मालिका ६ षष्टी

श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे.


॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥
(॥ रुप पाहातां लोचनी॥ ) आणि (॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)

अभंग -१
श्री तुकाराम महाराज वाक्य--
करणे ते हेंचि करा ॥ नरका अघोरा कां जातां ॥१॥
जयामध्यें नारायण ॥ शुध्द पुण्य तें एक ॥२॥
शरणांगतां देव राखे ॥ यरां वाखे विघ्रांचे ॥३॥
तुका ह्मणे लीन व्हावे । कळे भावें वर्म हे ॥४॥
ए०भा०अ०२ -- जेथें सप्रेम नाही माझी भक्ती ॥ तेथे कर्मे अवश्य बाधिती । कर्मास्तव अन्यथा गती अभक्त पावती उध्दवा ॥४०९॥
ए०भा०अ०९ -- देहसुखाचिया चाडा । पडे पर गृहाचे खोडा ॥ दार गृहलोभे केला वेडा । न देखे पुढा निज स्वार्थु ॥३०९॥
एव इंद्रियाशी विषयासक्ती ॥ तेणे वासना दृढ होती ॥ त्या देह देहांतरा प्रती । पुरुषाशी नेती सर्वथा ॥३१९॥
यालागी करवया विषय त्यागु ॥ अवश्य छेदावा देहसंगु ॥ ईये आर्थी मनुष्यदेह चांगु । ज्ञान विभागु या देही ॥३२०॥

अभंग -२
श्री एकनाथ महाराज वाक्य--
भक्ति वे उदरी जन्मले ज्ञान । भक्तीनें ज्ञानासी दिधले महि मान ॥१॥
भक्ती ते मुळ ज्ञान तें फळ । वैराग्य केवळ तेथीचे फुल ॥२॥
फूल फळ दोन्ही येरयेरां पाठीं । ज्ञान वैराग्य तेवि भक्तीचे पोटी ॥३॥
भक्तीविण ज्ञान गिवसिती वेडे ॥ मूळ नाहीं तेथें फळ केविं जोडे ॥४॥
भक्तीयुक्त ज्ञान तेथें नाही पतन भक्ती माता तया करितसे जतन ॥५॥
शुध्दभक्तिभाव तेथें तिष्ठे देव ॥ ज्ञानासीतो ठाव सुखवस्तीसी ॥६॥
शुध्दभाव तेथे भक्तियुक्त ज्ञान तयाचेनी अंगे समाधी समाधान ॥७॥
एका जनार्दनी शुध्द भक्तीक्रिया ॥ ब्रह्मज्ञान त्यांच्या लागतसे पायां ॥८॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०९ -- भक्त माझियाकडे दावी । आणि मी दोन्ही हात बोडवी ॥ मग देंठ न फोडितां सेवी आदरेसी ॥३८३॥
हे सांगावे काय किरीटी । तुवाची देखिले आपुलीया दिटी । मी सुदाम याचिया सोडी गांठी पहावया लागी ॥३९४॥
पै भक्ती एकी मी जाणे ॥ तेथ सान थोर न ह्मणे आम्ही भावाचे पाहुणे ॥ भलतेया ॥३९५॥

अभंग -३
श्री एकनाथ महाराज वाक्य--
सोंगें छंदें कांही ॥ देव जोडे ऐसें नाही ॥१॥
सारा अवघें गाबाळ ॥ डोळ्या आडील पडळ ॥२॥
शुध्द भावावीण जो जो केला तो तो सीण ॥३॥
तुका ह्मणे कळे परी होताती आंधळे ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२ -- येथें भावेंवीण तत्वता ॥ परमार्थ नये हाता ॥ सकळ साधनांचे माथा ॥ जाण तत्वता सद्‍भावो ॥७७०॥

अभंग - ४
श्री तुकाराम महाराज वाक्य--
चिरगुटें घालुनी वाढविले पोट । गर्‍हवार बोभाट जनामध्यें ॥१॥
लटिकेचि डोहळे दाखवी प्रकार । दुध स्तनी पोर पोटी नाही ॥२॥
तुका ह्मणे अंती वांचचि ते खरी फजिती दुसरी जनामध्यें ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२ -- सद्भाव नाही अंतरी ॥ ब्रह्मभक्ती भावेची करी । ते भावानुसारे संसारी ॥ नाना परी स्वयें ठकती ॥४४८॥
ठकले ते मनुष्यगती ॥ ठकले ते निजस्वार्थी ॥ ठकले ते ब्रह्मप्राप्ती । दंभे हरिअभक्ती कदां नुपजे ॥७७९॥

अभंग -५
श्री तुकाराम महाराज वाक्य--
फोडुनि सांगडी बांधीली पाटीसी ॥ पैलथडी कैसी पाये सहजी ॥१॥
आपला घात आपणची करी आणिक सांगतां नाइके तरी ॥२॥
भुके भेणी विष घेऊं पाहे आतां ॥ आपल्याचि घाता करु पाहे ॥३॥
तुका ह्मणे एक चालतील पुढें ॥ तयांसी वांकडे जातां ठके ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०१८ -- नाना उसांची कणसें का नपुसकें माणसें ॥ वन लागले जैसे ॥ सावरीच ॥५७६॥
ज्ञा०अ०९ -- तैसे ज्ञानजात तयां ॥ आणि जे कांही आचरले गा धनंजया । ते अघवेंचि गेले वाया । जे चित्तहीन ॥७८॥
आवचटे आ साधु संगती ॥ जोडल्या वाटे विषयासक्ती ॥ तेण उटी आधर्म रीती ॥ विवेक स्फूर्ति घाताक ॥४५॥
वाढल्या विषयासक्ती ॥ आंध होय ज्ञानस्फूर्ति ॥ आपण आपली न देखे गती । जेवी आंधळि राती आंधळेंची ॥४६॥

अभंग - ६
श्री तुकाराम महाराज वाक्य--
इंद्रियासी नमेनाही मुखी राम ह्मणोनि कांई ॥ जेवी मासी सवें अन्न ॥ सुख नेदी तें भोजन ॥२॥
कीर्तन करावें ॥ तैसें करुनि दावावें ॥३॥
ही तों अंगी नाही चिन्ह गाईले वेश्येच्या ढव्यानें ॥४॥
तुका ह्मणे रागा । संत शिवूं ने दिती अंगा ॥५॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२५ -- चित्तवृत्ती क्रियचरण ॥ त्या नांव गा कर्म जाण ॥ तेथ निरपेक्ष तें माझे भजन ॥ स्वधर्म संपूर्ण या नांव ॥१६२॥
अंतरी अनिवार कामना ॥ बाह्य विरक्ती दावी जना ॥ ते सहवया विटंबना ॥ त्याग विचक्षणा तो नव्हे ॥५४॥

अभंग -७
श्री तुकाराम महाराज वाक्य--
विषयांचे लोलिंगत ॥ ते फजीत होतील ॥१॥
न सरे तेथे यातिकुळ ॥ शुध्द मूळ बीज व्हावें ॥२॥
शिखा सुत्र सोंग वरी ॥ दुराचारी दंड पावे ॥३॥
तुका ह्मणे अभिमान ॥ नारायन न सोसे ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२२ -- विषयांचे गोडपण । ते विखहुनि दारुण ॥ विष एकदा आणि सरण ॥ पुन: पुन: मरण विषयाचे ॥१६१॥
पुढती जन्म पुढती मरण ॥ संसाराचे सबळ । विषयाधीन उध्दवा ॥१६२॥
ज्ञा०अ०८ -- जे विषयासी तिळांजळी देऊनी ॥ प्रवृत्ती वरी निगड वाउनी ॥ माते ह्र्दयी सुनी ॥ भोगिताती ॥१२४॥

अभंग - ८
श्री तुकाराम महाराज वाक्य--
धाई अंतरीच्या सुखें ॥ काय बडबड वाचा मुखें ॥१॥
विधिनिषेध उर फोडी । जंव नाहीं अनुभव गोडी ॥२॥
वाढे तळमळी उभयतां ॥ नाही देखिले अनुभवितां ॥३॥
आपुल्या मतें पिसें ॥ परी तें आहे जैसें तैसे ॥४॥
साधनाची सिध्दी ॥ मौन करा स्थिर बुध्दि ॥ तुका ह्मणें वादें ॥ वायां गेली ब्रह्मवृंदे ॥५॥
ए०भा०अ०१७ -- माझा भाव नाही जिव्हारी ॥ अहच वाहाच माझी भक्ती करी ॥ तो आंधळ्या गारुडयाचे परी उडे परी निर्धारी स्थन नेणें ॥११८॥
माझा भावार्थ जेथे होये ॥ तेथ मी जाती कुल न पाहे ॥ मी भावाचेनि लवलाहे ॥ वश्य होये निजभक्ता ॥११९॥
 
अभंग -९
श्री नामदेव महाराज वाक्य--
चंद्र सूर्यादी बिंबे लिहिताती सांग ॥ परि प्रकाशाचे अंग लिहितां नये ॥१॥
सन्यासाची सोंगे अणिताति सांग ॥ परि वैराग्याचें अंग नये ॥२॥
नामा ह्मणे कीर्तन करिताति सांग । प्रमाचे तें अंग आणितां नये ॥३॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०१ -- संन्यास घेतां पूर्वदृष्टी । जें वैराग्य होतें पोटी ॥ ते संन्यास घेतल्या पाठी ॥ उठाउठी पळालें ॥२९१॥
ज्ञानेंद्रियें पांच सहावें मन । हेचि अरि षड्‍वर्ग जाण । यांचे न करितां निर्दळण ॥ संन्यासपण विटंबू ॥२९२॥

अभंग -१०
श्री नामदेव महाराज वाक्य--
बाळ वृध्द तरून काया हे जर्जर ॥ वेगी हा पाम्र अळशी झाला ॥१॥
काय करुं देवा नाही यासि भावो । न करि हा उपावो तुझ्या भजनी ॥२॥
मन ठेवी ठायीं रंगे तूं श्रीरंगीं ॥ गोष्टी त्य वाउगी बोलूं नको ॥३॥
नामा ह्मणे श्रीरंगु चित्ती पां चोखडा ॥ उघडा पोवाडा सांगितला ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२ -- तैसें नरदेहा येऊनि नरा ॥ करीताति आयुष्याचा मातेरा ॥ पूर्ण व्यवसाय शिश्नोदरा ॥ उपहस निद्रा कां निंद्रा ॥२५॥

अभंग - ११
श्री नामदेव महाराज वाक्य--
अद्वैत सुख कैसोनि आतुडे ॥ जंववरी न संडे मीतुंपण ॥१॥
शुध्द चित्रकथा सांगती पाल्हाळ ॥ मन नाही केवळ विठठलदेवी ॥२॥
अणुचे प्रमाण असातां दुजेपण ॥ मरुते समान देईल दु:ख ॥३॥
नामा ह्मणी सर्व आत्मरुप पाही ॥ तरीच ठायीच्याठायीं निवशील ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२ -- जेवी कां भुकेलिया पाशी ॥ ताट वाढिले षड्सी ॥ तो पुष्ठी तुष्टी क्षुधानासी । जेवी ग्रासो ग्रासी स्वयेचि पावे ॥६०२॥
जितुका जितुका घेईजे घास ॥ तितुका तितुका क्षुधेनाश ॥ तितुकाची पुष्टी विन्यास ॥ सखो उल्हास तितुकाची ॥६०३॥

अभंग -१२
श्री तुकाराम महाराज वाक्य--
खोटयच विकरा ॥ येथें नव्हे कांच हिरा ॥२॥
काय दावायचें काम ॥ उगाच वाढवावा श्रम ॥२॥
परीक्षकांविण ॥ मिरवों जतां ते तें हीण ॥३॥
तुका पायां पडें ॥ वाद पुरे हे झगडे ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०९ -- कां रुपवयसा माजा ॥ आथिलेपणें कागाना ॥ एक भाव नाही माझा ॥ तरी पाल्हाळ ते ॥४३२॥
कणेवीण सोपटें ॥ कणसें लागली घनदाटें ॥ काय करावें गोमटे ॥ वोस नगर ॥४३३॥

अभंग - १३
श्री तुकाराम महाराज वाक्य--
निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म ॥ निर्धार हें वर्म चुकों नये ॥१॥
निष्कमनिश्वळ विठठली विश्वास ॥ पाहो नये वास आणि कांची ॥२॥
तुका ह्मणे ऐसा कोण उपेक्षिला ॥ नाही ऐकिला ऐसा कोणी ॥३॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०१२ -- ऐसा बोधुची केवळ ॥ जो होऊनी असे निखळु ॥ त्याही वरी भजन शीळु ॥ माझ्या ठायी ॥१९५॥
तरी तया ऐसें दुसरें ॥ आम्हां पढयिते सोयरे ॥ नाही गा साचो कारे । तुझी आण ॥१९५॥

अभंग -१४
श्री एकनाथ महाराज वाक्य--
भावापुढें बळ ॥ नाही कोणाचें सबळ ॥१॥
करी देवा वरी सत्ता । कोण त्याहुनि परता ॥२॥
बैसे तथें येती ॥ न पाचारितां सर्व शक्ती ॥३॥
तुका ह्मणें राहे ॥ तया कडे कोण पाहे ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२ -- तेवी भक्तीचिया प्रेमप्रीती ॥ ह्र्दयीं कोंडिला श्रीपती ॥ तेथें खुंटल्या सामर्थ्यशक्ती ॥ भावर्थ प्रती बळ न चलें ॥७७५॥

अभंग -१५
श्री एकनाथ महाराज वाक्य--
भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा ॥ अभिमान नित्य नवा तया माजी ॥१॥
प्रेमसुख देई प्रेमसुख देई ॥ प्रेमविण नाही समाधान ॥२॥
रांडवेनें जेवी शृंगारु केला ॥ प्रेमाविण झाला ज्ञानी तैसा ॥३॥
एका जनार्दनी प्रेम अति गोड ॥ अनुभवी सुखाड जाणतील ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०१२ -- यावे उत्तमासी मस्तक । खालाविजे हे काय कौतुक ॥ परी मानु करीती तीन्ही लोक ॥ पायवणीया ॥२१५॥
तरी श्रध्दा वस्तुसी आदरु ॥ करीता जाणीजे प्रकार ॥ जरी होय श्रीगुरु ॥ सदाशीवु ॥२१६॥

अभंग - १६
श्री ज्ञानदेव महाराज वाक्य--
सुची अंबुल ज्ञान घाराचचु ॥ भक्ति हे साकारु आवडली ॥१॥
काय सांगू माये निर्गुण अंबुला ॥ शून्यीं मिळाला नाही ठाई ॥२॥ ॥धृ०॥
रखुमादेवी वरु साकार अंबुला । मज पर्ण आला बाईयांनो ॥३॥॥धृ०॥
ए०भा०अ०२ -- ह्मणा तेवी निजभक्त लळेवाड ॥ त्यांचे प्रेम अत्यंत गोड ॥ निघावयाची विसरोनिचाड ॥ ह्र्दयीसुखाड मानी हा ॥७७७॥

अभंग - १७
श्री तुकाराम महाराज वाक्य--
तुमचिये दासाचा दास करु नि ठेवा ॥ आशीर्वाद द्यावा हाचि मज ॥१॥
नवविधा काय बोलिली जे भक्ती ॥ घ्यावी माझ्या हाती संतजनी ॥२॥
तुका ह्मणी तुमच्या पायांच्या आधारें ॥ उतरेन पार भवनदी ॥३॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०१२ -- जेणें मी प्रीती करील कामनी शरिसा धरी ॥ एवढी थोरी ॥ जयास्थितीये ॥२२९॥
भजन
श्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥
आरत्या ---
१ झाले समाधान । तुमचे देखि०
२ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी०  
३ प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ०
४ आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥
भजन ---
घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥
अभंग नाटाचे-- मागणे हे एक तुजप्रती ।
भजन--ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम
प्रसाद--पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० ॥
शेजआरती --
१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार
२ चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥
पुंडलीक वरदे हरि विठठल श्रीज्ञानदेव तुकाराम

N/A

References : N/A
Last Updated : December 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP