मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|छंदोमंजरी|समवृत्तें| अत्यष्टि समवृत्तें उक्ता अत्युक्ता मध्या प्रतिष्ठा सुप्रतिष्ठा गायत्री उष्णिक् अनुष्टुप् अनुष्टुप् बृहती पंक्ति पंक्ति त्रिष्टुप् त्रिष्टुप् त्रिष्टुप् त्रिष्टुप् जगती जगती जगती शक्वरी प्रतिष्ठा अष्टि अत्यष्टि धृति अतिधृति कृति प्रकृति आकृति विकृति संस्कृति अतिकृति उत्कृति सतरा अक्षरी वृत्ते - अत्यष्टि कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय. Tags : grammermarathiमराठीवृत्तव्याकरण अत्यष्टि Translation - भाषांतर हरिणी: ( रसयुगहयैर्न्सौ स्लौ गो यदा हरिणी तदा ) : -नसमरसलागांनी जाणा घडे हरिणी सदा ।नय विसरला मातें जो रानिं या सरितातटी ।बसुनि शरचापातें ( पाही ) हणील दिसे हटी ॥स्वगण न दिसे कोठें जावें असें न तिला कळे ।न धरुनि भया त्यातें टाकोनि ती हरिणी पळे ॥१२९॥पृथ्वी : ( जसौ जसयलावुसुग्रहयतिश्च पृथ्वी गुरु: ) : -जसाजसयलांनिं ही घडतसेचि पृथ्वी पहा ।जनांस समजे जरी वसतिला यशोदे घरीं ।खराच हरि हा अला असुर मर्दनाला परी ॥व्रजांत नरनारिला बहुत हर्ष झाला असे ।धनें बहुत गोधनें करुन युक्त पृथ्वी दिसे ॥१३०॥==वंशपत्रपतितम् : - ( दिड् मुनिवंशपत्रपतितं भरनभैर्नलगै: ) : -होइ भारनभानागिं वंह्सपत्रपतित तें ।भारति राजसी निपुण भामिनी नयन जशी ।भाविक मोहिनी सरसयुक्त ही भुलवि तसी ॥मेघजवृष्टि हस्तजनित जरि जहलि नसे ।शेवटिं जाहली विफल वंशपत्र पतितसें ॥१३१॥==मंदाक्रान्ता : - ( मंदाक्रांताजलधिषडगैर्म्भौनतौताद्गुरु चेत् ) : -मंदाक्रान्ता मभनततगागानिं ती होय जाणा ।मृद्वंगी भ्रू मदनधनु तें चालतें नागरीती ।शब्दी सारी लगुकुचवती कांति हेमा हरी ती ॥पाजोनी वैकृतरस मुनी जिंकिले भिक्षु जीनें ।मदाक्रांता प्रथम सुरतीं राधिका कृष्णजीनें ॥१३२॥मोठी शोभा म्हणुनि जरि तूं पाहतोसी स्वहेहा ।भूषावस्त्रद्रविणतनुजस्त्रीसहायादि देहा ॥लाभस्थानीं दिविंचर तया सत्फलें सर्व होती ।मंदाक्रांती तनु असलिया ता विनाशास जातीं ॥१३३॥==शिखरिणी: - ( रसै रुद्रैश्छिन्ना यमनसभलाग: शिखरिणी ) : -गुरु अन्तीं आणि यमनसभलांनीं शिखरिणी ।यशानें मा तैशा निघति सकव्ला भाव धरुनी ।सदन्नें अर्पाया व्दिजयुवति देवास करुनी ॥करीं पात्रें पंक्तीमधुनि फिरती जेविं करिणा ।दधिक्षिराज्यान्नें म्हणति हरि घे ही शिखरिणी ॥१३४॥यशस्वी मांसें ही नयनसुखदे भ्रातृजननी ।गुरुहस्त्यश्वासृक् शुभ शकुन हें दुष्ट अधनी ॥खळास्थी धूम्राग्री शरटभुजगव्याघ्रहरिणी ।यती लिंगी शत्रू मलिन विधवा वैशिख रिणी ॥१३५॥यतीतें मानेना नय न समजे भाग्यहि नसे ।बहू भक्षी विद्या न करुनि उगा जो फिरतसे ।बरी निद्रा घेतो न शुभ अवडे पूर्वजरिणी ।समा योषा होते समयिं करिणी त्या शिखरिणी ॥१३६॥ N/A References : N/A Last Updated : March 02, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP