मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ६ वा| अध्याय १९ वा स्कंध ६ वा षष्ठ स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा स्कंध ६ वा - अध्याय १९ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ६ वा - अध्याय १९ वा Translation - भाषांतर ८९राव म्हणे मुने, कथा तें पुत्रद - । पुंसवनव्रत सविधि मज ॥१॥निवेदिती मुनि मार्गशिर्ष शुद्ध । आरंभावें व्रत पतिपदेसी ॥२॥निजपतिआज्ञा घेऊनि मरुतांचें । जन्माख्यान साचें श्रवण होवो ॥३॥विप्रद्वारा विधि ऐकावा व्रताचा । दंतधावनाचा विधि करा ॥४॥पुढती सुस्नात होऊनियां शुभ्र - । वस्त्र अलंकार परिधानूनि ॥५॥लक्ष्मीसवें व्हावी नारायणपूजा । प्रेमें अधोक्षजा प्रार्थूनियां ॥६॥वासुदेव म्हणे प्रार्थना ते ऐसी । निवेदिली ग्रंथीं श्रवण करा ॥७॥९०पूर्णकामा ईशा, सदा तूं निरपेक्ष । अष्टसिद्धिनाथ लक्ष्मीपती ॥१॥नमस्कार माझा असो हे ईश्वरा । देवा, सर्वाधारा जगत्पते ॥२॥कृपा, श्री, ऐश्वर्य, महत्त्व तैं वीर्य । सत्य तुझे सर्व संकल्पही ॥३॥यास्तव सर्वांचा प्रभु तूंचि एक । घेईं हे अनंत नमस्कार ॥४॥विष्णुपत्नी महामाये परमेश्वरी । कृपा मजवरी करीं माते ॥५॥महाभागे होईं प्रसन्न तूं मज । अनंत हे तुज नमस्कार ॥६॥वासुदेव म्हणे यापरी प्रार्थना । लक्ष्मीनारायणा तुष्ट करी ॥७॥९१‘नमो भगवते महा पुरुषायेति’ । मंत्रें या सविधि पूजा व्हावी ॥१॥द्वादश आहुति नैवेद्यशेषाच्या । त्याचि मंत्रें साच्या समर्पाव्या ॥२॥लक्ष्मी नारायण भोगोद्रम स्थान । जाणूनि, सप्रेम दशधा जप - ॥३॥करुनि, स्तवन करावें पुढती । व्यापिलें विश्वासी उभयांनीं ॥४॥मायबाप तुम्हीं सकळ विश्वाचे । यज्ञक्रिया ऐसें तुमचें रुप ॥५॥यज्ञफलभोक्ता तूंचि नारायणा । व्यक्तता त्रिगुणा तेचि माया ॥६॥व्यंजक तियेचा भूतात्माही तूंचि । शरीरेंद्रियादि लक्ष्मीरुप ॥७॥त्रैलोक्यकामनापूरक तुम्हींचि । अर्पावे मजसी चिरभोग ॥८॥वासुदेव म्हणे पुढती आचमन । अर्पूनियां पूर्ण व्हावी पूजा ॥९॥९२हुंगूनियां यज्ञशेष । तेणें पूजावा परेश ॥१॥स्तवूनियां ईश्वरासी । तोषवावा निजपति ॥२॥प्रिय पदार्थ अर्पूनि । तोचि ईश्वर मानूनि ॥३॥पतीनेंही पत्नीप्रति । साह्य व्हावें या सुव्रतीं ॥४॥पत्नी असतां असमर्थ । पतीनेंही घ्यावें व्रत ॥५॥विप्र सुवासिनी प्रेमें । नित्य पूजावीं नियमें ॥६॥विसर्जूनियां देवीतें । स्वीकारावें प्रसादातें ॥७॥चित्तशुद्धि हेतुपूर्ति । प्रसादें या घ्यावें चित्तीं ॥८॥वासुदेव म्हणे व्रत । संवत्सर ऐसें एक ॥९॥९३कार्तिकी अमेतें व्हावें उपोषित । पूजावा भगवंत अन्य दिनीं ॥१॥दुग्धसिद्ध चरु, सुघृतसंयुक्त । आहुति द्वादश द्याव्या त्याच्या ॥२॥वस्त्रालंकारांनीं तोषवावे विप्र । भावें नमस्कार करावा त्यां ॥३॥घेऊनियां आशीर्वाद भोजनासी । प्रथम आचार्यांसी बैसवावें ॥४॥आप्तैष्टांसवें पुढती आपण । करावें भोजन मौनव्रतें ॥५॥वासुदेव म्हणे चरु अवशिष्ट । अर्पावा पत्नीस कथिती मुनि ॥६॥९४संतति संपत्ति लाभे त्या प्रसादें । इच्छित नराचे पुरती हेतु ॥१॥गृह, धन, कीर्ति, सौभाग्यसंपत्ति । पति दीर्घायुषी लाभे स्त्रीतें ॥२॥सद्गुणसंपन्न पति कुमारीसी । लाभे या व्रतेंसी निश्चयानें ॥३॥गतधवा पापमुक्त ते होऊन । सद्गति पावून धन्य होई ॥४॥तात्पर्य, या व्रतें कामना सकळ । पुरवी घननीळ कृपालेशें ॥५॥मरुतांची कथा, दितीचें हें व्रत । ऐकतां समस्त पुरती काम ॥६॥वासुदेव म्हणे षष्ठस्कंधगान । जाहलें संपूर्ण अर्पूं ईशा ॥७॥इतिश्रीवासुदेवकृत अभंग-भागवताचा स्कंध ६ वा समाप्त. ॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥ N/A References : N/A Last Updated : November 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP