TransLiteral Foundation

कीर्तन महात्म्य

श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे.


कीर्तन महात्म्य
॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥
(॥ रुप पाहातां लोचनी॥  आणि ॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)

अभंग - १
श्रीज्ञानेश्वर महाराज वाक्य--
सकळ धर्माचे कारण ॥ नामस्मरण हरिकीर्तन ॥ दया क्षमा समाधान । संतजन साधिती ॥१॥
निजधर्म हा चोखडा ॥ नाम उच्चारु घडघडा ॥ भक्तीमुक्तीचा संवगडा ॥ हा भवासिंधुतारक ॥धृ०॥
लावण्य मान्यता विद्यावंत ॥ सुखे स्वजन पुत्र कलत्र ॥ विषय भोग वयसा व्यर्थ । देहासहित मरणावर्ती ॥२॥
जें जें देखणें सकळ ॥ तें स्वन्पीचें मृगजळ ॥ ह्मणोनि चिती चरणकमळ ॥ रखुमादेवीवर विठठलाचें ॥३॥ ॥धृ०॥

अभंग - २
श्रीनामदेव महाराज वाक्ये--
ऐकतां कीर्तण होती जीवन्मुक्त ॥ दाविसी अनंत नाममात्रें ॥१॥
मृत्युलोकी जो जन्म ईच्छा नर ॥ त्याच्या पुण्या पार कोण वाणी ॥२॥
भक्ति सारमृत श्रेष्ठ कलियुगी ॥ उध्द्रिले योगी ब्रह्मादिक ॥३॥
नामा ह्मणे मज नाही चिंता भय ॥ ह्र्दयीं तुमचे पाय पुरे आतां ॥४॥ ॥धृ०॥
कीर्तनें निर्दळिले दोष ॥ जप तप ठेले निरास ॥१॥
यमलोक पाडिला वोस ॥ तीर्थाचि आस निराश जाहली ॥५३१॥

अभंग - ३
श्रीनामदेव महाराज वाक्ये--
नाचूं कीर्तनाचे रंगी ॥ ज्ञानदीप लाऊं जगी ॥१॥
सर्व सांडुनी माझाई ॥ वाचे विठठल रखुमाबाई ॥२॥
परेहुन परतें घर ॥ तेथें राहूं निरंतर ॥३॥
सर्वाचें जे अधिष्ठान ॥ तेंचि माझें रुप पूर्ण ॥ अवघी सत्ता आलिहाता नामयाचा खेचरी दाता ॥५॥ ॥धृ०॥

अभंग - ४
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
नारदें केलासे प्रश्न ॥ सांगतसे जगज्जीवन ॥ कलीमाजी प्रमाण ॥ कीर्तनें करावएं ॥१॥
माहा पापीया उध्दार ॥ पावन करती हरिहर ब्रह्मादि समोर ॥ लोटांगण घालिती ॥२॥
श्रुति स्मृति वाक्यार्थ ॥ कीर्तन तोची परमार्थ ॥ शास्त्राचा मथितार्थ । कीर्तन पसारा ॥३॥
एका शरण जनार्दन ॥ कीर्तनें तरती विश्वजन ॥ हें प्रभूचे वचन ॥ धन्य धन्य मानावें ॥४॥ ॥धृ०॥
अभंग - ५
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
कीर्तन श्रेष्ठ कलियुगी सेवा ॥ तरले पातली ते देवा ॥१॥
वाल्हा तारिला कीर्तनी ॥ पावन झाला त्रिभुवनी ॥२॥
गणिका कीर्तनें तारली ॥ मोक्षधामा ती नेली ॥३॥
आजामेळ चोखामहार । कीर्तनी तरलें अपार ॥४॥
एका जनार्दनी कीर्तन ॥ तिन्ही लोक जाले पावन ॥५॥ ॥धृ०॥
अभंग - ६
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
तरले तरती भरंवसा ॥ कीर्तन महिमा ऐसा ॥१॥
ह्मणोनिया हरिचे दास ॥ कीर्तन करिती सावकाश ॥२॥
एका जनार्दनी कीर्तन ॥ आनंदें होती तें पावन ॥३॥ ॥धृ०॥
अभंग - ७
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
जेथें सर्वदा कीर्तन घोष ॥ जाती दोष पळुनी ॥१॥
यमधर्म सांगे दूतां ॥ तुह्मी सर्वथा जाऊं नका ॥२॥
जेथें स्वयें हरि उभा ॥ कोण शोभा तुमची ॥३॥
तुह्मी रहावें उभें पुढें ॥ आले कोडें निवारावें ॥४॥
एका जनार्दनी कीर्तन ॥ श्रेष्ठ सर्वाहुनी जाण ॥५॥ ॥धृ०॥

अभंग - ८
श्री तुकाराम महाराज वाक्य--
करावें कीर्तन ॥ मुखें गावें हरिचें गुण ॥१॥
मग कांही नव्हे बाधा ॥ काम दुर्जनाच्या क्रोधा ॥ शांतिखड हाती ॥ काळासी ते नागविती ॥३॥
तुका ह्मणी दाता सखा ॥ ऐसा अनंतासारिखा ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२ -- चक्रे अभिमानाचा करि चेंदा ॥ मोह ममता छेदी गदा ॥ शंखे उद्बोधी निजबोधा ॥ निज कमळे सदा निज भक्त पुजी ॥५३५॥

अभंग - ९
श्री तुकाराम महाराज वाक्य--
कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथीचें उत्त्म चरणरज वंदिता ॥१॥
जळती दोषांचे डोंगर शुध्द होती नारी नर ॥ गाती एकती सादर जे पवित्र हरिकथा ॥२॥
तीर्थे तया ठाया यती पुनीत व्हावया ॥ पर्वकाळ पायांतळी वसे वैष्णवां ॥३॥
अनुपम्य हा महिमा नाही द्यावया उपमा ॥ तुका ह्मणे ब्रह्मा नेणे वर्णू या सखा ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२ -- रामकृष्णादि नामश्रेणी ॥ अखंड गर्जे ज्याची वाणी ॥ त्यासी तीर्थे यती लोटांगणी ॥ सुरवर चरणी लागती स्वये ॥५४०॥

अभंग - १०
श्री तुकाराम महाराज वाक्य--
कीर्तण चांग कीर्तन चांग ॥ होय अंग हरिरुप ॥१॥
प्रेमछंदे नाचे डोले ॥ हरपले देहभाव ॥२॥
एकदेशी जीव कळा । हा सकळा सोयरा ॥३॥
तुका ह्मणे उरला देव ॥ गेला भव ते काळी ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२ -- जेवढी नामाची निज शक्ती ॥ एवढे पाप नाही त्रिजगती ॥ नामापासी चारी मुक्ती ॥ जाण निश्चिती विदेहा ॥५४३॥

अभंग - ११
श्री तुकाराम महाराज वाक्य--
यम सांगे दूता तुह्मां नाही तेथें सत्ता ॥ जेथें होय कथा सदा घोष नामाचा ॥१॥
नका जाऊ तया गांवां नामधारकाच्या शिवा ॥ सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती ॥२॥
चक्र गदा घेऊनि हरि उभा असे त्यांचे द्वारी ॥ लक्ष्मी कामारी ऋध्दिसिध्दी सहित ॥३॥
ते बळिया शिरोमणी हरिभक्त्य मेदिनी ॥ तुका ह्मणे कानी यम सांगे दूतांचे ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२ -- साच नामाचे निज तेज ॥ यम बंदी चरणरज ॥ नामापाशी आधोक्षज ॥ चतुर्भुज स्वये तिष्टे ॥५४१॥

अभंग - १२
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
येती कीर्तना आल्हादें ॥ गाती नाचती परमानंदे ॥ सुखाचे ते दोंदे ॥ आनंदे तयासी ॥१॥
धन्य धन्य कीर्तन ॥ धन्य धन्य संतजन ॥ जाले कीर्तनी पावन ॥ परमानंद गजरी ॥२॥
हरि कृष्ण गोविंद ॥ हाची तया नित्य छंद ॥ तेणे जाय भेदाभेद ॥ कीर्तन गजरीं ॥३॥
एका जनार्दनी सार ॥ कीर्तनी केलासे निर्धार ॥ आणिक नाही दुजा विचार ॥ कीर्तनावांचूनी ॥४॥ ॥धृ०॥
भजन
श्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥
आरत्या ---
१ झाले समाधान । तुमचे देखि०
२ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी०  
३ प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ०
४ आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥
भजन ---
घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥
अभंग नाचाचे --मागणे हे एक तुजप्रती ।
भजन--ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम
प्रसाद --पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० ॥
शेजाआरती --१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार
२. चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥
पुंडलीक वरदे हरि विठठल श्रीज्ञानदेव तुकाराम  

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-12-06T21:57:53.4630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

पुचाट

 • वि. दुबळा , दुर्बळ , नेभळट , पोकळ , पोचट , फुसका , बावळट , हलका . 
RANDOM WORD

Did you know?

कपिलाषष्ठीचा योग म्हणजे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.