चौदा अक्षरी वृत्तें - शक्वरी

कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.


अपराजिता : -
( ननरसलयुगै: स्वरैरपराजिता ) : -
ननरसलगीं होतसे अपराजिता ।
निधुवन अचरावयास निघालि ती ।
कनकनग अणोन फारचि घालिती ॥
स्मरशरनिहृता निजे रदमंचकीं ।
युवतिनिं अपराजिता परवंचकी ॥१०९॥
==
प्रहरणकलिता: -
( ननभनलघुगै: प्रहरणकलिता ) : -
ननभनलगिं ती प्रहरणकलिता ।
निशिं दिनिं रिपुभें म्हणुनि जरि तिला ।
आठवि सतत जो विषधरसतिला ॥
अवन करि तरी जशि जननि पिता ।
रिपुकुलकुपिता प्रहरणकलिता ॥११०॥
==
वसंततिलका : -
( उक्ता वसंततिलका तभजा जगौ ग ) : -
येती वसंततिलकीं तभजाजगागा ।
तारेशभा समजतां व्रजराज रानीं ।
येतां असा निरखिला गगनीं सुरांनी ॥
टाकी किरीटककांगदहार राया ।
घेतो वसंततिलकास शिरीं धराया ॥१११॥
तो देत भोजन जयास जगीं मिळेना ।
सद्‍बुध्दितें शिकवि तसें न धरी भयास ।
हा देव संततिल कां न म्हणूं तयास ॥११२॥
तांबुल भक्षुनि जिला निजतां हरीची ।
झाली स्मृती तव उठे त्यजुनी घरीची ।
राधा निघे त्वरित रात्रिंत जावयास ।
त्या देवसंततिलकास अणावयास ॥११३॥

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP