मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ६ वा| अध्याय ३ रा स्कंध ६ वा षष्ठ स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा स्कंध ६ वा - अध्याय ३ रा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ६ वा - अध्याय ३ रा Translation - भाषांतर १४रावप्रश्नें मुनि यमदूतवृत्त । कथिती राजास तेंचि ऐका ॥१॥पुशिती यमासी कर्मफलदाते । देव कोणते तें निवेदावें ॥२॥निर्णय कर्मांचा बहुतांचे हाती । श्रेष्ठ तयांमाजी तरी कोण ॥३॥आपणचि श्रेष्ठ तरी अन्य कोणी । रोधिलें येऊनि आम्हांप्रति ॥४॥नारायणनाम उच्चारितां देव । येऊनि अभय देते झाले ॥५॥निवारुनि आम्हां धाडिलें या स्थानीं । संदेह फेडूनि वदले यावें ॥६॥वासुदेव म्हणे दूतांचें वचन । ऐकूनियां यम वदला तयां ॥७॥१५नारायणनाम उच्चारीत यम । म्हणे नारायण सकलाधार ॥१॥शास्ता मी केवळ जंगम जीवांचा । चालक ईशाचा दास नम्र ॥२॥तंतु वस्त्रामाजी तेंवी मी विश्वांत । स्वाधीन हें विश्व त्याच्या असे ॥३॥वेसणनिबद्ध पशूसम जीव । जाणती न देव ऋषीही त्या ॥४॥सकल पदार्थ अवलोकी नेत्र । परी पदार्थांस न दिसेचि तो ॥५॥तैसेंचि ईश्वरा ज्ञान सकलांचें । पाही न तयातें परी कोणी ॥६॥दूत त्याचे नित्य हिंडती सर्वत्र । दर्शनें कृतार्थ सकल त्यांच्या ॥७॥वासुदेव म्हणे विष्णुदूतभेटी । होईल तयांचीं हरती पापें ॥८॥१६ब्रह्मा, शिव, सनत्कुमार, नारद । कपिल, प्रल्हाद, जनक, मनु ॥१॥भीष्म, बलि, शुक, यम जो मी ऐसे । रहस्य धर्माचें जाणिताती ॥२॥देव, ऋषि, सिद्ध, असुर, मानव । चारण, गंधर्व, विद्याधर ॥३॥रहस्य धर्माचें जाणती न तेही । श्रेष्ठ धर्म पाहीं भागवत ॥४॥संजीवनी जयां ज्ञात न ते वैद्य । औषधें अनेक योजिताती ॥५॥तेंवी न नामाचें रहस्य जाणिती । मूढ ते कष्टती अन्य मार्गे ॥६॥दूतहो, यास्तव भक्तांसी शासन । करणें, मज ऐसें बळ ॥७॥संरक्षक त्यांचा असे भगवान । कदा त्यांचे प्राण हरुं नका ॥८॥वासुदेव म्हणे यम कथी, भक्तां । काळाचाही कदा धाक नसे ॥९॥१७पुत्रकलत्रादि विषयनिमग्न । पापी भक्तिहीन नरकोद्युक्त ॥१॥आणावे ते नर यमसदनासी । ईशपादांबुजीं नम्र न जे ॥२॥अपराध ऐसा घडला यास्तव । नमितां क्षमील दयाळु जो ॥३॥रायाप्रति शुक म्हणती भक्तीवीण । पापविनाशनमार्ग नसे ॥४॥भक्तीविण यज्ञयागादि ते व्यर्थ । कर्मग्रंथि दृढ होई तेणें ॥५॥ऐसें यमोक्त हें माहात्म्य भक्तीचें । वंदिती भक्तांतें यमदूत ॥६॥उपद्रव भक्तां देऊं नये कदा । निश्चय तयांचा दृढ होई ॥७॥राया, अगस्तींनीं मयलपर्वतीं । कथिला मजसी इतिहास हा ॥८॥वासुदेव म्हणे गूढ तो इतिहास । दावील जनांस भक्तिपंथ ॥९॥ N/A References : N/A Last Updated : November 08, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP