बारा अक्षरी वृत्तें - जगती

कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.


वंशस्थ : -
( जतौ तु वंशस्थमुदीरितं जरौ ) : -
घडेल वंशस्थ जताजरांनिं हो ।
जयास तें फार जनांत राहणें ।
वडील बोलेल तसेंहि साहणें ॥
सद्‍बुध्दि सद्‍वृत्तिंत नित्य लोभते ।
उदारवंशस्थ तुलाच शोभतें ॥७६॥
जिची पतीच्या भजनांत राहटी ।
घरांतुनी जाय कधीं न ती हटी ॥
पतिव्रता आणि उदारलक्षणी ।
पहावि वंशस्थभवा कजेक्षणी ॥७७॥
जिथें किती यत्न जनें करुनिया ।
चढावया येन हतीवरुनिया ॥
मधू बरा ज्यांत दिसेहि सांचला ।
मिळेल वंशस्थ महू पहा चला ॥७८॥
==
इंद्रवंशा : -
( स्यादिद्रवंशा ततजैरसंयुतै: ) -
ती इंद्रवंशा ततजार या गणीं ।
त्या गोपि त्याच्या भजनांत रंगल्या ।
तें पाहुनी देवि मनांत भंगल्या ॥
हें सौख्य आम्हां न जगांत पातल्या ।
कीं इंद्रवंशांतहि जन्म घॆतल्या ॥७९॥
तारापतीतुस्य जिचें वरांग तें ।
तीशी रमे नंदज बाळ रांगतें ।
राधा जिच्या दासि घृताचिमेनका ।
ती इंद्रवंशा दुहिता म्हणूं न का ? ॥८०॥
तीथी रती साधुजनांत राहती ।
आत्माच हा एक असेंच पाहती ॥
ज्यांचे कुळीं सत्पथ नित्य वागला ।
तो इंद्रवंशाहुनि वंश चांगला ॥८१॥
तारापतीतुल्य जयास रंग तो ।
अमौल्य जें मोति अभिज्ञ सांगतो ॥
तैशी अनेक प्रसवेच येकसा ।
तो इंद्र वंशांत म्हणू नये कसा ? ॥८२॥
==
द्रुतविलंबित : -
(द्रुतविलंबितमाह नभौ भरौ ) : -
द्रुतविलंबित नाभभरीं घडॆ ।
न धरि भीति उभा हरि राहिला ।
निरखुनी उठली तव पाहिला ॥
वडिल पाहिल येउं न दे कदा ।
द्रुतविलंबित शोभवि येकदां ॥८३॥
निजुनि भास्करभा स्वघरीं तिनें ।
उठलि पाहुनियां जव भीतिनें ॥
तंव अला हरि देखुनि राहिली ।
द्रुतविलंबित यास्तव पाहिली ॥८४॥
==
तोटक : -
( इह तोटकमंबुधिसै: प्रथितम्‍ ) :
म्हण तोटक चार सकार गणीं ।
सखया समयास अलास जरी ।
हरि लाज सभेंत तगेल तरी ॥
द्रुपदीस दिसे अजि मृत्युपरी ।
मग तो टक बांधुनि काय करी ? ॥८५॥
सुभटा समरीं स्ववया सरुं दे ।
यश पुष्कळ वीरगणीं भरुं दे ।
मर जाशिल भेटुनिया सविता ।
तरि तोटक होइल शोभविता ॥८६॥
==
पुट : -
( मुनिशरविरतिर्नौ म्यौ पुटोऽयम्‍ ) : -
पुट ननमययांनी होय तें गा ।
निखिल निगम माझ्या होय गाथा ।
सकलहि मम पायीं ठेवि माथा ॥
मजविण नहि कांही अन्य तें गा ।
मन पुट करि राहे त्यांत तें गा ॥८७॥

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP