अकरा अक्षरी वृत्तें - त्रिष्टुप्

कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.


एकरूपम्‍
( समर्जी गलिं तेचं एकरुप )
सुमना सरळी जरी मतीस ।
धरसील न होय काम तीस ॥
सखि लोपति दृष्टजे पसारे ।
मग पाहसि एकरुप सारें ॥४९॥
==
इंद्रवज्रा: -
( स्यादिंद्रवज्रा यदि तौ जगौ ग: ) - ती इंद्रवज्रा ततजागगांनी ।
ती ऐकतां वेणु जगन्निवासा - ।
पाशीं अली धावुनिया सुवासा ॥
तीतें म्हणे जा न भजें तुला गे ।
तो इंद्रवज्रापरि शब्द लागे ॥५०॥
तो वृत्र तेव्हां गजवज्रशक्रा ।
प्राशी जसा आंध्रज विप्र तक्रा ॥
तत्पोट फोडी नधरई भयासी ।
घे इन्द्र वज्रास हणी तयासी ॥५१॥
==
उपेन्द्रवज्रा: -
(उपेंद्रवज्रा जतजास्ततो गौ. ) - उपेंद्रवज्रा जतजागगांनीं ।
जया न ते कांहिं जनान ठावा ।
वधू तया धाडि करी उठावा ॥
कुंचेल तो त्यात बसावयास ।
उपेन्द्र वज्रासन दे तयास ॥५२॥
जयास तोषे भजतो तयासी ।
समृध्दि देवोनि हरी भयासी ॥
निजास जा हो वसुधेव हिसा ।
उपेन्द्र वज्रापरि तोच कंसा ॥५३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP