मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ज्ञानोदय भजनी मालिका| मालिका १३ त्रयोदशी ज्ञानोदय भजनी मालिका परिचय अनुक्रमणिका मालिका १ प्रतिपदा मालिका २ द्वितिया मालिका ३ तृतीया मालिका ४ चतुर्थी मालिका ५ पंचमी मालिका ६ षष्टी मालिका ७ सप्तमी मालिका ८ अष्टमी मालिका ९ नवमी मालिका १० दशमी मालिका ११ एकादशी मालिका १२ द्वादशी मालिका १३ त्रयोदशी मालिका १४ चतुर्दशी मालिका १५ पौर्णिमा आरती काल्याचे अभंग कीर्तन महात्म्य पंढरी महात्म्य ज्ञान महात्म्य विश्वव्रह्म आरती आणि विश्वब्रह्मकृत श्लोक सप्तक मालिका १३ त्रयोदशी श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे. Tags : bhajandnyanodaymarathiज्ञानोदयभजनमराठी नाम महिमा Translation - भाषांतर ॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥(॥ रुप पाहातां लोचनी॥ आणि ॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)अभंग -१श्रीज्ञानदेव वाक्य--समाधीचें साधन ॥ तें नामराम चिंतन ॥ चित्ता सुख संपन्न ॥ हर्ष जीवनी केला ॥१॥कोटि तपाचिया राशी ॥ जोडती रामनामा पाशीं ॥ नाम जपतां अहर्निशी ॥ वैकुंठपदवीं पाविजे ॥धृ०॥हेचि धुरुसी आठवले ॥ उपमन्यें हेंचि घोकिले ॥ अंबऋषीने सांधिले ॥ रामकृष्ण उच्चारुनी ॥२॥पांडवांशी सदाकाळीं ॥ कृष्ण राहिला जवळी ज्ञान देव ह्र्दयी कमळीं ॥ तैसाचि स्थिरावला ॥३॥अभंग -२श्रीज्ञानदेव वाक्य--आदि मध्य अंत सर्व सम हरि ॥ घट मठ चारई भरला दिसे ॥१॥देखिला गे माये अलक्ष लक्षितां ॥ शांतिपक्ष वाता समबुध्दि ॥धृ०॥भाव बळ धन अलोट अभंग ॥ चित्संगे भंग प्रपंचाचा ॥२॥ज्ञानदेव बोले नित्य नाम प्रेम ॥ तेथेंची विश्राम हरिचा असे ॥३॥ ॥धृ०॥ए०भा०अ०२ -- कृतनिश्चयेसी बुध्दी ॥ होऊनि ठाके समाधी ॥ ऐसी देखोनि ह्र्दयशुध्दी तेथोनि त्रिशुध्दी न निघे हरि ॥७७०॥अभंग -३श्रीज्ञानदेव वाक्य--यमधर्म सांगे दूतां ॥ तुह्मी परिसावी निज कथा ॥ जेथें रामनाम वार्ता ॥ तया देशा नवजावें ॥१॥नामे महादोषां हरण ॥ नामे पतित पावन ॥ नामें कलिमदहन ॥ भवबंधनमोचक ॥धृ०॥जये देशी नाम वसे ॥ नाम श्रवणी विश्वासे ॥ गाती नाचती उल्हासे ॥ झणी पहाल तयांकडे ॥२॥जये ग्रामी हरिपूजन ॥ जये नगरीं हरिकीर्तन ॥ तेथें गेलिया बंधन ॥ तुह्मीं पावाल त्रिशुध्दी ॥३॥जयेदेशी गरुडटका ॥ कुंचे ध्वज आणि पताका ॥ जेथें संतजन आईका ॥ तया देशा नवजावें ॥४॥आणि एक ऐका रे विचारुं जेथें रामनामाचा गजरु ॥ तेथें बापरखुमादेविवरु तया बळे नागाती ॥५॥ ॥धृ०॥ए०भा०अ०२ -- यम नियमा पडती उपवास ॥ मरो टेकले योगाभ्यास ॥ कीर्तन गजरे ह्र्षीकेश ॥ निर्दाळी दोष नाममात्रे ॥५३२॥अभंग -४श्रीज्ञानदेव महाराज वाक्य--समाधि साधन संजीवन नाम ॥ शांति दया सम सर्वाभूति ॥१॥शांतीची पैं शांति निवृत्ती दातारु ॥ हरिनाम उच्चारु दिधला तेणी ॥धृ०॥शम दम कळा विज्ञान सज्ञान ॥ परतोनि अज्ञान न ये घरा ॥२॥ज्ञानदेवा सिध्दि साधन अवीट ॥ भक्तिमार्ग निट हरिपंथा ॥३॥ ॥धृ०॥ए०भा०अ०२६ -- निरपेक्ष तो मुख्य भक्त ॥ निरपेक्ष तो अति विरक्त ॥ निरपेक्ष तो नित्य मुक्त ॥ सत्य भगवंत निरपेक्षी ॥७३५॥चहु पुरुषार्थाचे अधिष्ठान ॥ नरदेह परमपावन ॥ जेणें देहे करितां भजन ॥ ब्रह्म सनातन पाविजे ॥१५९॥अभंग -५ श्री नामदेव महाराज वाक्य--काळ वेळ नसे नामसंकीर्तनी ॥ उंच नीच योनी हेंही नसे ॥१॥धरा नाम कंठी सदा सर्वकाळ ॥ मग तो गोपाळ सांभाळील ॥२॥कृपाळु कोंवसा सुखाचा सागर ॥ करील उध्दार भाविकांसी ॥३॥नामा म्हणीं फार सोपे हे साधन ॥ वाचे नाम घेणें इतुकेची ॥४॥ ॥धृ०॥तुझे नामाचें प्रबळ ॥ माठा नुठविती कळिकाळ । चारी मुक्तिकेवळ ॥ होतो निश्चळ निजदासी ॥५॥अभंग -६श्रीएकनाथ महाराज वाक्य--अखंड वाचें नाम ॥ तया न बाधी क्रोध काम ॥१॥रामनाम वदतां वाचें ॥ ब्रह्मसुख तेथें नाचें ॥२॥रामनामें वाजे टाळी ॥ महादोषा होय होळी ॥३॥दो अक्षरांसाठीं ॥ ब्रह्मा लागे पाटोवाटी ॥४॥ज्ञा०अ०९ -- यम ह्मणे काय यमावें ॥ दम ह्मणे कवणाते दमावें ॥ तीर्थे ह्मणती काय खावें ॥ दोष औषधासि नाही ॥१९९॥ऐसे माझेनि नमघोषें ॥ नाहीचि करिती विश्वाची दु:खें ॥ अवघें जगचि महासुखें ॥ दुमदुमित भरलें ॥२००॥अभंग -७श्रीएकनाथ महाराज वाक्य--ध्यानी बैसोनि शंकर ॥ जपे रामनाम सागर ॥१॥पार्वती पुसे आवडी ॥ काय जपतां तांतडी ॥२॥मंत्र तो मज सांगा ॥ ऐसी बोलतसे दुर्गा ॥३॥एकांती नेऊन ॥ उपदेशी राम अभिधान ॥४॥तेंचि मच्छिंद्रा लाधलें ॥ पुढें परंपरा चालिलें ॥५॥ तोचि बोध जनार्दनी ॥ एका लागतसे चरणी ॥६॥॥धृ०॥ज्ञा०अ०८ -- जें तनू वाचा चित्ते ॥ न ऐकती दुजिये गोष्टी ते ॥ तया एकनीष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे ॥१९२॥अभंग -८श्रीएकनाथ महाराज वाक्य--रामनाम पावन ॥ या परतें थोर कोण ॥१॥जड शिळा ते सागरीं ॥ नाम तरल्या निर्धारी ॥२॥राम जप सदा ॥ नोहे काळाची ती बाधा ॥३॥नाम घेतां निशीदिनीं एका शरण जनार्दनीं ॥४॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०८ -- ऐसे जे नित्ययुक्त ॥ तयांसि सुलभ मी सतत ॥ म्हणऊनि देहांती निश्चित ॥ मीचि होती ॥१४०॥अभंग -९ श्री नामदेव महाराज वाक्य--जळाचा जळबिंदु जळींच तो विरे ॥ तैसे हें विघरे पांचा ठायीं ॥१॥जीव शिव हे उच्चार राम हे मधुर ॥ जिव्हेसी उच्चार रामनाम ॥२॥रामनाम तारक शिव षडांक्षरी ॥ तैसी वाचा करी अरे मूढा ॥३॥नामा ह्मणे ध्यान शिवाचे उत्तम ॥ मंत्र हा परम रामनाम ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ०२ -- कैलासराणा शूलपाणी ब्रह्मा लागे ज्याचे चरणी, तोहि निजराज्य सांडोनी, महात्मशांती हरिचरणां चिती ॥७४६॥कौपीन भस्म जटाधारी चरणोदक धरोनि शिरीं ॥ हरि चरणा ह्र्दय माझारी ॥ शिव निरंतरी चिंतीत ॥७४७॥अभंग -१० श्री नामदेव महाराज वाक्य--नामाचा प्रताप जाणवेना कोणा ॥ समुद्री पाषाण तारीयेले ॥१॥आवडीने कोणी चिंतितां उल्हास ॥ काय तो तयास उपेक्षील ॥२॥कुटिणी ते निच राव्यासाठी नेली ॥ वैकुंठीं ठेविली सारुध्यानें ॥३॥अजमेळा खळ पुत्राचिया मिषें ॥ उध्दरीलें त्यास दिनानाथें ॥४॥नामा ह्मणे ऐसें सांगो आतां किती ॥ नामापाशीं मुक्ती उभी असे ॥५॥अभंग -११ श्री नामदेव महाराज वाक्य--भक्त प्रल्हादाकारणें ॥ त्या वैकुंठीहुनी धांवणे ॥१॥नरहरि पातला पतला ॥ महादोषा पळ सुटला ॥धृ०॥शंख, चक्र, पद्म, गदा ॥ नाभी नाभीरे प्रल्हादा ॥२॥दैतै धरी मांडीवरी ॥ नख विदारी नरहरि ॥३॥पावला गरुडध्वज ॥ नामया स्वमी केशवराज ॥४॥ ॥धृ०॥ज्ञा०अ०९ -- तो प्रल्हाद गा मजसाठी ॥ घेतां बहुतें सदा किरीटी ॥ कां जे मी यां द्यावें ते गोष्टी ॥ तयाचिया जोडे ॥४५१॥अभंग -१२श्री तुकाराम महाराज वाक्य--पुराण प्रसिध्द सीमा ॥ नामतारक महिमा ॥१॥महादोषा पुढें नाहीं गर्भवास ॥२॥जें निंदिलें शास्त्रे वद्य झालें नामामात्रे ॥३॥तुका ह्मणे ऐसा ॥ त्रिभुवनी नाम ठसा ॥४॥ ॥धृ०॥अभंग -१३श्री तुकाराम महाराज वाक्य--तारिली बहुतें चुकवूनि घात ॥ नाम हे अमृत स्वीकारितां ॥१॥नेणतां सायास शुध्द आचरण ॥ यातिकुळहीन नामासाठी ॥२॥जन्म नांव धरी भक्तीच्या पाळणा ॥ आकार कारणा याचसाठी ॥३॥आसुरी दाटली पाप होता फार ॥ मग फेडी भार पृथ्वीचा ॥४॥तुका ह्मणे देव भक्तपण सार ॥ कवतुक वेव्हार तयासाठीं ॥५॥ए०भा०अ०२ -- आत्मा परम प्रिये हरि ॥ ज्याचे नाम कीर्तीचा हर्ष भारी ॥ नीतनवी आवडी बरी । सबाह्याभ्यंतरी हरि प्रकटे ॥५५०॥अभंग -१४श्री तुकाराम महाराज वाक्य----सर्व सुखा अधिकारी ॥ मुखें उच्चारी हरिनाम ॥१॥सर्वांगें तो सर्वोत्तम ॥ मुखी नाम हरिचें ॥२॥ऐसी उभारिली बाहे ॥ वेदीं पाहें पुराणीए ॥३॥तुका ह्मणी येथें कांही संदेह नाही भरंवसा ॥४॥ ॥धृ०॥भ०गीता०अ०७ -- बहुनां जन्मनामंते ज्ञानवान्मां प्रपद्यते ॥ वासुदेव:: सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ: ॥१९॥ज्ञा०अ०७ -- हे समस्तही श्रीवासुदेव ॥ ऐसा प्रतीतिरसाचा वोतला भाव ह्मणोनि भक्तामाजी राव ॥ आणि ज्ञानिया तोचि ॥१३६॥ अभंग -१५श्री तुकाराम महाराज वाक्य--तृषाकाळी उदकें भेटी ॥ पडे मिठी आवडीची ॥१॥ऐसियाचा होकां संग ॥ जिवलग संतांचा ॥२॥मिष्टान्नाचा योग भुके म्हणतां चुके पुरेसें ॥३॥तुका ह्मणे ते वाळा ॥ कळवळा भेटीचा ॥४॥ ॥धृ०॥भजनश्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥आरत्या ---१ झाले समाधान । तुमचे देखि० २करुन आरती । चक्र पाणी ओवाळी० ३प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ० ४ आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥भजन ---घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥अभंग नाचाचे ----मागणे हे एक तुजप्रती ।भजन----ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम प्रसाद ----पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० ॥शेजाआरती ---१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार २. चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम N/A References : N/A Last Updated : December 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP