मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ६ वा| अध्याय २ रा स्कंध ६ वा षष्ठ स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा स्कंध ६ वा - अध्याय २ रा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ६ वा - अध्याय २ रा Translation - भाषांतर ९ऐकूनि न्यायज्ञ म्हणती विष्णुदूत । नि:पाप हा दंड्य केंवी झाला ॥१॥पिता, गुरु, साधु, नि:पक्षपातीही । जरी हा यमचि ऐसें करी ॥२॥शरण कोणासी जावें तरी सांगा । धन्याच्याचि मार्गा क्रमिती दूत ॥३॥अनुकरण ज्या घडावें थोरांचें । अंधार हा तेथें आश्चर्यचि ॥४॥अनंत जन्मींच्या पातकांची होळी । होऊनियां गेली नामोच्चारें ॥५॥अपारचि असे नामाचा महिमा । दया नारायणा नामें येई ॥६॥नामस्मरण हें सर्व प्रायश्चित्त । वासना समस्त जळती नामें ॥७॥‘चतुराक्षरी’ हा जपलासे मंत्र । नेऊं नका यास यमलोकीं ॥८॥वासुदेव म्हणे कथिती विष्णुदूत । सर्वप्रायश्चित्त नामचि हें ॥९॥१०भलत्याही मिषें प्राशितां अमृत । येई अमरत्व जैशापरी ॥१॥कोण्याही निमित्तें तेंवी ईशनाम । मुखीं घेतां जन पापमुक्त ॥२॥दूतहो, संशय जरी अंतरांत । पुसूनि धन्यास यावें तरी ॥३॥धर्मरहस्य हें जाणे यमधर्म । दूतहो, जाऊन पुसा तया ॥४॥वासुदेव म्हणे महिमा नामाचा । ऐकूनि यमलोका गेले दूत ॥५॥११अजामिळ तदा होई पाशमुक्त । पाहूनि मुदित विष्णुदूतां ॥१॥वंदितां तयाचा आशय जाणून । दूत अंतर्धान पावताती ॥२॥अजामिळासी तो स्मरला संवाद । म्हणे भक्तिमार्ग श्रेष्ठ बहु ॥३॥स्वकर्माचा तया होई पश्चात्ताप । निर्भत्सीं स्वयेंच आपणासी ॥४॥म्हणे लंपट मी जाहलो शूद्रीसी । ब्राह्मण्य लयासी गेलें माझें ॥५॥धिक्कारचि असो भज कुलांगारा । अव्हेर मीं केला साध्वी स्त्रीचा ॥६॥कृतघ्न मी झालों माता-पितरांसी । प्राप्तचि मजसी नरकलोक ॥७॥न कळे ते कोठें गेले यमदूत । कोठें चतुर्भुज देवही ते ॥८॥वासुदेव म्हणे अजामिळाप्रति । भासलें स्वप्नचि दृश्य सारें ॥९॥१२म्हणे जाहलों मी धन्य । पूर्वपुण्यें हें दर्शन ॥१॥अंतीं नारायणस्मृति । झाली मज पातक्यासी ॥२॥पुढती संयमें वागून । ईशपदां मी चिंतीन ॥३॥जारिणीचें मी खेळणें । मुक्त होईन हरिनामें ॥४॥भक्तसमागम अल्प । होतां पावला विराग ॥५॥गंगाद्वारीं निघूनि गेला । तेथ आराधी प्रभूला ॥६॥वासुदेव म्हणे ऐका । अजामिळ मुक्त कैसा ॥७॥१३इंद्रियदमनें आंवरुनि मन । आत्मरममाण होई सदा ॥१॥ब्रह्मरुपीं लीन होतां विष्णुदूत । दिसते तयास फिरुनि तेचि ॥२॥वंदूनि तयांसी गंगेमाजी देह । टाकूनियां दिव्य देह घेई ॥३॥बैसूनि विमानीं गेला वैकुंठासी । ध्वजा हरिनामाची फडकावीत ॥४॥राया, ऐशापरी नामाचा प्रभाव । जाणूनियां भाव नामीं असो ॥५॥पुत्रमिषें नारायण नाम घेतां । पावला वैकुंठा अजामिळ ॥६॥ऐकूनि हे कथा स्मरेल ईश्वरा । मुक्ति तया नरा कां न लाभे ॥७॥वासुदेव म्हणे नारायणनाम । पातकदहन सहज करी ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 08, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP