स्कंध ६ वा - अध्याय १२ वा

सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य


५९
मरणासी सिद्ध होऊनियां वृत्र । जैं मधुकैटभ तैसा धांवे ॥१॥
शूलमुक्त कर छेदिला इंद्रानें । ताडिलें वृत्रानें अन्य करें ॥२॥
वज्र तदा खालीं पडलें इंद्राचें । खेद तैं देवांतें होई बहु ॥३॥
सलज्ज तैं इंद्र उचलीत वज्र । स्फूर्ति तदा वृत्र देई तया ॥४॥
खेदाची न वेळ म्हणे हे देवेंद्रा । घेऊनियां वज्रा शत्रु वधीं ॥५॥
जयापजयासी ईश्वर कारण । बाहुलींचि जाण सकळ जीव ॥६॥
समत्व राखूनि कर्तव्य करावें । द्यूतचि जाणावें युद्ध इंद्रा ॥७॥
जयापजयाचा भरंवसा मनीं । धरुं नये कोणी युद्धामाजी ॥८॥
वासुदेव म्हणे वचन वृत्राचें । ऐकूनि इंद्रातें नवल वाटे ॥९॥

६०
इंद्र अभिनंदूनि वृत्रा । उचली आनंदानें वज्रा ॥१॥
म्हणे उदार दानवा । धन्य चिंतीसी केशवा ॥२॥
असूनियां तूं असुर । करिसी साधूंचा आचार ॥३॥
परिघ फेंकिला तों वृत्रें । करहीन केला इंद्रें ॥४॥
छिन्नपक्ष पक्षी वृत्र । करी विशाल स्वमुख ॥५॥
ऐरावतासवें इंद्र । गिळिला, जाहलें नवल ॥६॥
कवचरक्षित इंद्रानें । उदर विदारिलें यत्नें ॥७॥
येऊनियां बाह्य भागीं । यत्नें कंठ त्याचा छेदी ॥८॥
संवत्सर एक वज्र । फिरवी मानेवरी इंद्र ॥९॥
अंतीं होई ग्रीवाभेद । पुष्पें वर्षिती विबुध ॥१०॥
वृत्रमुखांतील ज्योति । शिरे ईश्वरस्वरुपीं ॥११॥
वासुदेव म्हणे स्तुति । सकळ करिती इंद्राची ॥१२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP