TransLiteral Foundation

पंढरी महात्म्य

श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे.


पंढरी महात्म्य
॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥
(॥ रुप पाहातां लोचनी॥  आणि ॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)

अभंग - १
श्रीज्ञानेश्वर महाराज वाक्य--
हें नव्हें आजिकालिचें ॥ युग अठठाविसांचे ॥ मन निर्ध्दारितां साचें ॥ हा मृत्यु लोकुचि नव्हे ॥ हाचि मानि रे निर्धारु ॥
यरु मांडि रे विचारु ॥ जरि तू पाहसी परात्परु ॥ तरि तूं जारे पंढरीय ॥१॥
बाप तीर्थ पंढरी ॥ भूवैकुंठ महीवरी ॥ भक्ता पुंडलिकाचे द्वारी ॥ कर कटावरी राहिला ॥धृ०॥
काशी आशी अयोध्याकांती ॥ मथुरा गया गोमति ॥ ऐसी तीर्थे इत्यादिक आहेती ॥ परि सरि नपवती पांडुरंगी ॥ हाचि मनी
रे विश्वासु ॥ यर सांडि रे हव्यासु ॥ जरि तूं पहासि वैकुंठवासु ॥ तरि तूं जाय पंढरीये ॥२॥
आड वाहे भीमा ॥ तारावया देह आत्मा ॥ पैलथडिये परमात्मा ॥ मध्यें राहिला पुंडलिकु ॥ यातिहींचे दर्शन ॥ प्राण्या
नाही जन्ममरण ॥ पुनरपि आगमन ॥ येथें बोलिलेचि नाही ॥३॥
पंढरी ह्मण्दजे भूवैकुंठ ॥ ब्रह्म तव उभेचि दिसताहे नीट ॥ या हरिदासासि वाळुवट ॥ जाग्रणासि दीधलें ॥ ह्मणोनि करा
करा रे क्षीरापति नटा नटा कीर्तनवृत्ति ॥ ते तर मोक्षातें पावती ॥ ऐसें बोलति सुरनर ॥४॥
हें चोविसामूर्तीचे उध्दरण ॥ शिवस्त सहस्त्र नामासि गहन ॥ हेंचिब हरिहराचें चिंतन ॥ विश्ववेद्य हें मूर्तीतें ॥ तो हा
देवादिदेवो बरवा ॥ पांडुरंग्ग सदाशिवाचा निजठेवा ॥ बाप रखुमादेवीवरु पंचविसावा ॥ चोविसा मूर्ति वेगळा ॥५॥॥धृ०॥

अभंग - २
श्रीनिवृत्ती महाराज वाक्य--
पुंडलिकाचे भाग्य वर्णावया अमरी ॥ नाहीं चराचरी ऐसा कोणी ॥१॥
विष्णुसहित शिव आणिला पंढरी ॥ केलें भिमातीरी पेखणे जेणे ॥धृ०॥
ब्रह्मादिकां अंत न कळे ज्या रुपाचा ॥ एवढी कीर्ति वाचा बोलों काय ॥२॥
निवृत्ती उच्चारे ॥ वैकुंठ उत्तरे एक्या नामें ॥३॥ ॥धृ०॥

अभंग - ३
श्रीज्ञानदेव महाराज वाक्य--
न चलरि शब्द खुंटले पै वाद ॥ एकत्व भेद नाही रुपा ॥२॥
तें रुप पंढरी क्षरलें चराचरी ॥ माझ्या घरी बिलेंसे ॥धृ०॥
रखुमादेवीवरु पुंडलीकवरु ॥ निळ्याचा आगरु पंढरीये ॥२॥ ॥धृ०॥

अभंग - ४
श्रीनामदेव महाराज वाक्य--
अनंत तीर्थाचे माहेर ॥ अनंत रुपांचे सार ॥ अनंता अनंत अपार ॥ तो हा कटी कर ठेवूनि उभा ॥१॥
धन्य धन्य पांडुरंग ॥ सकळ दोषा होय भंग ॥ पूर्वज उध्दरती सांग ॥ पंढरपूर देखिलिया ॥धृ०॥
निराभिरावरा पडतां दृष्टी ॥ स्नान करितां शुध्द सृष्टि ॥ अंती तो वैकुंठ प्राप्ती ॥ ऐसें परमेष्ठि बोलिला ॥२॥
तेथे एक शीत दिधल्या अन्न ॥ कोटी कुळाचे होय उद्भरण ॥ कोटि याग केलें पूर्ण ॥ ऐसे महिमान ये तीर्थीचें ॥३॥
नामा ह्मणे धन्य जन्म ॥ जे धरिती पंढरीचा नेम ॥ तया अंती पुरुषोत्तम ॥ जीवें भावें न विसंबे ॥४॥ ॥धृ०॥

अभंग - ५
श्रीनामदेव महाराज वाक्य--
देव गुज सांगे पंढरीसी यारे ॥ प्रेमेचित्ती घ्यारे नाम माझे ॥१॥
काया वाचा मन दृढ धरा जीवी ॥ सर्व मी चालवी भार त्यांचा ॥२॥
भवसिंधु तारीन घ्यारे माझी भाक ॥ साक्ष पुंडलीक करुनी बोलो ॥३॥
लटकें जरी असे नामयासी पुसा ॥ आहे त्या भरंवसा नामी माझ्या ॥४॥ ॥धृ०॥

अभंग - ६
श्रीनामदेव महाराज वाक्य--
ऐसें तीर्थ कोणी दाखवा सुलभ ॥ जेणे समारंभ हरिकथेचा ॥१॥
तें एक पंढरी विख्यात त्रिभुवनी ॥ सकळां शिरोमणी चंद्रभागा ॥२॥
ऐसें तीर्थ कोणी दाखवा सुखरुप । जेथें त्रिविधताप हारपती ॥३॥
ऐसें तीर्थ कोणी दाखवा सुंदर ॥ गरुड टक्केभार विराजती ॥४॥
ऐसें तीर्थ कोणी दाखवा निर्मळ ॥ जेथें नासे मळ दुष्टबुध्दि ॥५॥
नामा ह्मणे संतजनाचें माहेर ॥ गाता मनोहर गोड वाटे ॥६॥ ॥धृ०॥

अभंग - ७
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
संसार आलिया जारे पंढरपुरा ॥ पांडुरंग सोयरा पहा आधीं ॥१॥
पुरती मनोरथ इच्छिले ते साचें ॥ अनंता जन्माचे दोष जाती ॥२॥
करितात स्नान भीमारथी तटी ॥ पुंडलिक दृष्टि लक्षुनिया ॥३॥
वेणुनाद गया पिंडदान फळ ॥ गोपाळपुर संकल देखिलीया ॥४॥
एका जनार्दनी सारांचें ते सार ॥ पंढरी माहेत सकळ जीवां ॥५॥ ॥धृ०॥

अभंग - ८
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
उत्तम स्थळ पंढरी देखा ॥ उभा सखा विठठल ॥१॥
एकदा जारे तये ठाई ॥ प्रेमा उणें मग काई ॥२॥
भाग्य जोडेल सर्व हातां ॥ त्रैलोकी सत्ता होईल ॥३॥
मोक्ष मुक्ति तुह्मांपुढे ॥ दास्य घडे तयासी ॥४॥
एका जनार्दनीं त्याचे भेटी ॥ सुखसंतोषा पडेल मिठी ॥५॥ ॥धृ०॥

अभंग - ९
श्रीएकनाथ महाराज वाक्य--
प्रयागादि क्षेत्रें आहेत कल्पकोडी ॥ तया आहे खोडी एक एक ॥१॥
मुंडन ती काय निराहार राहणें ॥ येथें न मुंडणें काया कांही ॥२॥
ह्मणोनि सर्व तीर्थामाजी उत्तम ठाव ॥ एका जनार्दनी जीव ठसाला ॥३॥ ॥धृ०॥

अभंग - १०
श्री तुकाराम महाराज वाक्य--
पंढरीसी जा रे आलेनी संसारा ॥ दीनाचा सोयरा पांडुरंग ॥१॥
वाट पाहे उभा भेटीची आवडी ॥ कृपाळू तांतडी उतावेळ ॥२॥
मागलि परिहार पुढें नाहीं सीण ॥ जाळिया दर्शन एक वेळा ॥३॥
तुका ह्मणे नेदी आणिकाचे हाती ॥ बैसला तो चित्ती निवडेना ॥४॥ ॥धृ०॥

अभंग - ११
श्री तुकाराम महाराज वाक्य--
करा करा लागोपाठ ॥ धरा पंढरीची वाट ॥ जंव नाही चपटे ॥ घात पडिला काळाचा ॥१॥
दुजा ऐसा नाहीं कोणी ॥ जो या काढी भयातूनि ॥ करा ह्मणोनि ॥ हा विचार ठायींचा ॥२॥
होती गात्रें बेंबळी ॥ दिअस अस्तमाना काळी ॥ हातपाय टाळीं ॥ जो मोकळीं आहेती ॥३॥
कां रे घेतलासी सोसे ॥ तुज वाटत हे कैसे ॥ तुका ह्मणे ऐसे पुढे कै लाहासी ॥४॥ ॥धृ०॥

अभंग - १२
श्री तुकाराम महाराज वाक्य--
जारें तुह्मी पंढरपुरा । तो सोयरा दीनाचा ॥१॥
गुण दोष नाणी मना । करी आपणां सारिखें ॥२॥
उभारोनि उभाकर ॥ भवपार उतराया ॥३॥
तुका ह्मणे तांतड मोठी ॥ झाली भेटी उदंड ॥४॥ ॥धृ०॥

अभंग - १३
श्री तुकाराम महाराज वाक्य--
अवघींच तीर्थे घडली एकवेळा ॥ चंद्रभागा डोळां देखिलिया ॥३॥
अवघीं पापें गेली दिगंतरी ॥ वैकुंठ पंढरी देखिलिया ॥२॥
अवघिया संतएकवेळ भेटी ॥ पुंडलिक दृष्टि देखिलिया ॥३॥
तुका ह्मणे जन्मा आलाचे सार्थक ॥ विठठलचि एक देखिलिया ॥४॥
श्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥

आरत्या ---
१ झाले समाधान । तुमचे देखि०
२ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी०  
३ प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ०
४ आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥
भजन ---
घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥
अभंग नाचाचे ----मागणे हे एक तुजप्रती ।
भजन----ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम
प्रसाद ----पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० ॥
शेजाआरती ---१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार
२. चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥
पुंडलीक वरदे हरि विठठल श्रीज्ञानदेव तुकाराम  

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-12-06T21:59:08.8700000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

zoogonidangium

  • चरबीजुककोश 
  • चर बीजुके निर्माण करणारा अवयव, उदा. काही शैवले. 
RANDOM WORD

Did you know?

aatmyathyatmya meaning
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.