मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ज्ञानोदय भजनी मालिका| मालिका २ द्वितिया ज्ञानोदय भजनी मालिका परिचय अनुक्रमणिका मालिका १ प्रतिपदा मालिका २ द्वितिया मालिका ३ तृतीया मालिका ४ चतुर्थी मालिका ५ पंचमी मालिका ६ षष्टी मालिका ७ सप्तमी मालिका ८ अष्टमी मालिका ९ नवमी मालिका १० दशमी मालिका ११ एकादशी मालिका १२ द्वादशी मालिका १३ त्रयोदशी मालिका १४ चतुर्दशी मालिका १५ पौर्णिमा आरती काल्याचे अभंग कीर्तन महात्म्य पंढरी महात्म्य ज्ञान महात्म्य विश्वव्रह्म आरती आणि विश्वब्रह्मकृत श्लोक सप्तक मालिका २ द्वितिया श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे. Tags : bhajandnyanodaymarathiज्ञानोदयभजनमराठी संतसंगतीचे उद्गार Translation - भाषांतर ॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥(॥ रुप पाहातां लोचनी॥ ) आणि (॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)अभंग -१श्री नामदेव महाराज वाक्य--धन्य नरदेही संतसंग करी । त्रैलोक्य उध्दरी हेळामात्रे ॥१॥नेणे सुख दु:ख शरीराचे भान । अखंड भजन केशवाचे ॥२॥कर्म करुनिया होय शुचिमत । नामामृती पीत सर्वकाळ ॥३॥नामा ह्मणे ऐसे व्रतें देहे भावी । मूढजना दावी भक्तिमार्ग ॥४॥॥धृ०॥जै माझें भक्त येती घरा, तै सर्व पर्वकाळ आले द्वारा । वैष्णवां तो दिवाळी द्सरा, तीर्थ घरां पै येती ॥१२६६॥ ए०भा०अ०११अभंग -२श्री एकनाथ महाराज वाक्य--संतसंगतीने झाले माझे काज । अंतरी जे निज प्रगटले ॥१॥बरवा झाला समागम । अवघा निवारला श्रम ॥२॥दैन्य दरिद्र दुर गेलें । संत पाऊलें देखतां ॥३॥एका जनार्दनी सेवा करीन मी अपुल्या भावा ॥४॥आत्मज्ञानें चोखडी संत जे माझी रुपडी । तेथ दृष्टि पडे आवडी । कामिनी जैसी ॥१३५६॥ ज्ञा०अ०१८अभंग --३श्रीतुकाराममहाराज वाक्य--सुख वाटे हेंचि ठायी । बहु पायीं संताचें ॥१॥म्हणऊनि केला वास । नाही नाश ये ठायी ॥२॥न करवे हलचाली । निवारली चिंता हे ॥३॥तुका म्हणे निवे तनु । रजकणु लागतां ॥४॥॥धृ०॥ते पहांटवीण पाहावित । अमृतेविण जीववीत । योगेविण दावित । कैवल्य डोळा ॥२०१॥ ज्ञा०अ०९अभंग--४श्रीतुकाराम महाराज वाक्य--तुम्ही संत मायबाय कृपावंत । काय मी पतित कीर्ती वाणुं ॥१॥अवतार तुम्हां धराया कारण । उध्दारावें जन जडजीवा ॥२॥वाढविले सुख भक्ती भाव धर्म । कुळाचारी नाय विठोबाचें ॥३॥तुका ह्मणी गुण चंदनाचे अंगीं । तैसे तुह्मी जगीं संतजन ॥४॥॥धृ०॥तरी कीर्तनाचे नि नटनाचे । नाशिले व्यवसाय प्रायश्चिताचे । जे नापचि नाही पापांचें । ऐसे केले ॥९७॥यमदमा अवकळा आणिली । तीर्थे ठाया वरुनि उठविली । यमलोकीची खुंटिली । राहटी आघवी ॥९८॥ ज्ञा०अ०९अभंग--५श्रीएकनाथ महाराज वाक्य--धन्य आज दिन संत दर्शनाचा । अनंत जन्मांचा शिण गेला ॥१॥मज वाटे त्यासी अलिंगन द्यावें । कदा न सोडावें चरण त्याचे ॥२॥त्रिविध तापांची जाहली बोळवण । देखिल्या चरण वैष्णवाचे ॥३॥एका जनार्दनी घडो त्याचा संग । न व्हावा वियोग माझ्या चित्ता ॥४॥॥धृ०॥कहीं एखाधेनि वैकुंठा जावें । तें तिहीं वैकुंठचि केले आघवें । ऐसे नामघोषगौरवें ॥ धवळलें विश्व ॥२०३॥ ज्ञा०अ०९अभंग--६श्रीतुकाराममहाराज वाक्य--संताचिया गांवी प्रेमाचा सुकाळ । नाहीं तळमळ दु:ख लेश ॥१॥तेथें मी राहीन होऊनि याचक । घालितील भीक तेचि मज ॥२॥संताचिये गांवी भरो भांडवल । अवघा विठठल धन वित्त ॥३॥संतांचे भोजन अमृताचे पान । करिती कीर्तन सर्वकाळ ॥४॥संतांचा उदीम उपदेशाची पेठ । प्रेम सुखसाठीं घेती देती ॥५॥तुका ह्मणे तेथे आणिक नाही परी । म्हणोनि भीकारी झालो त्यांचा ॥६॥॥धृ०॥प्रभु तुम्ही सुखामृताचे डोहो । ह्मणोनि आह्मी आपुलिया स्वेच्छे बोलावो लाहो । येथहि जरी सलगी करुं भीयो । तरी निवो के पहा ॥५॥प्रतिमा निजकल्पना उत्तम । संत प्रत्यक्ष पुरुषोत्तम ल। चालते बोलते परब्रह्म । अती उत्तम साधु सेवा ॥११९९॥माझ्या प्रतिमा आणि साधु नर । तेथें या रिती भजती तत्पर । हा तव सांगितला निर्धार । भजन प्रकार तो एक ॥१२००॥प्रतीमा आणि साधु सोज्वळे । आवडी न पाहाती ज्या डोळे । दृष्टि असोनी ते आंधळे । जाण केवळ मोर पुच्छे ॥१२०१॥ ए०भा०अ०११अभंग--७श्रीनामदेव वाक्य --संताचा महिमा कोण जाणे सीमा । शिणला हा ब्रह्मा बोलवेना ॥१॥संताची हे कळा पाहतां न कळे । खळोनिया खेळवेगळे ॥२॥संताचिया पारा नेणें अवतारा । म्हणती याच्या पारा कोण जाणें ॥३॥नामा म्हणे धन्य धन्य भेटी झाली । कल्पना निमाली संतापायी ॥४॥॥धृ०॥तेजे सूर्य तैसे सोज्वळ । परि तोहि अस्तवे हें किडाळ । चंद्र संपूर्ण एखादे वेळ । हे सदा आपुरते ॥४॥ ज्ञा०अ०९अभंग --८श्रीज्ञानदेव वाक्य--पूर्व जन्मी सुकृते थोर केली । ते मज आजि फळासि आली ॥१॥परमानंद आजि मानसी । भेटी झालिइया संतासी ॥धृ०॥मायबाप बंधु सखेसोयरे ॥ याते भेटावया मन न थरे ॥२॥एक एका तीर्थाहुनि आगळे । तयामाजि परब्रह्मा सांवळे ॥३॥निर्धनासि धनलाभ झाला । जैसा अचेतनी प्राण प्रगट्ला ॥४॥वत्से बिघडली धेनु भेटली । जैसी कुरंगिणी पाडसा मीनली ॥५॥पियूषापुरतें गोड वाटत । पंढरिरायाचें भक्त भेटत ॥६॥बाप रखुमादेवी वर विठठल । संत भेटतां भवदु:ख फिटलें ॥७॥॥धृ०॥ज्याचिया अवडीच्या लोभा । भगवंत पालटे आला गर्भा । दशा अवताराची शोभा । जहाली पद्मासना ज्याचेनी ॥धृ०॥ ए०भा०अ०२अभंग-९श्रीतुकाराममहाराज वाक्य--पुण्य्य फळले बहुतां दिवसां । भाग्य उदयाचा ठसा । झालो संन्मुख तो कैसा । संतचरण पावलो ॥१॥आजि फिटले माझें कोडं ॥ बहुता जन्मांचे सांकडे । कोंदाटलें पुढे परब्रह्म सांवळे ॥२॥अलिंगने संताचिया । दिव्य झाला माझी काया मस्तक हां पायां । वरी त्यांच्या ठेवितों ॥३॥तुका ह्मणे धन्य झालों । सुख संताचिया धालो । लोटांगणीं आलों वैष्णवभार देखोनी ॥४॥॥धृ०॥लोह उभे खाय माती । तें परिसाचिये संगती । सोनें जालया पुढती न शिविजे मळे ॥१४०८॥ ज्ञा०अ०१८अभंग --१०श्रीतुकाराम महाराज वाक्य --पुनीत केले विष्णुदासी । संगे आपुलिया दोषी ॥१॥कोण पाहे तयांकडे । वीर विठठलाचे गाढे । अशुभ त्यांपुढें । शुभ होऊनियां ठाके ॥२॥प्रेमसुखांचिया राशी । पाप नाहीं ओखदासी ॥३॥तुमा ह्मणे त्यांनी । केली वैकुंठ मेदिनी ॥४॥॥धृ०॥चुकलिया निजजननी । बाळक दीन दिसे जनीं । त्यासि मातेच्या आगमनी । संतोषमनीं निर्भर ॥४॥त्याहुनि श्रेष्ठ तुपची यात्रा । नित्य सुखदात्री भूतमात्रां । स्वलीले तुह्मी मही विचारा । दीनोध्दारा लागुनी ॥४४॥ ए०भा०अ०२अभंग--११श्रीतुकाराममहाराज वाक्य--पाप ताप दैन्ये जाय उठाउठी । झालिया भेटी हरिदासांची ॥१॥ऐसें बळ नाहीं माणिकांचे अंगी । तपें तीर्थे जगी दानें व्रते ॥२॥चरणीचें रजवदी थूलपाणी । नाचती कीर्तनी त्याचे माथां ॥३॥भव तर वया उत्तम ही नाव । भिजो नेदी पावहात कांहीं ॥४॥तुका म्हणे मन झाले समाधान । देखिल्या चरण वैष्णवांचे ॥५॥ह्यणोनि गा नमस्कारुं । तयातें आम्ही माथां मुकुट करुं । तयाची टांच धरूं । ह्र्दयी आम्हीं ॥२२१॥ ज्ञा०अ०१२अभंग --१२श्रीतुकाराममहाराज वाक्य --उजळले भाग्य आतां । अवघी चिंता वारली ॥१॥संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला ॥२॥संपुष्ट हे ह्र्दयपेटी । करुनि पोटीं साठवूं । तुका ह्मणे होता ठेवा । तो या भावा सांपडला ॥४॥॥धृ०॥आपली जे निजपदप्राप्ती । ते सत्संगेविण निश्चिती । दुर्लभ हे उध्दवाप्रती स्वयें श्रीपरि सांगतु ॥११८॥ ए०भा०अ०१२अभंग --१३श्रीतुकाराममहाराज वाक्य--करीतां या सुखा । अंतपार नाहीं लेखां ॥१॥माथां पडती संतपाय । सुख कैवल्य तें काय ॥२॥ऐसा लाभ नाहीं । दुजा विचारतां कांही ॥३॥तुका ह्मने गोड । तेथे पुरे माझे कोड ॥४॥॥धृ०॥केवळ जे स्वरुप संत । त्यां माझी संगती झाली प्राप्त । काय करीशी तपव्रत । भावार्थे प्राप्त मन झालिया ॥१०६॥व्हावया माझीं पद प्राप्त । त्यासि भांडवल गा भावार्थ । भवबळी गा समस्त ॥ पद निश्चित पावल्या ॥१०७॥तो मी वैकुंठी नसें । वेळ एक भानुबिंबीही न दिसे । वरी योगियाचीही मानसे । उमरडोनि जाय ॥७॥परी तयांपाशी पांडवा । मी हारपला गिवसावा । जेथ नामघोषु बरवा । करिती माझा ॥८॥ ज्ञा०अ०९अभंग --१४श्रीतुकाराममहाराज वाक्य--हे तो एक संताठायी । लाभ पायीम उत्तम ॥१॥म्हणविती त्याचे दास । पुढें आस उरेना ॥२॥कृपादान केलें संती । कल्पांतीही सरेना ॥३॥तुका म्हणे संतसेवा हाचि ठेवा उत्तम ॥४॥॥धृ०॥अभंग --१४तुकाराममहाराज वाक्य--शरण शरण वाणी शरण त्रिवाचा विनवणी ॥१॥स्तुति न पुरे हे वाचा । सत्यदास मी दासांचा ॥२॥देहे सांभाळून । पायांवरि लोटांगण ॥३॥विनवी तुका संतांदीन ॥ नव्हे गौरवे उत्तीर्ण ॥४॥॥धृ०॥सांडुनि माझी पूजाध्यान, जो संतासी घाली लोटांगण, कोटी यज्ञांचे फळ जाण मदर्पण तेणे केले ॥९६॥ ए०भा०अ०१२भजन श्रीज्ञानदेव तुकाराम । श्रीज्ञानदेव तुकाराम ॥धृ०॥आरत्या--१ झाले समाधान । तुमचे देखि २ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी -३ प्रेम सप्रेम आरती । गोविंदासि ओ० ४ आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥भजन-- घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥॥धृ०॥अभंग नाटाचे-- मागणें ते एक तुजप्रती ॥भजन-- ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम० ॥प्रसाद-- पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि०॥ शेजआरती--१ शब्दांचिया रत्नें करुन अलंकार० २ चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥० मागील मालिकेप्रमाणें ह्मणावे ॥ पुंडलीक वरदे हरि विठठल श्रीज्ञानदेव तुकाराम ॥ N/A References : N/A Last Updated : December 05, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP