मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ज्ञानोदय भजनी मालिका| मालिका ५ पंचमी ज्ञानोदय भजनी मालिका परिचय अनुक्रमणिका मालिका १ प्रतिपदा मालिका २ द्वितिया मालिका ३ तृतीया मालिका ४ चतुर्थी मालिका ५ पंचमी मालिका ६ षष्टी मालिका ७ सप्तमी मालिका ८ अष्टमी मालिका ९ नवमी मालिका १० दशमी मालिका ११ एकादशी मालिका १२ द्वादशी मालिका १३ त्रयोदशी मालिका १४ चतुर्दशी मालिका १५ पौर्णिमा आरती काल्याचे अभंग कीर्तन महात्म्य पंढरी महात्म्य ज्ञान महात्म्य विश्वव्रह्म आरती आणि विश्वब्रह्मकृत श्लोक सप्तक मालिका ५ पंचमी श्री गणपती महाराज केरूरकर ह्यांचे लिखाण म्हणजे कस्तुरीचा वास शपथपूर्वक सांगणे. Tags : bhajandnyanodaymarathiज्ञानोदयभजनमराठी देहाचे स्थानमान Translation - भाषांतर ॥ जय जय राम कृष्ण हरि । जय जय राम कृष्ण हरि ॥(॥ रुप पाहातां लोचनी॥ ) आणि (॥ राहोआतां हेचि ध्यान ॥)अभंग -१श्री एकनाथ महाराज वाक्य--मजुर राउताचें घृत नेतां । तो तुरंगी चढे मनोरथा ॥१॥सबळ बारुचे उडडाण । ह्मणोनि उडो जाता आपण ॥२॥बळे उडाला माझा घोडा । परी स्मरण नाही दगडा ॥३॥उडी सरसी घागर पडे । एका जनार्दनी पाहुनी रडे ॥४॥ ॥धृ०॥ज!ज्ज०अ०७ -- येर्हवी कोष कीटाकाचिया परी तो आपण या आपण वैरी । जो आत्मबुध्दि शरीरी ॥ चारुस्थळीं ॥७२॥अभंग -२श्री एकनाथ महाराज वाक्य--डोळा फोडोनि काजळ ल्याला । नाक कापुन शिमगा खेळला ॥१॥वेंचिता धन लक्ष कोटी ॥ आयुष्य क्षणाचि नोहे भेटी ॥२॥मिथ्या बागुलाचे भयो ॥ बाळी सत्य मानिती पाहो ॥३॥ऐसें मिथ्या नको मनीं ॥ एका शरण जनार्दनी ॥४॥॥धृ०॥ज्ञा०अ०९ -- ना, तरी निर्दैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया अहाति सहस्त्रवरी । परि तेथ बैसोनि उपवासू करी ॥ कां दरिद्रेचियो तैसा ह्रदयांमध्ये मी रामु । असतां सर्व सुखाचा आरासु ॥ की भ्रांतीसी कासू । विषयांवरी ॥६०॥बहु मृगजळ देखोनि डोळ्दा । थुंकिजे अमृताचा गिळतां गळाला । तोडिला परिसु बांधिला गळा शुक्ति कां लाभे ॥६१॥ए०भा०अ०१२ -- उध्दवा बागुलाचे भय खोटे । परि बालकासी सत्य वाटे । तेवी मिथ्या संसार कचाटे । जीवी प्रगटे बद्धता ॥१३६॥ज्ञा०अ०९ -- यालागी दुष्कृती जर्ही जाहला । तरी अनुतापतीर्थी न्हाला । न्हाउनि मज आंत आला । सर्व भावें ॥४२०॥अभंग -३श्री ज्ञानदेव महाराज वाक्य--उपजोनि संसारीं आपुला आप्ण वैरी । मी माझे ॥ शरीरी होऊनि ठेले । यादेहप्ते ह्मणे मी पुत्रदारा धन माझे परि काळाचे हे खाजें ऐसे नेणतु गेला ॥१॥काम क्रोध मत्सराचे निगुणे ॥ बांधला आपण नेणें भ्रमितु जैसा ॥ मिथ्या मोहफांसा शुक नळिके जैसा मुक्त परि अपेसा पळो नेणे ॥धृ०॥जळचर आमीप गिळी जैसा की लागलासे गळीं ॥ आप आपणा पै तळमळी लुटिका नाही ॥ तैसें आरंभी विषयसुख गोडवाटे इंद्रिया फळपाकी पापी या दु:ख्ह भोगी ॥२॥राखोंडी फुंकितां दीप नलगे जया परी । तैसा शुध्द शुध्द ब्रह्म कुमारी ज्ञान नपवे व्रत तप दान वेचिले पोटा दंभाचा खटपटा सिणतु गेला ॥३॥मृगजळाची नदी दुरुनि देखोनि ॥ धांवेपरी गंगोदक नपवे तान्हेला जैसा ॥ तैसा विषय सुख नव्हेचि हित दु:ख भोगितो बहुत ॥ परि सावधना नव्हे ॥४॥परतोनि न पाहे धांवतो सैरा ॥ करितो येरझारा संसारीच्या ॥ ज्ञानदेव ह्मणी बहुता जन्माचा अभ्यासु ॥ तरीच होय सौरसु परब्रह्मीं ॥५॥ ॥धृ०॥ए०भा०अ०२८ -- केवळ जो निबीडा भ्रम ॥ संसार हें त्यांचे नाम ॥ येर्हवीं निखिल परब्रह्म ॥ तेथ जन्मकर्म असेना ॥६६॥ए०भा०अ०२० -- ऐशी झालीया निजात्म प्राप्ती । सहजेचि राहे वृत्ति ॥ निवृत्तीसी होय निवृत्ति ॥ संसाराची शांति स्वयें होये ॥१॥ऐसें नरदेहा येऊनि देख ॥ पुरुष पावले परम सुख ॥ हें न साधिती जे मूर्ख त्यांसि देवो देख निंदित ॥१६५॥चौर्यांशी लक्ष जीव योनि त्यांत मनुष्य देहावांचूनि ॥ अधिकारी ब्रह्मज्ञानी ॥ आन कोणी असेना ॥१६६॥जेणे देहें होय माझी प्राप्ती ॥ त्याला मी आद्य देहो यातें ह्मणती याची दुर्लभ गा अवप्ती भाग्ये पावती नरदेहा ॥१६७॥अभंग -४श्री तुकाराम महाराज वाक्य--गेले पळाले दिवस रोज काय म्हणतोसि माझें माझें ॥१॥सळे धरोनि बैसला काळ फांको नेदी घटिक पळ ॥२॥कांरे अद्यापि न कळे ॥ केश फिरले कान डोळे ॥३॥हित कळोनि असतां हाती ॥ तोंड पाडूनि घेती माती ॥४॥तुज ठाऊके मी जाणार । पाया शोधोनि बांधिसी घर ॥५॥तुका ह्मणे वेगे ॥ पंढरीराया शरण रिघे ज्ञा०अ०९ -- आणि आचार पाहतां सुभटा< । तो दुष्कृत्याचा करि सेलवांटा ॥ वरी जीवित वेचिले चोहटा ॥ भक्तीचिया की ॥४१६॥अभंग -५श्री तुकाराम महाराज वाक्य--किती या काळाचा सोसावा वळसा ॥ लागला सरिसा पाठोवाटी ॥१॥लक्ष चौर्यांशीची करा सोडवण ॥ तिघाया शरण पांडुरंगा ॥२॥उपजल्या पिंडा मरण संगाते ॥ मरतें उपजतें सवें चित्ते ॥३॥तुका ह्मणे माळ गुंफली राहाटी ॥ गाडग्याची सुटी फुटलिया ॥४॥॥धृ०॥ज्ञा०अ०२ -- उपजे ते नाशे ॥ नाशले पुनरपि दिसे ॥ हें घटिका यंत्र तैसें ॥ परि भ्रमें गा ॥१५॥अभंग -६श्री नामदेव महाराज वाक्य--भुषक हव्यासें चालूनी भूमीतें मांजर तयातें टपतसे ॥ तैसा तुज काळ टपे वेळो वेळां वेगीं त्य गोपाळा भजावें बापा ॥२॥तैसा तुज ॥धृ०॥भानूचेनि माप आयुष्य वो सरे अवचितां कांरे डोळां झांकी ॥३॥नामाह्मणे अरे निश्चिती हे मूढा । हरि नाम दृढा सेविसीना ॥४॥धृ०॥ए०भा०अ०९ -- दैह जै पासुनी जाहला । तै पासुनि मृत्यु लागला । जेवी सापें बेडुक धरिला ॥ गिळूं लागला लव निमिषे ॥३३६॥साप बेडुकाते गिळी ॥ बेडुक मक्षीका कवळी ॥ तैसी मृत्युमुखी पडली विषय भुली झोंबती ॥३३७॥ अभंग -७श्री नामदेव महाराज वाक्य--शेवटली पाळी तेव्हां मनुष्यजन्म चुकलीया वर्म फेरा पडे ॥१॥हेंचि जन्मीं ओळखी करा आत्माराम ॥ संसार सुगम भोगू नका ॥२॥संसारी असावे असोनि नसावें ॥ कीर्तन करावे वेळो वेळां ॥३॥नाम ह्मणे विठोभक्ताचिया द्वारी ॥ घेऊनिया करी सुदर्शन ॥४॥॥धृ०॥ए०भा०अ०२ -- सकळ देहामाजी पाहा हो अति दुर्लभ मनुष्यदेहो त्याचिया प्राप्तीचा संभवो ॥ तो अभिप्रायो अतिदुर्गम ॥२१४॥तरावया भोळे भाळी जन ॥ मुख्य चित्तशुध्दीचे कारण ॥ जन्म कर्म हरिचे गुण ॥ करावे श्रवण अत्यादरे ॥५१६॥अभंग -८श्री तुकाराम महाराज वाक्य--जिव्हा जाणे फिके मधुर कीं क्षार । येर मास पर हाता न कळी ॥१॥देखवें नेत्री बोलावें मुखें ॥ चित्ता सुख दु:खे कळों येती ॥२॥परीमळा घ्राण ऐकती श्रवण । एकाचे कारण एका नय ॥३॥एक देहीभिन्न दावियेल्या कळा ॥ नाचवीं पुतळा सुत्रधारी ॥४॥तुका ह्मणे ऐसी जयाची सत्ता ॥ कां तया अनंता विसरलती ॥५॥॥धृ०॥ए०भा०अ०९ -- येथ आळसु जेणे केला । तो सर्वस्वें नागवला । थीता परमार्थ हातीचा गेला ॥ अवती पडला भवचक्री ॥३३८॥ऐसें जाणोनि यदुराया । देहाचिया लवलाह्या ॥ परमार्थ साधावया ॥ ब्रह्मो पाया उद्यत व्हावें ॥३३९॥अभंग -९श्री एकनाथ महाराज वाक्य--अभाग्य न भजती भगवती ॥ त्या पृथ्वी असे जडत्व देती ॥ जळे दीधली त्या अधोगती ॥ तेजे दिधली त्या संताप वृत्ती ॥१॥ऐसे कैसे नि भेटे भगवतु ॥ नरदेही मुकले नीज स्वार्थु ॥ जन्ममरणाचे भोगिती आवर्तु ॥ त्यासी विन्मुख होय ह्र्दयस्तु ॥धृ०॥वायुनें दिधले त्या चंचलत्वे ॥ नभे दिधले भाव शून्यत्वे ॥ महत्वें हारिले निजसत्वें ॥ माय दिधले त्या ममत्वे ॥३॥सभोग भावे भगवंती ॥ त्यासी पृथ्वी देतसे निज शांति । जळे दिधली मधुर रस वृत्ती ॥ तेजे दिधली निज तेज प्रभादिप्ती ॥४॥ऐसा सहजे प्रसन्न होय देवो ॥ जेणी सुताचा पालटे देहेभावो ॥ नीजी निजाचा वाढे निर्वाहो । जनी वि जनी अखंड ब्रह्म भावो ॥५॥वायु उपर नदे निश्वेलत्वे ॥ नभे दिधले त्या अलिप्तत्वे । महनत्वे दिधले शोधितसत्वे ॥ माये दिधले त्या सद्विद्या परम तत्वे ॥६॥एका जनार्दनी नीजभक्ती ते अलाभ्य लाभू होय प्रापी । भुते महाभुते प्रसन्न होती तेणें न भंगे ब्रह्मस्थिति ॥७॥ए०भा०अ०२ -- जीवनी प्रवेशे । जग जीवन याकारणे अवरण तोची जाण । न शेषता उरे जीवन । हे लाघव पूर्ण हरिचे ॥९१॥तेजाचे ठायी होऊनि रुप ॥ प्रवेशिला हारी सद्रुप ॥ यालागी नयनी तेज आमुप ॥ जठरी दैदीप्यें जठराग्नी जाहला ॥९२॥रुप लवलाही हरि प्रवेशे तेजाच्या ठायी ॥ ते आवरण वायु माजी पाही । न मावळ कांही यालागी राया ॥९३॥वायु माजी स्पर्शे योगे ॥ प्रवेशु कीजे श्री रंगे ॥ यालागी प्राण प्रयोगे ॥ वर्तची अंगे अनेक जीव ॥९४॥वायुच्या ठायी ह्र्षीकेश ॥ स्पर्शे रुपे करी प्रवेश ॥ यालागी वायुचा ग्रास । सर्वथा आकाश करु न शके ॥९५॥शुध्द गुणे हर्षकेश ॥ आकाशी करी प्रवेश ॥ यालागी भुतासी आवकाश सावकाश वर्तवावया ॥९६॥शुध गुणे गगनी ॥ प्रवेशला चक्रपाणी ॥ यालागि ते निज करणी । लीन होऊनी जाऊन न शके ॥९७॥महाभूती निरंतर ॥ स्वाभाविक नित्य वैर ॥ यरयराते ग्रासावया थोर ॥ अती तत्पर सर्वदा ॥९८॥जळ वीरयु पाहे पृथ्वी ते ॥ तेज शोषू पाहे जळाते वायु प्रांशू पाहे तेजात ॥ आकाश वायु ते गीळु पाहे ॥९९॥तेथें प्रवेशोनि श्रीधर । त्याते करुनीया निरवैर ॥ तेचि येरा माजी थेर ॥ उल्लासें नांदवी ॥१००॥एवं पंच भुते साकारता ॥ आकारली भूता करता तेथें जीवरुपें वर्तता ॥ जाहला पै तत्वता प्रकृती संयोगे ॥१०१॥यासी ब्रह्मांडी पुरुषें हे नांव पीडी त्याते ह्मणती जीव ॥ हा मायेचा निज स्वभाव ॥ प्रतीबिंबला देव जीव शिवरुपे ॥१०२॥शिव जे योग माया विख्यांती जिवीतीते अविद्या ह्मणती । हेची मायेची मुख्येत्वें भ्रांती ॥ स्वप्नस्थिति संसारु ॥१०३॥ईश्वराचे ह्मणती दीर्घ स्वप्न ॥ तो हा मायावी संसार संपूर्ण । निद्रेमाजी दिसे जे भान ते जिवाचे स्वप्न अविद्या योगे ॥१०४॥येथे जागा जाहाल्या मीथ्ये स्वप्न ॥ बोधे जाहलीया मीथ्ये भवभान । हे अवघे मायेचे विदान ॥ राया तूं जाण निश्चित ॥१०५॥अभंग -१०श्री एकनाथ महाराज वाक्य--गत ते आयुष्य गत तें धन । गत दृश्यमान पदार्थ तो ॥१॥गत तें अंबर गत तो पवन । गत तें हवन गत होय ॥२॥एका जनार्दनी अगत तें नाम । ह्मणोनि विश्राम योगीयांसी ॥३॥ ॥धृ०॥ए०भा०अ०२२ -- गंधर्व नगरीं प्रचंड ॥ माडया सोपे उदंड ॥ क्षणा मारी विरस चड ॥ वात वितंड करी निर्वाळ ॥६२७॥तेवी संसार हा काल्पनिक तेथील सुख आणि दु:ख । मिथ्या केवळ मायिक ॥ जाण निष्ठक निजभक्ता ॥६२८॥अभंग -११श्री एकनाथ महाराज वाक्य--जें जें दिसें तें तें नासे ॥ अवघे वोसे जायाचे ॥१॥नासिवंत सर्व काया । भेणे उपाया करा कांही ॥२॥पदार्थ मात्र जातु असें कांही नसे आन दुजे ॥३॥एका जनार्दनी सर्व वाव । धरा भाव विठठली ॥४॥ज्ञा०अ०७ -- उदयास्ताचे लोंढें पाडीईत जन्ममरणाचे चोढे ॥ जेथ पांचभौतिक बुडबुडे ॥ होती जाती ॥७६॥येथें एकचि लीला तरले जे सर्वभाव मजभजले ॥ तयां ऐलीच थडी सरलें ॥ मायाजळ ॥९७॥ अभंग -१२श्री नामदेव महाराज वाक्य--साठी घडी माजी । एक वेची देव काजी ॥१॥आराणुक सारुनि काजी सर्वभावे केशव पूजी ॥२॥हेंचि भक्तीचें लक्षण ॥ संतोषला नारायण ॥३॥कोटीकुळे पावन तुझीं । नामा ह्मणी भाक माझी ॥४॥ ॥धृ०॥ए०भा०अ०१ -- कैसे कर्म समगळू ॥ कानी पडतांचि आळूमाळु नासोनियां कर्मळु ॥ जाती तत्काळु श्रवणादरें ॥३०२॥श्रवणें उपजे सद्भावो । सद्भावें प्रगटे, देवो तेणें निर्दळे अहंभवो । ऐसी, उदार पहाहो हरिकीर्ति ॥३०३॥अभंग -१३श्री तुकाराम महाराज वाक्य--संतांचिया पायी हा माझा विश्वास ॥ सर्वभावें दास झालों त्यांचा ॥१॥तेचि माझें हित करिती सकळ ॥ जेणें हा गोपाळ कृपा करी ॥२॥भागलिया मज वाहात्तील कडे त्याचियानें जोडे सर्व सुख ॥३॥तुका ह्मणे शेष घेईन आवडी वचन न मोडी बोलिलें ते ॥४॥ ॥धृ०॥भजन श्रीज्ञानदेवतुकाराम । श्रीज्ञानदेवतुकाराम ॥धृ०॥आरत्या ---१ झाले समाधान । तुमचे देखि० २ करुन आरती । चक्र पाणी ओवाळी० ३ प्रेम सप्रेम आरती ॥ गोविंदासि ओ० ४आरती ज्ञानराज । महाकै० ॥धृ०॥भजन ---घालिन लोटांगण । वंदीन चरण । श्रीविठठल रखुमाई । विठोबा रखुमाई ॥धृ०॥अभंग नाटाचे--मागणे हे एक तुजप्रती ।भजन--ज्ञानदेव तुकाराम । ज्ञानदेव तुकाराम प्रसाद--पाहे प्रसादाची वाट । पावला प्रसाद आतां वि० ॥शेजाआरती --१ शब्दाचिया रत्ने करुन अलंकार २ चंदनाची ओवरी । आड केले देवद्वार ॥मागील मालिकेप्रमाणे म्हणावेपुंडलीक वरदे हरि विठठल श्रीज्ञानदेव तुकाराम N/A References : N/A Last Updated : December 06, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP