बारा अक्षरी वृत्तें - जगती

कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.


जलोध्दतगति : -
( रसैर्जसजसा जलोध्दतगति : ) : -
घडे जसजसीं जलोध्दतगति ।
जनाचि सखि लाज ही विसरली ।
पतिव्रतपणांतुनी घसरली ॥
नसे नवल ऐकतांच मुरली ।
जलोध्दतगती परंतु फिरली ॥८८॥
==
भुजंगप्रयातम्‍ : -
( भुजंगप्रयातम्‍ भवेद्यैश्चतुर्भि: ) -
यचारीं घडें तें भुजंगप्रयात ।
यदुनायका बायका पाय दावा ॥
अम्ही कृत्निमी हा मनीं नाणिं दावा ॥
तुझे ठायिं चित्तें सुवृत्तें पहा तीं ख।
भुजंगप्रयातें ऋजू रंध्रि होतीं ॥८९॥
यदुंची यशें नायके काय नाचे ॥
बहू तर्क होती जयाच्या मनाचे ॥
न तो साधु संसारि ज्याची प्रवृत्ती ।
भुजंगप्रयातें तशी चित्तवृत्ती ॥९०॥
यभें ही यश: प्राय ती आयकावीं ॥
हरीची वरीं कीर्तिपद्यें शिकावीं ॥
असें सांगतां नायके विप्र जातें ।
सुवृत्तें न जैसी भुजंगप्रयातें ॥९१॥
==
स्रग्विणी: -
( रैश्चतुर्भिर्युता स्रग्विणी संमता ) :
चार रेफांनी ती होतसे स्रग्विणी ।
राधिका रात्रिं दारीं उभी राहिली ।
श्रीधरानें शरत्कालिं ती पाहिली ॥
पूर्णचंद्रानना ध्वांतविद्राविणी ।
पूर्णभासीव मुक्ताफलस्रग्विणी ॥९२॥
राघवें रावणा राक्षसा रोधिलें ।
बाण सांडोनि त्याचें शिरच्छेदिलें ॥
तें पहायास येती स्त्रिया त्या रणीं ।
अश्रुबिदुंनि मंदोदरी स्रग्विणी ॥९३॥
==
प्रमिताक्षरा: -
(प्रमिताक्षरा सजससैरुदिता ):
प्रमिताक्षरा सजससीं घडते ।
सकला जनास सुखदा सरसा ।
रविभव सद्‍ धृदयतामरसा ॥
हरिवागसी पढ भवाब्धि रिता ।
प्रमिताक्षरा करिल उचरितां ॥९४॥

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP