मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ६ वा| अध्याय ५ वा स्कंध ६ वा षष्ठ स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा स्कंध ६ वा - अध्याय ५ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ६ वा - अध्याय ५ वा Translation - भाषांतर २४दक्ष पांचजनीउदरीं अर्यश्व । जाहले सुपुत्र दशसहस्त्र ॥१॥प्रजोत्पादनाची दक्षाआज्ञा होतां । पश्चिम दिशेचा धरिती पंथ ॥२॥सिंधु नदी जेथें सागरासी भेटे । तीर्थी त्या तपातें प्रवर्तले ॥३॥मोक्षाधिकारी ते कर्ममार्गी रत । पाहूनि नारद दु:ख पावे ॥४॥वासुदेव म्हणे हर्यश्वा नारद । करी कूटबोध तोचि ऐका ॥५॥२५हर्यश्वहो, तुम्हीं मूढ केंवी झालां । विसरुनि गेलां भूमिनाश ॥१॥एकचि पुरुष वसे या राष्ट्रांत । बिळ एक तेथ तेंवी असे ॥२॥बाहेरी जाण्याचा मार्ग न तयासी । स्त्री एक बहुरुपी वसे तेथें ॥३॥जारिणीपतीही वसे एक तेथ । सरिताही उभयवाही एक ॥४॥पंचविंशतीचें विचित्र सदन । विचित्र कथन करी हंस ॥५॥नित्य भ्रमे ऐसें स्वतंत्रचि चक्र । निर्मिलें तयास क्षुर वज्रें ॥६॥जाणतां न कीम हें, पितृआज्ञा भाव । न कळूनि उपाय करितां भिन्न ॥७॥वासुदेव म्हणे नारदाची वाणी । हर्यश्व ऐकूनि घेती बोध ॥८॥२६लिंगशरीर ते भूमि । जीव तेणेंचि बंधनीं ॥१॥नाश तयाचा नेणतां । व्यर्थ मोक्षाच्या त्या वाटा ॥२॥स्वत:सिद्ध सर्वसाक्षी । तया पुरुष बोलती ॥३॥तया ईश्वराचें ज्ञान । न घडे तरी व्यर्थ श्रम ॥४॥फिरुनि येण्याचा न मार्ग । बिळ तेंचि ब्रह्मरुप ॥५॥बहुरुपें धरी बुद्धि । जीव तियेचा तो पति ॥६॥लंपट तो होतां दु:ख । भोगी गतिही अनेक ॥७॥उभयत्र प्रवाहिनी । नदी माया येई ध्यानीं ॥८॥निर्मूनियां ते सृष्टीसी । संहारही करी तेचि ॥९॥वासुदेव म्हणे बोध । यांचा न होतांचि कष्ट ॥१०॥२७पंचविंशति त्या तत्त्वांचा आधार । आत्माचि केवळ ज्ञेय एक ॥१॥शास्त्र तोचि हंस कथी दिव्य ज्ञान । कालचक्र क्षीण करी जगा ॥२॥संसारनिवृत्त व्हावें हेचि आज्ञा । न जाणतां कर्मा काय फल ॥३॥निवृत्तींत ऐसे रमले हर्यश्व । आनंदें नारद निघूनि गेले ॥४॥ऐकूनि तें वृत्त क्रुद्ध होई दक्ष । निर्मी शबलाश्व लक्षावधि ॥५॥तेही नारायणतीर्थीचि तपार्थ । जाऊनि ईशास प्रार्थिताती ॥६॥नमो नारायणा, पुराणपुरुषा । शुद्ध सत्त्वरुपा महाहंसा ॥७॥ऐसे संतानार्थ करितां जपास । नारद तयांस ज्ञान बोधी ॥८॥वासुदेव म्हणे यापरी नारद । बोधितां दक्षास क्रोध येई ॥९॥२८क्रोधावेशें दक्ष भेटे नारदासी । म्हणे वंचिलेंसी बालकांतें ॥१॥ऋणत्रयमुक्त न होती तयांसी । दीक्षा संन्यासासी व्यर्थ असे ॥२॥अनुभवावीण विषयवैराग्य । न घडेचि चांग न कळे तुज ॥३॥गृहस्थांसी वंशच्छेदनाचा मार्ग । दाऊनियां ढोंग माजविसी ॥४॥सोशिलें एकदां पुनरपि तेंचि । करिसी, शापासी घेईं आतां ॥५॥कोठेंही न थारा लाभेल तुजसी । कदा न वससी एका ठाईं ॥६॥ऐकूनि तथास्तु बोलले नारद । स्वीकारिला शाप आनंदानें ॥७॥वासुदेव म्हणे शुक सज्जनासी । म्हणती सहजचि सहिष्णुता ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 08, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP