मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ज्ञानोदय भजनी मालिका| मालिका १० दशमी ज्ञानोदय भजनी मालिका परिचय अनुक्रमणिका मालिका १ प्रतिपदा मालिका २ द्वितिया मालिका ३ तृतीया मालिका ४ चतुर्थी मालिका ५ पंचमी मालिका ६ षष्टी मालिका ७ सप्तमी मालिका ८ अष्टमी मालिका ९ नवमी मालिका १० दशमी मालिका ११ एकादशी मालिका १२ द्वादशी मालिका १३ त्रयोदशी मालिका १४ चतुर्दशी मालिका १५ पौर्णिमा आरती काल्याचे अभंग कीर्तन महात्म्य पंढरी महात्म्य ज्ञान महात्म्य विश्वव्रह्म आरती आणि विश्वब्रह्मकृत श्लोक सप्तक मालिका १० दशमी श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे. Tags : bhajandnyanodaymarathiज्ञानोदयभजनमराठी प्रेम कलह Translation - भाषांतर ॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥(॥ रुप पाहातां लोचनी॥ आणि ॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)अभंग - १श्री तुकाराम महाराज वाक्य--कृपाळु ह्मणोनी बोलती पुराणीं ॥ निर्धार वचनें हाचि ॥ याचीं मज ॥१॥आणिक उपाय नेणेचि मी कांही ॥ तुझे वर्म ठायी पडें तैसे ॥२॥नये धड कांही बोलतां वचन रिघालों शरण सर्वे भावें ॥३॥कृपा करिसी तरी थोडें तुजकाम ॥ माझा तरि श्रम बहु हरे ॥४॥तुका ह्मणे मज दाखवी श्रीमुख ॥ हरेल या भूक डोळियांची ॥५॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०११ - तैसा मी एकची परी ॥ आतुडे गा अवधारी ॥ जरी भक्ती येऊनी वरी चित्ताते गा ॥६८५॥का सकळ जळ संपत्ती ॥ घेऊनि समुद्राते गिवसिती ॥ गंगा जैसी अनन्येगती ॥ मिळालीचि मिळे ॥६८७॥अभंग -२श्री तुकाराम महाराज वाक्य--नाही उल्लंघीले कोणाचें वचन ॥ मज कां नारायण दुरी जाला ॥१॥ आशंकित मनें करी आळवण ॥ नाही समाधान निश्चितीचे ॥२॥दासाचा विसर हें तो अनुचित । असे सर्व नीत पायापाशी ॥३॥तुका ह्मणे तुझाम लाज येत नाहीं ॥ आह्मां चिंता डोही बुडवितां ॥४॥ ॥धृ०॥ते भक्तीचे मुख्य ज्यास साधान ॥ यालागी मी त्या भक्ताआधीन त्याचें कदाकाळे वचन ॥ मी आणु प्रणनुलंघी ॥३८०॥तै, मज ह्मणती होई सगुण ॥ तै सिंह सुकर होय मी आपण । त्यालागी मी विदेजाण ॥ होय संपूर्ण देहधारी ॥३८१॥अभंग - ३श्री तुकाराम महाराज वाक्य--न बोलावें परि पडिला प्रसंग ॥ हाकलिते जग तुझ्या नामे ॥१॥लटिकेचि सांग मांडिला पसारा ॥ भिकारी तु खरा कळों आलें ॥२॥निलाजिरी आम्ही करोनियां धीर राहिलों आधार धरुनिया ॥३॥कैसा नेणो आतां करिसी शेवट ॥ केली कटकट त्याचा पुढें ॥४॥तुका ह्मणे कांही न बोलसी देवा ॥ उचित हे सेवा घेसी माझी ॥५॥ ॥धृ०॥ए०भा०अ०११ - जे भक्तिमाजी काहीं ॥ अविद्येचा विटाळ नाहीं वचन तरी ठायी आनायासे पाही होतसे ॥११००॥ऐसे नि भजनें जो भजत । तो मजमाजी मी या आंत । भक्तामाजी जो उत्तम भक्त ॥ सोसु निश्चिन या नांव ॥११०१॥अभंग -४श्री तुकाराम महाराज वाक्य--आम्ही नरका जातां काय येईल तुझ्या हातां ॥ ऐसें तुं अनंता विचारी पां ॥१॥तुज शरण अलियाचें काय हेंचि फळ ॥ विचारा दयाळ कृपानिघी ॥२॥तुज पावन पणी न चले आह्मासी ॥ ऐसें हषी केशी कळों आलें ॥३॥आम्ही दु:ख पावो जन्ममरण व्याथा काय तुझ्या हाता येत असें ॥४॥ तुका ह्मणे तुम्ही खादली हो रडी आम्ही धरली शेंडी नाम तुझें ॥५॥॥धृ०॥ज्ञा०अ०८ - देह वैकल्याचा वारा । झणें लागेल या सुकुमार ॥ ह्मणोनि आत्मबोधाचें पांजिता सुयें तयातें ॥१३२॥ह्मणोनि देहातीचें सांकडे माझिया काहीचि न पडे ॥ मी आपुलयातें आपुलीकडे ॥ सुखेचि आणी ॥१३४॥अभंग - ५श्री तुकाराम महाराज वाक्य--आ,इचा तूं ऋणी ठायीचाचि देवा । मागावया ठेवा आलें दारा ॥१॥वर्म तुझें आह्मां सांपडलें हाती ॥ धरियेले चित्ती दृढ पाय ॥२॥बैसलों शरणें कोंडोनियां द्वारी ॥ आतूनि बाहेरी येओ नेदी ॥३॥तुज मज सरी होईल विचारें । जळो भांडखोरे निलाजिरी ॥४॥भांडवल माझ मिरविसी जनी ॥ सहस्त्र वोवणी नाममाळा ॥५॥तुका ह्मणे आह्मी केली जिवें साटी ॥ तुह्मां आह्मां तुटी घालूं आतां ॥६॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०८ - तें ऋण वैपण देखोनि आगी ॥ मी आपुलियाचि उत्तर्णत्वालागी ॥ भक्ताचिया तनु त्यागी ॥ परिचर्या करी ॥१३१॥अभंग - ६श्री तुकाराम महाराज वाक्य--बैसलोंसे दारी धरणे कोंडोनि भिकारी ॥१॥आतां कोठें हातोंनेदी ॥ बरी सांपडली संधी ॥२॥किती येरझारा मागें घातलिया घरा ॥३॥माझे मज नारायणा ॥ देतां कां रे नये मना ॥४॥भांडावें तें किती बहु सोसिली फजिती ॥५॥तुका ह्मणे नाही । लाज तुझे अंगी कांही ॥६॥॥धृ०॥ज्ञा०अ०९ - आणि भलतिया जाति जन्मावें ॥ मग भजिजे कां विरोधावें ॥ परी भक्ता कां वैरिया व्हावें ॥ माझियाचि ॥४७२॥अगा कवणीं एकें बोलें ॥ माझेपण जर्ही जाहालें ॥ तरी मी होणें आलें ॥ हाता निरुतें ॥४७३॥अभंग - ७श्री तुकाराम महाराज वाक्य--आह्मी पतित तूं पावन हें तों पूर्वापार जाण ॥१॥नवें करुं नवे जुनें सांभाळावें ज्याचें त्यानें ॥२॥मिरासीचा ठाव ॥ राखी करोनि उपव ॥३॥वादें मारी हाका । देवा आइकवितो तुका ॥४॥॥धृ०॥ए०भा०अ० - ते भक्तीचे देखोनि गुढी ॥ आविद्या धाकेंचि प्राण सांडी सर्व धर्माची आवडी ॥ धायें वीण बापुडी निमाली ॥११०२॥हा सद्भक्तीचा पर्यावो ॥ आवडीच्या गोडिया सांगे देवो ॥ एक भक्ताचा भजन भावो जेणे निर्वाहो भक्तीचा ॥११०३॥अभंग - ८श्री एकनाथ महाराज वाक्य--निष्ठुर यासाठी करितों भाषण ॥ आहेसी तूं सर्व जाण दातां ॥१॥ऐसें कोण दु:ख आहे निवारीतां ॥ तो मी जाऊं आतां शरण त्यासी ॥२॥बैसलासी कोणें करुनि एक घरी ॥ नाहीं यथे उरी दुसर्याची ॥३॥तुका ह्मणी आले अवघेचि पांयापे ॥ आतां मायबापे नुपेक्षावे ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ०११ - तो मज आवडे ह्मणशी कैसा ॥ जीवासि पंडिय प्राण जैसा ॥ सांगतां उत्तमभक्त दशा ॥ प्रेमपिसा देवो झाला ॥१११४॥ऐशा भक्ति साम्राज्यापाठी ॥ दोघा पडली एक्य गांठी ॥ तंव देवोचि कळवळला पोटी निजभक्ता गोठी सांगावया ॥१११७॥ए०भा०अ०११ - निजकल्पना जे देही । तेचि मुख्यत्वे अविद्या पाही । त कल्पना निवलिया ठायी ॥ जाण अविद्या नाहीं निश्चित ॥१०८७॥माझे भक्तीचा पडला ठसा ॥ भजता नाठवे दिवसनिशा ॥ भक्तिची दशा या नांव ॥१००७॥अभंग - ९श्री एकनाथ महाराज वाक्य--हरि तुं निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठिण ॥ नव्हे तें करिसी आन कवणें नाही केल तें ॥१॥घेऊनि हरिचंद्राचे वैभव ॥ राज्य घोडी भाग्य सर्व ॥ पुत्र पत्नी जीव ॥ डोंबा घरी वोपविली ॥२॥नळदमयंतीचा योग ॥ विघाडला त्यांचा संग ॥ ऐसे जाणें जग ॥ पुराणे ही बोलती ॥३॥राजा शिबी चक्रवती कृपाळु दयाळु भूतीं ॥ तुळविलें अंती ॥ तुळे मास तयाचे ॥४॥कर्ण भिडतां समरंगणी ॥ बाणी व्यापियला रणीं ॥ मागसी पडोनी ॥ तेथे दान तयाचें ॥५॥बळी सर्वस्वे उदार जेणें उभारिला कर ॥ करुनी काहर । तो पाताळीं धावला श्रियाळाच्या घरी धरण मांडीले मुरारी ॥मारविले करी ॥ त्याचे बाळ त्या हाती ॥७॥तुज भावें जे भजती ॥ त्यांच्या संसारा हे गती ॥ ठाव नाही पुडती ॥ तुका ह्मणे करिसी तें ॥८॥ज्ञा०अ०११ - मग ईंधनी आग्नि उद्दीपे ॥ आणी ईधन हे भाष हारपे ॥ ते अग्नीचि होऊनी आरोपे ॥ मूर्ती जेवी ॥६९२॥ अभंग - १०श्री तुकाराम महाराज वाक्य--देवा तुज मज पण ॥ पाहों आगळा तो कोण ॥१॥तरि साच मी पतित ॥ तूंचि खोटा दिनानाथ ॥२॥ग्वाही साधुसंतजन ॥ करुनि अंगी लावीन ॥३॥आह्मी धरिले भेदाभेद ॥ तुज नव्हे त्याचा छेद ॥४॥न चले कांही तुझे त्यास आह्मीं बळकाविले दोष ॥५॥दिशा भरल्या माझ्या मनें ॥ लपलासी त्याच्या भेणें ॥६॥तुका ह्मणे चित्त । करी तुझी माझी नीत ॥७॥ ॥धृ०॥ए०भा०अ०११ - अविद्येच्या नाशासव ॥ नासती मर्दा धर्म आघवे । जेवी गरोंदर मारितां जीवें ॥ गर्भही तीसवे निमाला ॥८९६॥जेव्हा माझे भक्तीचा उल्लासुत्र ॥ तेव्हांचि अविद्येचा निरासू ॥ अविद्ये सवे होय नाशू अनायासू सर्व धर्मा ॥८९७॥ अभंग - ११श्री तुकाराम महाराज वाक्य--पांडुरंगे पाहा खादलीसे रडी ॥ परि नाम शेंडी धरिली आह्मी आतां संतांनि करावी पंचाईत ॥ कोण हा फजित खोर येथे ॥२॥कोणाचा अन्याय येथे आहे स्वामी ॥ गर्जतसो आह्मीं पातकीहीं ॥३॥याचे पावन पण सोडवावी जी तुम्ही ॥ पतितपावन आह्मी आहो खरे ॥४॥आह्मीं तंव आहों अन्यायी सर्वथा ॥ याची पावन कथा कैसी आहे ॥५॥तुका ह्मणें आह्मीं मेलों तरी जाणा ॥ परि तुमच्या चरणां न सोडावें ॥६॥ ॥धृ०॥ए०भा०अ०११ - ज्यांची श्रध्दा कर्मावरी । तोची कर्माचा अधिकारी । ज्याची श्रध्दा श्रीहरी ॥ तो नव्हें अधिकारी कर्माचा ॥८८४॥जो जीवें प्राणें भक्तीसि विकिला । तो तेव्हांचि कर्मा वेगळा जाहला ॥ त्याच्या भावार्थ मी विकिला ॥ तो कर्मी बांधला केवीं जाये ॥८८॥सूर्योदय देखतां दृष्टी ॥ चंद्रनक्षत्राची मावळे सृष्टी ॥ तेवीं माझ्या भक्तील्हासा पाठी ॥ अविद्या उठउठीं निमाली ॥८९५॥अभंग - १२श्री तुकाराम महाराज वाक्य--कांहो वाढवितां देवा ॥ मज घरीं समजावा । केवढा हो गोवा ॥ फार केलें थोडयाचे ॥१॥ठेवी न पायावरी डोई ॥ यासी तुमचेवेचे काई ॥ झालों उतराई ॥ जाणा एकएकांचे ॥३॥निवाड आपणि या पाषी ॥ असोन कां व्हावे अपेशी होती गांठी तैसी ॥ सोडूनियां ठेविली ॥३॥तुका ह्मणी गोड ॥ होते झालीया निवाड ॥ दर्शने ही चाड ॥ आवडीच वाढेल ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ०११ - स्वधर्माचा उत्तम गुण ॥ प्रत्यवाये अध:पतन ॥ या दोही ते जाणोन मद्भक्तीसी प्राण विकिला ॥१०८०॥विसरोनि अन्य आठवण ॥ अखंडता हरिस्मरण ॥ त्या नांव भक्तीसी विकिला प्राण ॥ इतर भजन आनुमानिका ॥१०८१॥गुणदोषाची जननी ॥ ते नि:शेष अविद्या निरसुनि ॥ जो पवर्तला माझे भजनीं । तो साधु मी मानी मस्तकीं ॥१०८२॥ अभंग - १३श्री तुकाराम महाराज वाक्य--मी याचक तू दाता ॥ काय सत्या पाहों आतां ॥१॥म्या तों पसरिला हात । करी आपुले उचित ॥२॥आह्मी घ्यावे नाम ॥ तुह्मां समाधान ॥३॥तुका ह्मणे देव राजा ॥ वाद खंडी तुझा माझा ॥४॥॥धृ०॥ज्ञा०अ०१० - ह्मणोनि मज आत्मयाचा भाव ॥ जिही जियावया केला ठाव ॥ एक मी वांचूनि वाव । वर मानिले ॥१४१॥तयां तत्वज्ञान चोखटा ॥ दिवी पोतासाची सुभटा ॥ मग मीचि होऊनि दिवटा ॥ पुढां पुढां चाले ॥१४२॥अभंग - १४श्री एकनाथ महाराज वाक्य--एकादशी देवा नैवेद्य व्हावा ॥ भक्त तो मरावा उपवासी ॥ निराहारी राहोनी जागरणा जागले ॥ जीवें मारुनिया ऐसें त्या केलें ॥१॥देव पोटपोसा खातुसे बळे ॥ ज्याचे खाय त्याचे करी वाटोळे ॥धृ०॥श्रीयाळाच्या घरां भोजना गेला ॥ पोटीचा खादला बाळ त्याचा । प्रसन्न होऊनि देवे काय केलें तेथें । न यतीया वाटा लाविले त्याते ॥२॥कपोतियाचें देवे घेऊनिया मिष ॥ भक्ताचे पालटाअ तुकीयले मांस ॥ येव्हढीया निर्वाणा देव संतोषलें ॥ अवघीया नगराचे नि:संतान केले ॥३॥सामास ब्राह्मणे वेचियले कण ॥ त्याचिया पारण्या देवो अतित आपण ॥ चारी भाग देवा आपणाचि नेलें ॥त्याच्या संसाराचे आपोशण केलें ॥४॥विश्वासुनी देव ह्मणे ह्मणाल आप । प्रल्हादा येणे खादला बाप । दान देऊनि भावार्थे बळी ॥ सकुटुंबे देवे घातला पाताळी ॥५॥खावया न मिळे देव माडिली बुध्दि ॥ आवडत्या भक्तांची मेळविली मांदी ॥ लळे देऊनि देव भक्तांते पाळी ॥विश्वासली मग सगळेचि गिळी ॥६॥यापरी देवाचे पोट न धाय । आपले अवयव आपण खाय ॥ एका जनार्दनी एक पण सुख ॥ त्यातें देखोनि देव विसरे तहान भूक ॥७॥ ॥धृ०॥ए०भा०अ०११ - ज्यासि सबाह्य सत्यत्वें तुष्टी ॥ जे सत्य स्वरुपें आले पुष्टी ॥ सत्ये घाली दे ढेकर दृष्टी ॥ ज्याची वाचा उठी सत्यत्वे ॥८४७॥ अभंग - १५श्री तुकाराम महाराज वाक्य--सकळ पूजा स्तुति ॥ करावी ते व्हावें याती ॥ ह्मणोऊनि वारा जण ॥ संत पूजा नारायण ॥२॥सेवावें तें वरी दावी उमटूनि ढेंकरी ॥३॥तुका ह्मणे सुरा ॥ दुधा म्हणतां केवी बरा ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ०११ - या नांव जाण सत्याचे सारे ॥ हे संताचे बसते घर ॥ हें मज मान्या संत साचार ॥ मी निरंतर त्यापाशी ॥८४८॥भजनश्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥आरत्या ---१ झाले समाधान । तुमचे देखि० २ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी० ३ प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ० ४ आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥भजन ---घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥अभंग नाचाचे ----मागणे हे एक तुजप्रती ।भजन----ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम प्रसाद ----पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० ॥शेजाआरती --१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार २. चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम N/A References : N/A Last Updated : December 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP