एकोणीस अक्षरी वृत्तें - अतिधृति

कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.


शार्दूलविक्रीडितम्‍ : -
( सूर्याश्वैर्मसजस्तता: सगुरव: शार्दूलविक्रीडितम्‍ ) -
मासाजासतताग येति गुण हे शार्दूलविक्रीडितीं ।
मारायास अणी जरी बसुनिया तो कृष्ण तें पाहुनी ।
चापा मोडुनियां गजासअ वधुनी माहातही मारुनी ॥
मल्लातें निवटोनि कंस वधिला रंगी तया भीडता ।
पाहाती हरिची रवीमुनियती शार्दूलविक्रीडिता ॥१३८॥
मी योध्दा समरी जसा असल तो त्या मारुतीला रणीं ।
ठोकीं रावण पुत्र अक्ष वदतांघ्रीतें धरी ते क्षणीं ।
त्यातें आपटुनी अमात्यसुतअ त्या घेवोनियां झाडतें ।
मारी किंकर ही अशी कपि शार्दूलविक्रीडितें ॥१३९॥
मोठे ते समयीं जरी असति ते ती पाहतां मोहिले ।
कृष्णें रुक्मिणि तेधवां उचलिली हें सैनिकें पाहिलें ॥
आले ते समरासि जिंकुनि तया श्यालास दे व्रीडता ।
दावी या परिची स्वयंवरि बरी शार्दूलविक्रीडिता ॥१४०॥
मारी रे समजा जिवेचि समरीं तीरेच तो येकटा ।
तैसे ते घटकर्णपुत्र वधिले नाणी मनी संकटा ।
क्रव्यादासह राक्षसेश वधिला देवव्दिजां पीडिता ।
दावी हे रघुवीर कोणपमृगां शार्दूलविक्रीडिता ॥१४१॥
सुवृत्ता : - रसर्त्वश्वैय्मौं न्सौ ररगुरुयुतौ मेघविस्फूर्जिता स्यात्‍  : -
सुवृत्ता जाणा यमनसररगीं मेघस्फुर्जिता वा ।
यमातें मानीम तो न कधिं सखया राघवाअ रामचंद्रा ।
तुझे पायीं निष्ठा म्हणुनि निरशी काममोहादि तंद्रा ॥
सदा कंठी नामावलि विहित हे नित्य जो आचरीतो ।
सुवृत्ताची चर्या धरुनि भवभी सर्वही ती हरी तो ॥१४२॥

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP