मालिका ११ एकादशी

श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे.


॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥
(॥ रुप पाहातां लोचनी॥  आणि ॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)

अभंग - १
श्री एकनाथ महाराज वाक्य--
दशमी व्रताचा आरंभु ॥ दिंडी कीर्तन करा करा सामारंभु ॥ तेणे तो स्वयंभु ॥ संतोष पावे ॥१॥
एकादशी जाग्रण । हरी पुजन नाम कीर्तन ॥ द्वादशी क्षीरापती जाण ॥ वैष्णव जन सेवीती ॥२॥
ऐसे व्रत तीन दिन ॥ करी जो आदरे परीपूर्ण ॥ एका जनार्दनी बंधन ॥ तया नाही सर्वथा ॥३॥
व्रतामाजी व्रत एकादशी पावन । दिंडी जागरण देवा प्रिय अष्टही प्रहर हरी कथा करी ॥ वाचे विठठल हरि वदोनिया ॥२॥
टाळ मृदुंग वाजती गजरे ॥ विठठल प्रेमभरे नाचतसे ॥३॥
एका जनार्दनी व्रताचा छंद ॥ तेणें परमानंद सुख पावे ॥४॥
एकादशी एकादशी ॥ जय छंद आहे निशी ॥१॥
व्रत करी जो नेमानें । तया वैकुंठीचे पेणे ॥२॥
नामस्मरण जाग्रण ॥ वाचे गाय नारायण ॥३॥
तोचि भक्त सत्य साचा ॥ एका जनार्दनी ह्मणे वाचा ॥४॥
नामस्मरण हरी कीर्तन ॥ एकादशी व्रत हरि जाग्रण ॥ द्वादशी क्षीरापती सेवन ॥ सुकृता त्या पार नाही ॥१॥
घडतां तिन्ही साधन ॥ कलीमाजी तो पावन ॥ त्याच्या आनुग्रहे करुनी ॥ तरती जन असंख्ये ॥२॥
एका जनार्दनाची भाक ॥ पुन्हां जन्म नाही देख ॥ साधन आणीक ॥ दुजे कारण ॥३॥
व्रत जे करीती तया जे निंदीती ॥ त्याचे पूर्वज जाती नरकामधी ॥१॥
भाळे भोळे भक्त वेडे वाकुडें गाती ॥ तया जे हास्ती ते श्वानसम ॥२॥
स्वमुखे देव आवडीनें सांगे ॥ तयाचिये मागे हींडे देवो ॥३॥
एका जनार्दनी भोळा देव ॥ भक्ताचा गौरव करीतसे ॥४॥
रुक्मांगदा कारणे एकादशीचा ॥ छंद तेणे परमानंद प्रगटला ॥१॥
अंबऋषी कारणें द्वादशीचा छंद ॥ तेणें परमानंद प्रगटला ॥२॥
एका जनार्दनी एक वीध छंदे ॥ तेणे परमानंद प्रगटला ॥४॥

अभंग - २
श्री तुकाराम महाराज वाक्य--
आह्मां देणें धरा सांगतो ते कानी ॥ चिंता पाय मनी विठोबाचे ॥१॥
तेणे माझे चित्त होय समाधान ॥ विलास मिष्टान्न नलगे सोने ॥२॥
व्रत एकादशी द्वारी वृदांवन ॥ कंठी ल्यारे लेणे तुळसीमाळा ॥३॥
तुका ह्मणे त्याचे घरची उष्टावळी ॥ मज ते दिवाळी दसरा सण ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०११ - जे पर्व प्रिय चक्रपाणी ॥ जे सकळ कल्याणाची श्रेणी ॥ उभय पक्षा तारणी ॥ वैष्णव जननी एकादशी ॥१२५९॥

अभंग - ३
श्री नामदेव महाराज वाक्य--
एकादशीदिनी खाईल जो अन्न ॥ सुकर होऊनि येईल जन्मा ॥१॥
एकादशीदिनी करील जो भोग ॥ त्यासी माता संग घडतसे ॥२॥
एकादशी दिनी खळेल जो सोंगटी ॥ काळ हाणील खुंटी गुदस्थनी ॥३॥
रजस्त्री शोणीत सेविल्या समान ॥ तांबुल चर्वण करील जो ॥४॥
नामा ह्मणे नाही माझ्याकडे दोष ॥ पुराणी हे व्यास वाक्य आहे ॥५॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०११ - जे शुक्लकृष्णपक्षविधी ॥ भक्त वाऊनिया खादी ॥ नेऊनियां सायुज्यपदी मोक्ष सिध्दी पाववी ॥१२६०॥

अभंग - ४
श्री तुकाराम महाराज वाक्य--
एकादशीस अन्न पान ॥ जे नर करिती भोजन ॥ श्वानविष्टे समान ॥ अधम जन ते एक ॥१॥
एका व्रताचे महिमान ॥ नेमे आचरती जन ॥ गाती ऐकती हरि कीर्तन ॥ ते समान विष्णुशी ॥२॥
अशुध्द विटाळसीचे खळ ॥ विडा भक्षिती तांबूल ॥ सांपडले सबळ ॥ काळा हाती न सुटे ॥३॥
शेज बाज विलास भोग ॥ करिती कामिनीचा संग ॥ तया जडे क्षयरोग ॥ जन्मव्याधी बळवंत ॥४॥
आपण न वजे हरि कीर्तना ॥ आणिका वारी जाता कोना त्याच्या मापें जाणा ॥ ठेंगणा तो महा मेरू ॥५॥
तया दंडी यमदूत जाले तयाचे अंकित ॥ तुका ह्मणे व्रत ॥ एकादशी चुकलिया ॥६॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०११ - जो एकादशीचा व्रति माझा ॥ तो व्रत तप तीर्थाचा राजा । मज आवडे तो आधोक्षजा ॥ परिग्रहो माझा तो एक ॥१२६५॥

अभंग - ५
श्री तुकाराम महाराज वाक्य--
जया नाही नेम एकादशी व्रत ॥ जाणावे तें प्रेअत सर्व लोकी ॥१॥
त्याचें वय नित्य काळ लेखिताहे ॥ रागे दात खाय करकरा ॥२॥
जयाचिये द्वारी तुळसी वृंदावन ॥ नाही ते स्मशान गृहजाणा ॥३॥
जय कुळी नाही एकहि वैष्ण्दव ॥ त्याचा बुडे भवनदी ताफा ॥४॥
विठोबाचे नाम नुच्चारी जे तोंड । प्रत्यक्ष तें कुंड चर्मकाचे ॥५॥
तुका ह्मणे त्याचे काष्ट हातपाय ॥ कीर्तना न जाय हरिचिया ॥६॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०१२ - जो एकादशीचा व्रतधारी ॥ मा नित्य नोंद त्याच्या घरी सर्व पर्व काळाच्या शिरी ॥ एकादशी खरी पै माझा ॥१२६४॥

अभंग - ६
श्री तुकाराम महाराज वाक्य--
पंधरा दिवसा एकादशी ॥ कांरे न करिसी व्रतसार ॥१॥
काय तुझ्दा जीव जातो एकदिसें ॥ फराळाच्या मिषें धणी घेशी ॥२॥
स्वहित कारण मानवेले जन ॥ हरिकथा पूजन वैष्णवांचे ॥३॥
थोडे तुज घरी होती उजगरे ॥ देऊळासी कारे मरसी जाता ॥४॥
तुका ह्मणे कांरे सुकुमार जालसी ॥ काय जाब देसी यमदूता ॥५॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०११ - तेवी एकादशी पाही ॥ जो जो उत्सवो जे जे समयी ॥ तो तो उपतिष्ठे माझ्याठायी । संदेह नाही सर्वथा ॥१२६३॥


अभंग - ७
श्री तुकाराम महाराज वाक्य--
करविती व्रत अर्ध पुण्य लाभे ॥ मोडता दोघे नरका जाती ॥१॥
शुध्द बुध्दि दोघा एक मान ॥ चोरासवें कोण जीवे राखे ॥२॥
आपुलें देउनी आपुलाची घात । न करावा थीत जाणोनिया ॥३॥
वेच धाडी वाराणसी ॥ नेदावें चोरासि चंद्रबळ ॥४॥
तुका ह्मणे तप तीर्थ व्रत याग ॥ भक्ती हे मार्ग मोडू नये ॥५॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०११ - ऐक माझे भक्ताचें चिन्ह ॥ माझ्या पर्वाचें अनुमोदन ॥ करी करवी आपण ॥ दीनोध्दरण उपावो ॥१२५३॥

अभंग - ८
श्री तुकाराम महाराज वाक्य--
एकादशी सोमवार न करिती ॥ कोण त्यांची गति होईल नेणें ॥१॥
काय करु बहु वाटे तळमळ ॥ आंधळी सकळ बहिर्मुख ॥२॥
हरिहरा नाहीं बोटभरी वती ॥ कोण त्यांची गति होईल नेणो ॥३॥
तुका ह्मणी नाहीं नारायणी प्रीती ॥ कोण त्यांची गति होईल नेणों ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२ - तो शुध्द झाला विष्णुच्या ध्यानी ॥ विष्णुश्याम शिवचिंतनी ॥ विनटले गुणी येरयरा ॥१२५॥

अभंग - ९
श्री तुकाराम महाराज वाक्य--
आह्मी तेणे सुखी ॥ ह्मणा विठठल विठठल मुखी ॥१॥
तुमचें येर वित्त धन ॥ तें मज मृत्तिके समान ॥२॥
कंठी मिरवा तुळसी ॥ व्रत करा एकादशी ॥३॥
म्हणवा हरीचे दास ॥ तुका ह्मणे मज ही आस ॥४॥ ॥धृ०॥

अभंग - १०
श्री तुकाराम महाराज वाक्य--
उदार चक्रवर्ती ॥ वैकुंठीचा भूपति पुंडलिकाचिया प्रीती ॥ विटे उभा राहिला ॥१॥
सर्वसिध्दीचा दातार ॥ सवें आणिला परिवार ॥ भक्ता अभय कर ॥ घ्या घ्या ऐसे म्हणतसे ॥२॥
जेणे हे विश्व निर्मियले ॥ महर्षीदेवां संस्थापिले ॥ एकवीस स्वर्गाते धरिले ॥ सत्तामात्रें आपुलीया ॥३॥
तुका ह्मणे कृपावंत ॥ इच्छिले पुरवी मनी ॥ रिध्दी सिध्दी मोक्ष देत ॥ शेखी संग आपुलीया ॥५॥ ॥धृ०॥

अभंग - ११
श्री नामदेव महाराज वाक्य--
धन्य महाराज जन्मले संसारी । जे ध्याती अंतरी नारायण ॥१॥
नारायण गाय नारायण ध्याय । धन्य त्यासि माय प्रसवली ॥२॥
प्रसवली तया कुळाचा उध्दार ॥ तो तरे निर्धार नामा ह्मणे ॥३॥ ॥धृ०॥
भजन
श्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥
आरत्या ---
१ झाले समाधान । तुमचे देखि०
२ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी०  
३ प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ०
४ आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥
भजन ---
घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥
अभंग नाचाचे ----मागणे हे एक तुजप्रती ।
भजन----ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम
प्रसाद ----पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० ॥
शेजआरती --
१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार
२ चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥
पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम  

N/A

References : N/A
Last Updated : December 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP