मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ६ वा| अध्याय १० वा स्कंध ६ वा षष्ठ स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा स्कंध ६ वा - अध्याय १० वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ६ वा - अध्याय १० वा Translation - भाषांतर ५४विष्णुआज्ञेनें मुनींसी । देव मागती देहासी ॥१॥मुनि बोलती देवांना । कठिण मृत्यूच्या यातना ॥२॥जरी विष्णूही मागतां । लोभ न सुटे देहाचा ॥३॥देव बोलले मुनींसी । मुने, स्वार्थ न तुम्हांसी ॥४॥दयावंत उदारातें । अदेय न कांहीं वाटे ॥५॥ऐकूनियां देववाणी । मुनि बोलले तोषूनि ॥६॥दिला नकार प्रथम । हेतु ऐकावा सद्भर्म ॥७॥देह नश्वर हा जरी । लोककार्यी पडे तरी ॥८॥हर्ष होई न कोणातें । धर्मकीर्तिही ज्या मार्गे ॥९॥वासुदेव म्हणे ज्ञाता । न धरी देहाचा भरंवसा ॥१०॥५५अशाश्वत देहें शाश्वत धर्माची । जाणूनियां संधि मुनिश्रेष्ठ ॥१॥समाधि लावूनि कोंडी निज प्राण । ब्रह्मांडीं नेऊन स्थिर करी ॥२॥गळालें कवच देहाचें कदा तें । कळलें नाहीं तें पुण्य़वंता ॥३॥विश्वकर्म्यानें त्या घेऊनियां अस्थि । निर्मिलें वज्रासी कौशल्यानें ॥४॥घेऊनि तें इंद्र शोभे ऐरावतीं । नर्मदातीरासी युद्ध झालें ॥५॥त्रेतायुगारंभी जाहलें हें युद्ध । सकल देव-दैत्य लढती शौर्ये ॥६॥पराकाष्ठा करी वृत्र, सामर्थ्याची । पळूनियां जाती परी दैत्य ॥७॥वृत्र तदा दैत्यां बोलला स्फूर्तिनें । अमर देहातें समजूं नका ॥८॥योगाभ्यासें एक त्यागावा हा देह । अथवा रणांत पराक्रमें ॥९॥वासुदेव म्हणे वृत्राची हे उक्ति । मरुनीही कीर्ति संपादा ती ॥१०॥ N/A References : N/A Last Updated : November 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP