मालिका १५ पौर्णिमा

श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे.


॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥
(॥ रुप पाहातां लोचनी॥  आणि ॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)

अभंग -१
श्रीज्ञानेश्वर महाराज वाक्य--
पन्नासा अक्षरी करिसी भरोवरी ॥ शेखिं तुझें तोंड तुज वैरी रया ॥१॥
यापरी नामाची वोळ मांडूनी ॥ संसार दवडूनि घाली परता ॥धृ०॥
रकारापुढें एक मकार मांडी कां ॥ उतरसी समतुका शंभुचिया ॥२॥
बाप रखुमादेवीवर विठठल ह्र्दयी ॥ आपुली आणवाही त्रिभुवनी रया ॥
ए०भा०अ०२० -- नरक स्वर्ग इहलोक ॥ याची प्रीती सांडूनि देख साधावे गा आवश्यक ॥ ज्ञान चोख का निज भक्ति ॥१३५॥
ज्ञान सादावया लागी जाण ॥ कष्टवे नलगे गा आपण । सप्रेम करिता माझे भजेन ॥ दवडिता ज्ञान घररिघे ॥१३६॥

अभंग -२
श्री नामदेव महाराज वाक्य--
जन्ममरणाची कायसी हे चिंता ॥ तुझ्या शरणागता पांडुरंगा ॥१॥
वदनी तुझें नाम अमॄतसंजीवनी ॥ असतां चक्रपाणी भय कावणा ॥२॥
ह्र्दयीं तुझे रुप बिंबलें साचार ॥ तेथें कवणा पार संसाराचा ॥३॥
नामा ह्मणे तुझ्या नामाची परिवार ॥ असतां कळीकाळ पायातळीं ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०११ -- सत्य ज्ञान अनंत ॥ परब्रह्म मी निश्चित ॥ ऐसें जाणुनि मज भजत ॥ उत्तम भक्त ते जाण ॥११२७॥
जेथें चक्रपाणी रक्षिता, तेथें न रिघे भयाची कथावार्ता, यापरी कीर्तिवंता, हरि सर्वथा स्वयें रक्षी ॥११२८॥

अभंग -३
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
सर्वभूती भगवद्भाव ॥ तंव तो भावचि झाला देव ॥१॥
आह्मा ग्रासूं आला काळ ॥ तंव तो काळच झाला कृपाळ ॥२॥
एका जनार्दनी शरण आह्मा कैचें जन्ममरण ॥३॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०१२ -- जो सर्व भुताच्या ठाई ॥ द्वेषाते नेणेची कांही ॥ आपपरु नाही चैतन्या जैसा ॥१४४॥
गाईची तृषा हारु ॥ का व्याघ्रा विष होऊनि मारु ॥ नेणेची गा करु ॥ तोय जैसे ॥१४७॥
तओसी अघवि याची भूतमात्री ॥ एक पणे जया मैत्री । कृपेसी धात्री आपणचि जो ॥१४८॥

अभंग -४
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
भावचि थोर कीं देवचि थोर ॥ दोहींचा निर्धार करुनि पाहा ॥१॥
जंव जंव भाव तंव तंव देव ॥ भावचि नाही तेथें देवचि वाव ॥२॥
एका जनार्दनी जंव जंव्व भाव लटकेम असेल तरी तरी ह्र्दयी पहा हो ॥३॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२ -- एवं जीवांचा निर्वाहो ॥ करिता निज ह्र्दयी असे देवो ॥ तो पहावया बाहेरी धांवो तै मूर्ख पहाहो मी झालों ॥११४६॥
तीर्थी क्षेत्री भेटेल देवो ॥ हा आपले ह्र्दयीचा भावो ॥ निजभावेंवीण पहाहा ॥ तीर्थाही देवो असेना ॥११४७॥

अभंग -५
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
भक्तीच्या पोटा मुक्ति पैं आली ॥ भक्तीनें मुक्तितें वाढविलें ॥१॥
भक्तितें माता मुक्ति ते दुहिता ॥ जाणोनि तत्वतां भजन करी ॥२॥
भक्ति सोडोनि मुक्ति वांछितीं वेडी ॥ गूळ सोडोनि कैसी जे गोडी ॥३॥
संतोषोनि भक्ति ज्यासी दे मुक्ति ॥ तोचि लाभे येर व्यर्थ कां शिणती ॥४॥
एका जनार्दना एक भाव खरा ॥ भक्ति मुक्ति दाटुनी आलिया घरा ॥५॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०११ -- तैसा मी एकीचि परी, आतुडे गा अवधारी, जरी भक्ती येऊनि वरी, चित्तातें गा ॥६८५॥
परितेचि भक्ति ऐसी, पर्जन्याची सुटिका जैसी, धरावाचुनि आनारिसी, गतीचि नेणे ॥५८६॥
तैसें सर्वभावसंभारे, न धरत प्रेम एक सरे, मजमाजी संचरे, मीचि होऊनि ॥६८८॥

अभंग -६
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
भाव तोचि देव भाव तोचि देव ॥ ये अर्थी संदेह धरुं नका ॥१॥
भावें भक्ति फळे भावें देव मिळे ॥ निज भावे सोहळे स्वानंदाचे ॥२॥
एका जनार्दनी भावाच्या आवडी ॥ मनोरथ कोडी पुरती तेणें ॥३॥
भावचि कारण भावचि कारण ॥ यापुरतें साधन नाहीं नाही एका जनार्दनी भावचि कारण ॥ सच्चिदानंदावरील
दावी खूण ॥५॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०८ -- ऐसे जे नित्ययुक्त ॥ तयासी सुलभ मी सतत ॥ म्हणऊनी देहांती निश्चत ॥ मीचि होती ॥१३९॥

अभंग -७
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
आवसे राती अधारी ॥ प्रभा आंतु आणि बाहेरी ॥१॥
मना पाहलें रे मना पाहिले रे ॥ बुध्दि बोध इंद्रिया सम जाहले रे ॥धृ०॥
नयनी पाहतां न दिसे बिंब ॥ अवघा प्रकाश स्वयंभू ॥२॥
एका जनार्दनी पालटू ॥ जनी वनी लखलखाटू ॥३॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०१२ -- आतु बाहेरी चोखाळु ॥ सूर्य तैसा निर्मळु ॥ आणि तत्वार्थीचा पायाळू ॥ देखणा जो ॥१७९॥
व्यापक आणि उदात्त ॥ जैसा का आकाश ॥ तैसे जयाचे मानस ॥ सर्वत्र गा ॥१८०॥


अभंग -८
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
सूर्याचि अवनी मा सूर्यचि आकाश ॥ त्याहीवरी कैसा उगवला चंडाशु ॥१॥
दीपाचें टवळें मा दीपाचिया वाती ॥ त्याहीवरी कवणें प्रकाशिली ज्योति ॥॥धृ०॥
चंद्रचि रात्री मा चंद्रचि चकोरें ॥ त्यातें ही निवविजे कवणे निज चंद्रें ॥२॥
एका जनार्दनी नामे सच्चिदानंद स्वरुपी भेटल्या कवण पैं आनंद ॥३॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०१२ -- हें, असो मग ह्मणितलें ॥ जें कां तुज सांगितलें ॥ तेही भक्त भले ॥ पढियते आह्मा ॥१२३॥
परि जाणोनियां मातें ॥ जे पाहो विसरले माधुतें ॥ जैसें सागरा येऊनि सरिते ॥ मुरडावें ठेलें ॥१२४॥
तैसी अंत:करणकुहरी जन्मली ॥ जयाची प्रतीतिगंगा मज मीनली ॥ तो मी हे काय बोली ॥ फार करु ॥१२५॥

अभंग -९
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
रविबिंबु पिळुनी रोंविली भूमी ॥ पाहो गेलों तव नाही आह्मी तुह्मी ॥१॥
अवघेपणें झाला तेथें ॥ चराचर ह्याले आपैतें ॥धृ०॥
चालों जातां चालणें खुंटे ॥ पाहों जाय तें तेथेंचि भेटे ॥२॥
एका जनार्दनी एकला भेटी ॥ स्वप्रभा एकपणेही घोटी ॥३॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०१२ -- जो निजानंदे घाला ॥ परीणामु आयुष्य आला ॥ पूर्णते जाहाला ॥ वल्लभु जो ॥१७१॥
जयाचिया ठायी पाडवा ॥ अपेक्षे नाही रिगावा ॥ सुखासि चढावा ॥ जयाचे आसणे ॥१७२॥

अभंग -१०
श्री तुकाराम महाराज वाक्य--
आंत हरि बाहेर हरि ॥ हरिनें घरी कोंडिलें ॥१॥
हरिनें कामा घातला चिरा ॥ वित्तवंरा मुकविलें ॥२॥
हरिनेम जीवें केलि साटी ॥ पाडीली तुटी सकळांसी ॥३॥
तुका ह्मणे वेगळा नव्हे ॥ हरि भोवें भोवतला ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०९ -- तैसा मी वांचूण कांही ॥ आणीक गोमटेंचि नाही मजचि नाम पाही ॥ जिणेया ठेविलें ॥३३६॥
जिही मातेंचि अध्यायन, केलें जें आतं बाहेरि मियांचि धाले ॥ जयाचें जीवित्व जोडलें ॥ मजचि लागीं ॥३६१॥
जे अहंकार वाहत आंगी ॥ आह्मी हरीचे भूषवयालागीं ॥ जे लोभिये एकचि जगी ॥ माझेनि लोभें ॥३६२॥
ज्ञा०अ०७ -- हे असा आणिक कांही ॥ तया सर्वत्र मी वांचूनि नाही सबाह्य जळ डोहीं ॥ बुडालिया घटा ॥१३३॥

अभंग -११
श्री तुकाराम महाराज वाक्य--
तरुवर बीजा पोटीं ॥ बीज तरुवरासेवटी ॥१॥
तैसें तुह्मा आह्मां जाले ॥ एकी एक समावलें ॥ उदकावरी तरंग ॥ तरंग उदकाचें अंग ॥३॥
तुका ह्मणे बिंबछाया ॥ ठायी पावली विलया ॥४॥
ए०भा०अ०१२ -- हो कां तरंगू जैसा सागरी ॥ त्यासी जळचि तळीं वरी ॥ तैसा माझा भक्त मज माझारी ॥ सबाह्यभ्यंतरी मद्रुप ॥११३३॥
जेवी निजेल्या पुरुषाची छाया ॥ पुरुषातळी जांयलया ॥ तेवी सविंकार गिळोनि माया ब्रह्म एकलया एकाकी ॥७२॥

अभंग -१२
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
लवण मेळवितां जळें ॥ काय उरले निराळें ॥१॥
तैसा समरस जालों ॥ तुज माजी हरपलों ॥२॥ अग्नि कर्पराच्या मेळीं ॥ काय उरली काजळी ॥३३॥
तुका ह्मणे होती तुझी माझी एक ज्योती ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०७ -- तेथ आर्तुतो आर्तीचेनि व्याजे जिज्ञासु तो जाणावयाचि लागी भजे ॥ ती जेनि तेणें इच्छिजे अर्थसिध्दि ॥११०॥
मग चौथियाच्या ठायी कांहीचि करणें नाही ह्मणोनि भक्तु एकु पाही ॥ ज्ञानिया जो ॥१११॥
जै तया ज्ञानाचेनि प्रकाशे फिटले भेदा भेदांचे कवडसे ॥ मग मीची झाला समरसे ॥ आणि भक्तुही तेविचि ॥११२॥

अभंग -१३
श्री तुकाराम महाराज वाक्य--
पहा रे हें दैवत कैसे ॥ भक्तपिसें भाविका ॥१॥
पाचारील्या सारिसें पावे ॥ ऐसे सेवे वराडी ॥२॥
शुष्काकाष्टी गुरगुरू ॥ लाज हरि न धरितां ॥३॥
तुका ह्मणे अर्धनारी ऐसी धरी रुपडी ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०१९ -- पुरुषे याचे उपासन ॥ जरी करी सकामन ॥ तै कामधनुच्या ऐसे जाण ॥ करिती पूर्ण सकळ कामना ॥४१४॥

अभंग -१४
श्री तुकाराम महाराज वाक्य--
भक्ताहुनि देवा आवडतें काई ॥ त्रिभुवनी नादी आन दुजें ॥१॥
नावडे वैकुंठ क्षीराचा सागर ॥ धरोनि अंतर राहे दासा ॥२॥
सर्व भावें त्याचे सर्वस्वेंही गोड ॥ तुळसीदळ कोड करुनि घ्यावें ॥३॥
सर्वस्वे त्याचा ह्मणवी विकिला ॥ चित्त द्यावें बोला सांगितल्या ॥४॥
तुका ह्मणे भक्ति सुखा बांधिला ॥ आणिक विठठला धर्म नाहीं ॥५॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०१२ -- आम्ही तयाचे करु ध्यान ॥ ते आमुचे देवतार्चन ॥ ते वाचूनि आन ॥ गोमटे नाही ॥२३६॥

भजन
श्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥
आरत्या ---
१ झाले समाधान । तुमचे देखि०
२ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी०  
३ प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ०
४ आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥
भजन ---
घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥
अभंग नाचाचे ----मागणे हे एक तुजप्रती ।
भजन----ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम
प्रसाद ----पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० ॥
शेजाआरती ---
१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार
२. चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥
पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम  
================

N/A

References : N/A
Last Updated : December 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP