मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ६ वा| अध्याय १७ वा स्कंध ६ वा षष्ठ स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा स्कंध ६ वा - अध्याय १७ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ६ वा - अध्याय १७ वा Translation - भाषांतर ७७राया परीक्षिता, विद्याधररुप । झालें होतें प्राप्त नृपाळासी ॥१॥वंदूनि शेषासी मेरुवरी जाई । लक्षावधि राही अब्दें तेथें ॥२॥एकदां कैलासीं गेला विमानांत । बैसूनि, जें प्राप्त विष्णुकृपें ॥३॥पाही तैं भवानी शिव वाम अंकीं । हस्त एक स्कंधीं होता तिच्या ॥४॥पाहूनि तें राव खदखदां हांसे । बोले सकलांतें उच्चस्वरें ॥५॥ज्ञाता म्हणवूनि निर्लज्ज हा ऐसा । सभेमाजी कैसा बसला तरी ॥६॥सामान्य जनही घेती निज अंकीं । आपुल्या कांतेसी एकांतांत ॥७॥ऐकूनि हांसले शिवही मोठयानें । कर्म अज्ञानाचें जाणूनियां ॥८॥तेणेंचि सभ्यही बोलले न कांहीं । परी क्रोध येई सतीलागीं ॥९॥वासुदेव म्हणे दुष्कर्माचें फळ । लाभे परस्पर दुर्जनांतें ॥१०॥७८सती म्हणे आम्हांसम निर्लज्जांसी । शिक्षा, करायासी नेमिलें या ॥१॥आजवरी कोणी शिवाप्रति दोष । दिधला नाहींच ब्रह्मादिकीं ॥२॥मूर्खचि ते काय शाहाणा हा एक । घेईल उन्मत्त दैत्यजन्म ॥३॥ऐकूनि तो शाप सोडूनि विमान । बोलला वचन चित्रकेतु ॥४॥माते, ईश्वरेच्छा जाणूनि हा शाप । स्वीकारिला अद्य आनंदानें ॥५॥कर्ता-करविता एक नारायण । कोणाप्रति कोण दु:खदाता ॥६॥दुरुत्तर जरी वाटतें । क्षमावें मजसी हेचि इच्छा ॥७॥वासुदेव म्हणे बोलूनियां ऐसें । निर्भय स्वमार्गे निघूनि गेला ॥८॥७९चित्रकेतुकर्मे सतीसी विस्मय । पाहूनियां शिव वदले तिज ॥१॥प्रिये, विष्णुसेवाव्रत जयांप्रति । शापानुग्रहांची चिंता न त्यां ॥२॥ज्ञानवैराग्यचि सामर्थ्य तयांचें । भेदभाव त्यांतें नसे कांहीं ॥३॥प्रिये, चित्रकेतु नारायणभक्त । भोगील सानंद कर्मफल ॥४॥विस्मय सतीचा गेला तें ऐकूनि । प्रति शापवाणी वदला नाहीं ॥५॥चित्रकेतु भक्त त्वष्टयाचा तो पुत्र । होई वृत्रासुर दैवयोगें ॥६॥दैत्यही असूनि भक्तो तो यास्तव । ऐकें हें चरित्र पुण्य तया ॥७॥वासुदेव म्हणे सद्गति तयासी । ऐकें हें प्रभातीं चरित्र त्या ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP