मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|छंदोमंजरी|समवृत्तें| प्रतिष्ठा समवृत्तें उक्ता अत्युक्ता मध्या प्रतिष्ठा सुप्रतिष्ठा गायत्री उष्णिक् अनुष्टुप् अनुष्टुप् बृहती पंक्ति पंक्ति त्रिष्टुप् त्रिष्टुप् त्रिष्टुप् त्रिष्टुप् जगती जगती जगती शक्वरी प्रतिष्ठा अष्टि अत्यष्टि धृति अतिधृति कृति प्रकृति आकृति विकृति संस्कृति अतिकृति उत्कृति चार अक्षरी वृत्तें - प्रतिष्ठा कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय. Tags : grammermarathiमराठीवृत्तव्याकरण प्रतिष्ठा Translation - भाषांतर वसंततिलका ( सिंहोन्नता ) : - ( सिंहोन्नतेयमुदिता मुनिकाश्यपेन ) : -सिंहोन्नता वदिली ती मुनि काश्यपांनी ।ताटक भूषण जिला न जरी तरी ती ।पाहूनियाच हरिच्याहि मना हरीती ॥जीचा नितंब उर थोर कृशत्व माजी ।सिंहोन्नता दिसतसे युवतीसमाजी ॥११४॥तुष्टो न भीति तिजला ब्रजयोषितांत ।तोतें सुखें रमवि नित्य विरंचितात ॥राधा सुरद्रुमलताफळ येर पाला ।सिंहोन्नता म्हणुनि भासलि काश्यपाला ॥११५॥==वसन्ततिलका ( उध्दर्षिणी ) : ( उध्दर्षिणीयमुदिता मुनिसैतवेन ): -उध्दर्षिणी कथिलि ती मुनिसैतवांनीं ।ती त्या विभूसि भजतां रजनी पुरेना । कामाग्रिची लहरि थोर अली सरेना ।ऐसें व्रजीं सुख दुजीस न हेहि मानी ।उध्दर्षिंणी म्हणति देव तिला विमानीं ॥११६॥श्रृंगार सव करुनी वृषभानु कन्या ।सौंदर्यसद्गुणयुता युवतींत धन्या ॥कृष्णार्थ जाउनि बरी करि कुंजवास ।उध्दर्षिणी दिसलि त्या मुनिसैतवासे ॥११७॥==चंद्रावर्ता इयमेवशशिकला : - ( व्दिहतहयलघुरथ गिति शशिकला ): -ननननसिं घडल खचित शशिकला ।निशिं दिनिं भजन करिन परिस तरी ।तुजविण कवण मज अडवल तरी ॥सुतनुनयनमुखकुच भुलवि मला ।प्रतिदिवशिं जशि उगवति शशिकला ॥११८॥चंद्रावर्तोदाहरणं न दर्शितं तदर्थमार्येयम् ।अपवाहक आणि चंद्रावर्ता हें नाम तद्गणी न घडे ।यास्तव या नामाचे श्लोक करुनी न दाविले उघडे ॥११९॥==मणिगुणनिकर: - ( वसुहयरतिरिह मणिगुणानिकर : ) : -वसुहयतिं गणि मणिगुणनिकरा ।निज जन भजन कधिं मनिं ( नमि ) विसर ना ।हरि सुरवरवनिं सह नव ललना ॥निरखि नयनिं सखि तिसि रमत बरा ।हृदयिं धरि कनकमणिगुणनिकरा ॥१२०॥==मालिनी: - ( ननमयययुतेयं मालिनी भोगिलोकै: ): ननमयगणांनी होतसे मालिनी ती ।नयनिं निरखि माला होय जो कायधारी ।निज जन सुखकारी कंसदासी सुधारी ॥सहज निरसि ज्याचें नाम सर्वाघराशी ।मधुपुरिंत अला तो मालिनाच्या घराशीं ॥१२१॥नमिति निखिल मोठे राय ते पाय ज्याचे ।मिरविति सुर माथा पुंज की तद्रजांचे ।म्हणुनि पुजुं अतां त्या राधिकामेधनीला ।बहु परिमलपुष्पें मागती मालिनीला ॥१२२॥निधुवनिं सुख मोठें त्या यदूनायकातें ।म्हणुनि मुरलिनादें आणवी गोपिकातें ।उशिर किमपि होता जेविं वृक्षास भोगी ।कवळुनि वनिं तैसा मालिनीलाच भोगी ॥१२३॥नयनिं नळ उभेचा काय तो होय अर्धा ।चरणिं हरि तयाचे नित्य ठेवोनि मूर्धा ॥दशशतकमलांनी पूजितां त्या प्रवाही ।नयनचि जग व्यापी मालि नीलब्ज वाही ॥१२४॥निजति न धरिं मार्गीं बायका पायरीच्या ।जवाळे बसुनि माला गुंफिती मंजरीच्या ॥शतद्लकुसुमांच्या त्याहि नानापरीच्या ।बहुत कुशल ऐशा मालिनी पंढरीच्या ॥१२५॥निशित निघुनि मौनें पाय चिंती यदूचे ।सकलहि गुण गाती गोकुळीं फार तीचे ।शिकवि मधुर वाक्यें श्रीपती दूतिकेशी ॥प्रियसखि अण मुक्तामालिनी राधिकेशीं ॥१२६॥“ निजुनि निरखि मी ते माय जीची यशोदा ।कुवलयद्लनीला जे स्वभृत्या यशोदा ॥हळुच जवळि आली पाहिली नाहिं धूर्तीं ।तुळसिकमलजातीमालिनी कृष्णमूर्ती ॥१२७॥ N/A References : N/A Last Updated : March 02, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP