मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|छंदोमंजरी|समवृत्तें| जगती समवृत्तें उक्ता अत्युक्ता मध्या प्रतिष्ठा सुप्रतिष्ठा गायत्री उष्णिक् अनुष्टुप् अनुष्टुप् बृहती पंक्ति पंक्ति त्रिष्टुप् त्रिष्टुप् त्रिष्टुप् त्रिष्टुप् जगती जगती जगती शक्वरी प्रतिष्ठा अष्टि अत्यष्टि धृति अतिधृति कृति प्रकृति आकृति विकृति संस्कृति अतिकृति उत्कृति बारा अक्षरी वृत्तें - जगती कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय. Tags : grammermarathiमराठीवृत्तव्याकरण जगती Translation - भाषांतर वैश्वदेवी: - ( पञ्चाश्वैच्छिन्ना वैश्वंदेवी ममौ यौ ) मामायायांनी वैश्वदेवी घडे ती ॥मेल्या कामातें काय देतो यशस्वी ।ज्याला प्रीतीनें आवडे तो मनस्वी ॥त्रैलोक्याचा स्वामी करी व्दारका ही ।लोकाचारानें वैश्वदेवी क्रियाही ॥९५॥==नवमालिनी : - ( इह नवमालिका नजभयै: स्यात् ) : बघ नवमालिनी नजभयीं ती न धरि जनाचि भीड भय नाहीं ।नदितटि जाउनी युवति पाही ॥व्रजिं बहु घेतसे सुरतलाहो ।हरि नवमालिनीसि रमला हो ॥९६॥नमुनि जयाशि भूरिभय नाशी ।स्मरुनि सदैव तोषवि मनाशीं ॥निजजनकाम पूरवि हरी तो ।वनिं नव मालिनीसचि धरीतो ॥९७॥प्रहर्षणी : - ( म्नौ ज्रौ गस्त्रिदशयति: प्रहर्षणीयम् ) : -मानावी मनजरगीं प्रहर्षणी ती ।मोठें तें नयन जरी हरी पहाती ।ते साधू खलजनशब्द ते सहाती ॥वाणी वर्णिल जीरअ सच्छिरोमणीतें ।जाणावी त्रिदशयतिप्रहर्षणी ते ॥९८॥मातें तो नृहरि जसा बरा तसाच ।वाटेना इतर सुरेश हेंच साच ।कोपिष्ठा नहि पयसिध्दता उणीही ।बाळातें जननि तरी प्रहर्षणी ही ॥९९॥मांडे पानक सजुरी शिरा करंजी ।पोळया बेसन घृत दुग्ध खंड भाजी ॥लडू तें तिखट चरु दहीं भरीतें ।हो भुक्ति बहु वरि विप्रहर्षणीतें ॥१००॥==रुचिरा: - ( चतुर्ग्रहैरतिरुचिरा जभस्जगा: ) : -जभासजागनिं रुचिरा म्हणा सदा ।जया सभा बहुसदनें जशी तशी ।गजा हृयास ग गणना गुरें म्हशी ॥जगांत तो सुखधनयुक्त तो तरी ।भलीच कामिनि रुचिरा असे जरी ॥१०१॥==मत्तमयूरा : - ( वेदैरंध्रैर्म्तौ यसगा मत्तमयूरम् ) : -मातायासार्गी घडते मत्तमयूरा ।मातें काता सांडियलें या समयाशीं ।मारी बाणा काम शकें जिंकुं न याशी ।हाका मारी जाणुनि केल्या अपराधा ।कुंजामध्यें मत्तमयूरापरि राधा ॥१०२॥मातें खातो नक्रयम त्रास महा हा ।होतो कृष्णा सोडविं वेगें मज हा हा ॥दीनोंव्दारा धरिसि आतां परिकें कां ।मातंगाची मत्तमयूरापरि केका ॥१०३॥माता भ्राता तूं भय नाशी सखया जी ।गेले स्नाना विप्र तयां अन्न न भाजी ॥आतां देती शाप सहसी वनिं कृष्णा ।हाका मारी मत्तमयूरापरि कृष्णा ॥१०४॥माझे कांते हें वय जातें सखये गे ।सीते सीते निष्ठुरता टाकुनि ये गे ॥कोठें गेली सांग नगा नाहिं अराम ।शोकें बोले मत्तमयूरापरि राम ॥१०५॥मारायातें धाडियले या सकलांसी ।मातें द्याया वन्हिविषें पात गळासी ॥श्रीज्ञा धावें वाचविं येथें निरवाणी ।प्रल्हादाची मत्तमयूरासम वाणी ॥१०६॥मातेनें तो ताडियलें वा समयासी ।होता तोही निर्दय माया न तयासी ।ऐसें देवातें ध्रुव आडें स्थळमार्गे ।दु:खें रानीं मत्तमयूराहुनि रागें ॥१०७॥मोजीना तो निर्भय मारी सकळांसी ।अस्मच्छत्रू रावण दावी स्वबलासी ॥सौमित्नि हा व्याकुळ कीं मारुति यासी ।दे तोषातें मत्तमयूरा घन होसी ॥१०८॥ N/A References : N/A Last Updated : March 02, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP