविल यमापासोनिया ॥५॥तुका ह्मणी करा आयुष्याच मोल नका वेंचू फोल नामेवीण ॥६॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०३ -- आगां कामधेनूचे दुभतें दैव जहाले आपैतें । तरी कामनेचि कां येथें वाणिकीजे ॥२३॥देखा अमृत सिंधूतें टाकावें । मगव तहाना जरी फुटावें । तरी सायासु कां करावें ॥ मागील ते ॥२४॥अभंग --९श्रीएकनाथ महाराज वाक्य--काळें काळ वायां जातूं । तेणें होय आयुष्यअंतू ॥१॥जाणोनिया रक्षी कोण सांडी देहाचा अभिमान ॥२॥अभिमान सांडोनि झडकरी । एका जनार्दनी दास्य करी ॥३॥॥धृ०॥ज्ञा०अ०९ -- जेथे चहुंकडे जळत वणवा । तेथूनि न निगिजें केविं पांडवा । तेविं लोकां येऊनि सोपद्रवा ॥ केवी न भाजिजे मातें ॥४९२॥ज्ञा०अ०३ -- जरी चिंतामणी हाता चढे । तरी वांच्छेचें कवण सांकडे आपुलेनि सुरवाडें । इच्छावेचि ना ? ॥२३॥ए०भा०अ० २० -- काळे काळ वयस्य खातू । हा देखोनि आयुष्याचा वातु जाणोनि नरदेहाचा प्रांतू । होय आनस्कंतु देहगेहा ॥१६०॥ अभंग --१०श्रीतुकाराम महाराज वाक्य--येऊनि नरदेहा झांकिलेती डोळे । बळेचि आंधळी होती लोक उजेडा सरसी न चालवी वाट । पुढिल बोभाटा जाणोनियां ॥२॥बहु फेर आले सोसोनि वोळसा । पुढें नाही ऐसा लाभ मग । तुका ह्मणे जाऊ पादावी वाटे । भेटे तरी ॥४॥भेटे कोणी तरी ॥४॥॥धृ०॥ज्ञा.अ.६ -- कैसें प्राप्तीचिये वेळे ॥ निदैवा आंधळे पणाचे डोईळे । की असते आपुले डोळे ॥ आपण झांकी ॥७३॥ अभंग --११श्रीतुकाराम महाराज वाक्य--देह तंव असे भोगाचे अधीन । याचें सुख शीण क्षणभंगुर ॥१॥अविनासी जोडी देवा पायी भाव कल्याणाचा ठाव सकळही ॥२॥क्षण भंगुर हा येथील पसारा ॥ आलिया आकारा अवघे नासे ॥३॥तुका ह्मणे येथें सकळ विश्रांती ॥ आठवावा चित्ती नारायण ॥४॥ ॥धृ०॥ज्ञा.अ.९ -- जें संसाराचें बैसणे जे विकारांचे उद्यानें ॥ जे सकळ रोगांचे भाणें ॥ वाढिले आहे ॥१४२॥ज्ञा.अ.४ -- अथवा ज्ञान कीर आपु नोहे । परी ते चाड एकी जरी बाहे तरी तेथें जिव्हाळा कांही आहे ॥ प्राप्तीचा पै ॥१९५॥अभंग --१२श्रीतुकाराम महाराज वाक्य--नेऊनि नरदेहा विचारावे सार ॥ धरावा पै धीर भजनमार्गी ॥१॥चंचळ चित्तासी ठेवूनिया ठायी संताचिये पायी लीन व्हावें ॥२॥भावाच्या पै हाते धरावा निश्चय । तेणे भवभय देशोधडी ॥३॥नामा परते जगीं साधन सोपें नाहीं ॥ आवडीनें गाई सर्वकाळ ॥४॥तुका ह्मणे वंश धन्य त्या नराचा ऐशा निश्चयाचा मेरु झाला ॥५॥ ॥धृ०॥ए०भा०अ० ९ -- मनुष्यदेहीचेनि ज्ञाने । सच्चिदानंद पदवी घेणें । एवढा अधिकार नारायणें ॥ कृपा अवलोकनें दीधला ॥३३०॥अभंग --१३श्रीतुकाराम महाराज वाक्य--घातले दुकान । देती अलियासी दान ॥१॥संत उदार उदार भरलें अनंत भांडार ॥२॥मागल्यासी पुरे ॥ धणी आणिकांसी उरे ॥३॥तुका ह्मणे पोते । देवें भरिले नव्हतें रितें ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ० ११ -- असो मूर्खाची जे त्यागगती ॥ ते अत्यंत बाधें बाधक होती ॥ जव धरिली नाही सत्संगती तव त्याग स्थिती कळेना ॥१०॥भजन श्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥आरत्या --१ झाले समाधान । तुमचे देखि० २ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी० ३ प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ० ४ आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥भजन --घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥अभंग नाचाचे ---मागणे हे एक तुजप्रती ।भजन---ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम प्रसाद ---पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० शेजआरती --१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार २. चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥मागील मालिकेप्रमाणे म्हणावेपुंडलीक वरदे हरि विठठल श्रीज्ञानदेव तुकाराम N/A References : N/A Last Updated : December 05, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP