मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ६ वा| अध्याय १६ वा स्कंध ६ वा षष्ठ स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा स्कंध ६ वा - अध्याय १६ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ६ वा - अध्याय १६ वा Translation - भाषांतर ७१पुढती नारद पुत्रासी जिवंत । करुनि, नृपास दाखविती ॥१॥कथिती बाळासी भोगीं ऐश्वर्यातें । अवेळीं पित्यातें दुखवूं नको ॥२॥बाळ मुने, भ्रमतों मी नित्य । पिता नसे मज एकचि हा ॥३॥व्यर्थ मजसाठीं करिती हे शोक । कृतघ्न वंचक शत्रूचि मी ॥४॥जोंवरी आपुला तोंवरीच सत्ता । जेंवी द्रव्यादिकां व्यवहारीं ॥५॥तैसाचि प्रकार जाणावा जीवाचा । बहु माता पिता तयाप्रति ॥६॥मातापित्यालागीं ममत्व तयाचें । अजन्माचि असे परी जीव ॥७॥आपपर प्रिय अप्रिय न तया । दैन्य वा वैभवा मोल न त्या ॥८॥मातापितरांसी म्हणे मस्त्स्वरुप । चिंतूनियां खेद न धरा मनीं ॥९॥वासुदेव म्हणे बोलूनियां ऐसें । पुत्र त्या देहातें त्यजूनि गेला ॥१०॥७२बालकवचन ऐकूनियां राव । पावला विस्मय अंतरांत ॥१॥चिंतूनियां मनीं शोकहीन होई । और्ध्वदेहिकही सकळ करी ॥२॥हत्याकारकांसी होई पश्चात्ताप । पुशिती प्रायश्चित्त विप्रांप्रति ॥३॥यमुनातीरासी घेती प्रायश्चित्त । ज्ञानें हृष्टचित्त चित्रकेतु ॥४॥यमुनादिकांत करुनियां स्नान । मुनींसी शरण जाई प्रेमें ॥५॥अंगिरानारदस्तुतिद्वारा बोध । करिती नृपास हर्षभरें ॥६॥७३प्रभो, वासुदेव प्रद्युम्न अनिरुद्ध । संकर्षण एकमेव तूंचि ॥१॥विकार विहीन परमानंद मग्न । इंद्रियाधिष्ठान तूंचि देवा ॥२॥ओतप्रोत सर्व विश्वामाजी तूंचि । वासना जयासी जन्म तया ॥३॥नामरुपात्मक सर्व मायामय । अलिप्त तं देव सर्वांहूनि ॥४॥मर्यादित शक्ति देहादिकांप्रति । अशक्य तयांसी तव बोध ॥५॥मायानाशाविण संभवे न ज्ञान । जीवत्व तें जाण वासनेनें ॥६॥अवस्थासाक्षी तो असे ब्रह्मभावें । ज्ञानालागीं यावें शरण तुज ॥७॥वासुदेव म्हणे तया देवदेवा । नमस्कार घ्यावा म्हणती मुनि ॥८॥७४करुनियां ऐसा बोध । मुनि जाहले अदृश्य ॥१॥चित्रकेतु सप्तदिन । भावें करी अनुष्ठान ॥२॥होई विद्याधरपति । भेटे पुढती शेषासी ॥३॥होतां दर्शन शेषाचें । फुले सर्वांग रोमांचें ॥४॥नयनीं अश्रुपूर लोटे । स्तवन आरंभी शेषाचें ॥५॥वासुदेव संकर्षण । म्हणे तोचि नारायण ॥६॥७५संकर्षणा काय चमत्कार कथूं । अजिंक्य परी तूझं भक्ताधीन ॥१॥जिंकिलें जयांनी त्या तेही जित । लीन त्वद्रूपांत होऊनियां ॥२॥दास धनी एक होऊनियां जाती । आश्चर्य जगतीं करिसी हेंचि ॥३॥आपरमाणु ब्रह्मांडांत तूंचि । अनंत अनादि तूंचि एक ॥४॥रोमरोमीं तुझ्या ब्रह्मांडें बहुत । यास्तव अनंत नाम सार्थ ॥५॥पूर्णकामा सकामही तव सेवा । शनै: शनै: जीवा करी मुक्त ॥६॥दर्शनें कृतार्थ जाहलों मी अद्य । जाणसी तूं सर्व कथूं काय ॥७॥फणांवरी तुझ्या सिद्धार्थ हें जग । घेईं नमस्कार नम्र माझा ॥८॥वासुदेव म्हणे ऐसें हें स्तवन । ऐकूनि भाषण करी शेष ॥९॥७६शेष म्हणे राया, चित्रकेतो मीचि । निर्मिलें विश्वासी स्वसामर्थ्ये ॥१॥स्वप्नामाजी जीव पाही बहु दृश्यें । जाण जागृती हे त्याचिपरी ॥२॥आत्मा सर्वसाक्षी चिन्मय हें ज्ञान । जयासी तो धन्य जगीं होय ॥३॥परोक्षापरोक्ष ज्ञान हें द्विविध । मानवचि पात्र ज्ञानासी या ॥४॥संसारनिवृत्ति साधन एकचि । व्हावयासी प्राप्ति मद्रूपाची ॥५॥विवेकें संयम करुनियां ज्ञान । संपादूनि, धन्य व्हावें जगीं ॥६॥रायाप्रति ऐसा करुनि उपदेश । अंतर्धान शेष पावलासे ॥७॥वासुदेव म्हणे परीक्षितीप्रति । कथा निवेदिती शुक ऐसी ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP