मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|छंदोमंजरी|समवृत्तें| पंक्ति समवृत्तें उक्ता अत्युक्ता मध्या प्रतिष्ठा सुप्रतिष्ठा गायत्री उष्णिक् अनुष्टुप् अनुष्टुप् बृहती पंक्ति पंक्ति त्रिष्टुप् त्रिष्टुप् त्रिष्टुप् त्रिष्टुप् जगती जगती जगती शक्वरी प्रतिष्ठा अष्टि अत्यष्टि धृति अतिधृति कृति प्रकृति आकृति विकृति संस्कृति अतिकृति उत्कृति दहा अक्षरीं वृत्तें - पंक्ति कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय. Tags : grammermarathiमराठीवृत्तव्याकरण पंक्ति Translation - भाषांतर शुध्दविराट् - ( म्सौ ज्गौ शुध्दविराडिदं मतम् ) - मासीं शुध्द विराट हें जगीं माझ्या या सखया जनाहुनी ।देतों दृष्टि उठेल पाहुनी ॥भ्याला अर्जुन अंग कापतें ।पाहे शुध्द विराटरुप तें ॥३४॥मानी जो सकला जनांस तो ।देवाच्या स्वरुपास नासतो ॥व्दैतातें सम सर्व मानुनी ।झाला शुध्द विराट हा मुनी ॥३५॥मानी जो सकला जना हरी ।ज्ञानें संचित भाव संहरी ॥जो स्वात्मानुभवांत राहिला ।तेणें शुध्दविराट पाहिला ॥३६॥मुद्रा जे समयीं जरी नसे ।स्पर्शेना तरि भस्म मानसें ॥मध्वाचार्यमतस्थ तो कसा ।पाहे शुध्दविराट तोकसा ॥३७॥==पणव : - (म्गौ य् गौ चेत् पणवनामकम् ): - मानांनी पणव घडे यांगीं ।मागेना न धनयवाशा कीं ।सेवेची हरि वरती बाकी॥स्वेच्छेनें मिळल तसें घेतो ।त्यातें सेवुनि पणवो देतो ॥३८॥मोहाशा न धरि यदुश्रेष्ठा ।चित्ती आठविच बरी निष्ठा ॥साधूसेवनिं झिजवी देहा ।तत्कर्ती पणवचि वाजे हा ॥३९॥==रुक्मवती : - (भ्मौ सगयुक्तौ रुक्मवतीयम् ): - भामसगांनी रुक्मवती हे ॥भूषणं माथापासुनि तीचें ।भास्वररत्नें युक्त सतीचें ॥हेमभ राधा स्वर्णनगांनीं ।रुक्मवती ती गायलि गानीं ॥४०॥भाव न माझें ज्यास तुझे हा ।श्रीपतिपायीं अर्पितदेहा ॥जो सम मानी तिक्तमधूतें ।रुक्मवती कीं रिक्त वधूतें ॥४१॥भूपति मानी ज्यास गुरुसा ।श्रीपति रक्षी मानुनि दासा ॥भारति वक्त्री त्या सुमतीतें ।होइल पत्नी रुक्मवती ते ॥४२॥ N/A References : N/A Last Updated : March 02, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP