ज्ञान महात्म्य

श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे.


अभंग - १
श्री तुकाराम महाराज वाक्य--
देह बुध्दि वसे जयाचि अंगी ॥ पूज्यताते जगी सुख मानी ॥१॥
थोर असे दगा झाला त्यासी हाटी ॥ सोडोनियां गांठी चोरी नेली ॥२॥
गांठीचें जाऊनि नव्हें तों मोकळा ॥ बांधविला गळ दंभलोभे ॥३॥
पुढिल्या उदिमा झालेंसें खंडण ॥ दिसे नागवण पडे गांठी ॥४॥
तुका ह्मणे ऐसे बोलतील संत ॥ जाणुनि घात कोण करी ॥५॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०७ -- आधींच प्रकृतीचे पाईक ॥ करि भोगालागी तंव रंक ॥ मग तेनें लोलुपत्वें कौतुक ॥ कैसेनि भजता ॥१४१॥

अभंग - २
श्री तुकाराम महाराज वाक्य--
ढेकणाचे संगें हिरा जो भंगला ॥ कुसंगे नाडला तैसा साधु ॥१॥
ओढयाचे संगें सात्विक नासली ॥ क्षण एक नाडली समागमें ॥३॥
डांकाचे संगती सोने हीन झालें ॥ मोल ते तुट्ले लक्ष कोडी ॥३॥
विषानें पक्कान्ने गोड कडूं झाली ॥ कुसंगानें केली तैसी परी ॥४॥
भावें तुका ह्मणे सत्संग हा बरा ॥ कुसंग हा फेरा चौर्‍यांशीचा ॥५॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०७ -- असंतुष्टीचिया मदिरा ॥ मत्त होवोनिया तनु धरा ॥ विषयाचे बोवरा ॥ विकृतीसीं ॥१६९॥
तेणे भावशुध्दीचिया वाटे ॥ विखुरले विकल्पाचे कांटे ॥ मग चिरीलें अव्हांटे ॥ अप्रवृत्तीचे ॥१७०॥
तेणें भूतें भांबवली ॥ ह्मणोनि संसाराचिया आडवामाजि पडिली ॥ मग माहादु:खाच्या घेतली ॥ वोझें वरी ॥१७१॥

अभंग - ३
श्री तुकाराम महाराज वाक्य--
असंत लक्षण भूतांचा मत्सर ॥ मनास निष्ठुर अतिवादी ॥१॥
अंतरीचा रंग उमटे बाहेरी ॥ वोळखी यापरी आपोआप ॥२॥
संत ते समय वोळखती वेळ ॥ संतुष्ट निर्मळ चित्त सदा ॥३॥
तुका ह्मणे हित उचित अनुचित ॥ मज लागे नित आचरावे ॥ विचारावें ॥४॥
ए०भा०अ०१८ -- नसोनि ब्रह्मानुभव साचार जो उच्छेंदी निजाचारा तो केवळ पाखंडी नर ॥ उदरभर दु:शील ॥२०७॥
ऐशीया वादाचा विटाळ । ज्याचे वाचेनि नाही आळुमाळ ॥ नलगे असत्याचाही मळ ॥ तो नित्य निर्मळ निज बोधें ॥२०८॥
शुष्क वाद वृथा गोष्टी ॥ त्यांतही वाग्वाद उठी । होय नव्हें कपाळ पिटा ॥ मिथ्या चावटी करीना ॥२०९॥

अभंग - ४
श्री तुकाराम महाराज वाक्य--
लौकिका पुरता नव्हे माझी सेवा ॥ अनन्य केशवा दास तुझा ॥१॥
म्हणोनि करी पायां सवें आळी ॥ आणिक वेगळी नेणें परी ॥२॥
एकविध आह्मीं स्वामिसेवेसाठी ॥ वरी तोचि पोटी एकभाव ॥३॥
तुका ह्मणे करी सांगितलें काम ॥ तुह्मां धर्माधर्म ठावें देवा ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२ --एवं देहीची कर्मे निपजता ॥ पूर्ण प्रतीती भक्त अकर्ता । कर्माकर्माची अवस्था । नघेतो पाथां अनहंकृती ॥७०११॥
समूळ देहाभिमान झडे ॥ तो देहीचि देवासि आवडे ॥ ते भक्त जाण वाडे कोडे ॥ लडवाळे हरीचे ॥७०१३॥

अभंग - ५
श्री तुकाराम महाराज वाक्य--
आणिकांची स्तुति आह्मां ब्रह्महत्त्या ॥ एकावांचूनि, त्या पांडुरंग ॥१॥
आह्मा विष्णुदासा एकविध भाव ॥ न ह्मणों या देव आणिकासी ॥२॥
शतखंड होईल रसना ॥ जरी या वचना पालटेना ॥३॥
तुका ह्मणे मज आणिका संकल्पें ॥ अवघीच पापें घडतील ॥४॥
ए०भा०अ०११ --नाना विषयीं ठेवूनी मना ॥ जो करि ध्यान अनुष्ठान ॥ ते आरस्त्रियेच्या ऐसे जाण ॥ नव्हें पावन ते भक्ति ॥११६॥
तो पुरुषामाजी पुरुषोत्तम ॥ साधुमाजी अति उत्तम ॥ तो माझा अति विश्राम ॥ अकृत्रिम उध्दवा ॥११२३॥
यालागी मी आपण ॥ करी सर्वागाचे आंथरुण ॥ जीवें सर्वस्वें निंबलोण प्रतिपदीं जाण मी करी ॥१११३॥
तो मज आवडे म्हणशी कसा । जीवासि पढिये प्राण जैसा ॥ सांगतां उत्तम भक्त दशप्रेम पिसा देवो झाला ॥११४॥

अभंग - ६
श्री तुकाराम महाराज वाक्य--
पतिव्रता नेणें आणिकांची स्तुति ॥ सर्वभावें पति ध्यानी मनी ॥१॥
तैसे माझें मन एक विध झालें ॥ नावडे विठठलेविणें दुजे ॥२॥
सूर्यविकासिनी नेघे चंद्रकळा ॥ गाय ते कोकिळा वसंतेंसी ॥३॥
तुका ह्मणे बाळ मातें पुढें नाचें ॥ बोल आणिकाचे नावडती ॥४॥ ॥धृ०॥
ज्ञा०अ०९ -- तूं मन हें मीचि करी ॥ माझिया भजनी प्रेम धरीं सर्वत्र नमस्कारी ॥ मज एकतें ॥५१७॥
माझेनि अनुसंधानें देख ॥ संकल्प जाळणें नि:शेष ॥ मद्याजी चोख ॥ याचि नांव ॥५१८॥
ऐसा मियां आथिली होसी ॥ तेथ माझियाचि स्वरुपा पावसी ॥ हें अंत:करणीचें तुजपासी ॥ बोलिजत असे ॥५१९॥
अगा अवघियां चोरियां आपुलें ॥ जें सर्वस्व आह्मी असे ठेविलें ॥ तें, पावोनि सुख संचलें ॥ होऊनि ठासी ॥५२०॥
गोडी आवडी ते परपुरुषी ॥ लुडबुडी निजपतीपासी ॥ पतिव्रता नव्हे जैसी ॥ जाण भक्ति तैशी व्याभिचारी ॥११०७॥

अभंग - ७
श्री तुकाराम महाराज वाक्य--
विठठला वांचूनि ब्रह्म जे बोलती ॥ वचन से संती मानूं नये ॥१॥
विठ्ठला वांचूनि जे जे उपासना अवघाची जाणा सभ्रम तों ॥२॥
विठठला वांचूनि सांगतिल गोष्टी ॥ वयांते हीपुटी होत जाणा ॥३॥
विठठलांवाचूनि जें कांही जाणती ॥ तितूक्या विपत्ती वाऊगीया ॥४॥
तुका ह्मणे एक विठठलचि खरा येर तो पसारा वाउगाचि ॥५॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२ --मामेव ये प्रपद्येंतें मायामेतां तंरति ते ॥ माया ह्मणिजे भगगच्छक्ति॥ भगवद्भजने तिची निवृत्ती ॥ आन उपाय तेथे न
चलती ॥ भक्त सुखे तरती माया ॥ ऐसे श्रेष्ठ जे ब्रह्मज्ञान ॥ ते भक्तीचे पोषण जाण ॥ नकरितां भगवद्भजन ब्रह्म ज्ञान
कदा नुपजे ॥

अभंग - ८
श्री तुकाराम महाराज वाक्य--
उंच नीच कैसी पाईका ओळी ॥ कोण गांढें बळी निवडलें ॥१॥
स्वामिकाजी एक सर्वस्वें तत्पर ॥ एक ते कुचर अशाबब्द ॥२॥
प्रसंगावाचूनि आणिती हावभाव ॥ पाईक तो नांव मिरवी वायां ॥३॥
गणतीचे एक उंचनीच फर ॥ तयां मध्यें शूर विरळा थोडे ॥४॥
तुका ह्मणे स्वामी जाणे मान ॥ पाईक पाहोन मोलकरी ॥५॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०११ --तैसा साधु ह्मणे जे जे माझें ॥ ते तें त्यालिनाठवे दुजे ॥ ऐक्याभावाचे नाचची भोंजे ॥ आधोक्षजे अंकीतू सकळ सांडूनि
वना गेला ॥ वनी वनिता चिंतु लागला ॥ वोत्यागाचि बाधक त्वा आला उलथान फडिसा परिग्रहो ॥

अभंग - ९
श्री तुकाराम महाराज वाक्य--
जातीचा पाईक ओळखे पाईका ॥ आदर तो एक त्याचे ठायी ॥१॥
धरीतील पोटासाठी हतियेरे ॥ कळ्दती ती खरें वेठसीची ॥२॥
जातीचें तें असें खरें घायडाय ॥ परकिया काय पाशी लोपे ॥३॥
तुका ह्मणे नमुं देव म्हणु जना ॥ जालियांच्या खुणा जाणतसो ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०२ --एवं ब्रह्मा आणि शंकर ॥ चरणाचे न पावती पार ॥ तेथें तैलोक्याचे वैभव थोर ॥ मानीतो पामर आति मंद भाग्य ॥७४८॥
हरी चरण क्षणार्ध प्राप्ती ॥ त्रैलोक्य राजसंपत्ती ॥ भक्त ओवाळुनि सांडीवीचे ॥ जाण निश्चिती निंबलोण ॥७४८॥

अभंग - १०
श्री तुकाराम महाराज वाक्य--
भल्याचे करण सांगावे स्वहित ॥ जैसी कळे नीत आपणांसी ॥१॥
परी आह्मी असो एकाचिये हाती नाचवितों चित्ती त्याचें तैसें ॥२॥
वाटु सांगे त्याच्या पुण्या नाही पार ॥ होती उपकार अगणित ॥३॥
तुका ह्मणे बहु कृपावंत ॥ आपुले उचित केले संती ॥४॥ ॥धृ०॥
ए०भा०अ०१२ --पाहातां केवळ जड मूढ ॥ रजतमयोनीं जन्मले गुढ ॥ सत्संगती लागोनि दृढ माते सदृढ पावले ॥६४॥
ए०भा०अ०२८ --त्यांसी संत ह्मणोनि कांही घेणें ॥ अथवा असंत ह्मणोनि सांडणें ॥ हे नुरेचि त्यासी वेंगळेंपणें ॥ व्रह्मी ब्रह्म पणे परी
पूर्ण ॥४९२॥
बंधकाळी बध्दता ॥ असेना घेतली नाही ॥ तत्वता ॥ अथवा मुक्ती काळी मुक्तता ॥ आत्मा सर्वथा स्पर्शना ॥९३॥

N/A

References : N/A
Last Updated : December 06, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP