TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|कीर्तन आख्यान|
साक्रेटीसचें चरित्र

साक्रेटीसचें चरित्र

कीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.


साक्रेटीसचें चरित्र
येथील प्रार्थनासमाजानेही हा क्रम अंशत: चालू केला आहे. त्याप्रमाणे यंदाच्या चातुर्मास्यांत गेल्या दोन एकादशांस प्रार्थनासमाज मंदिरात दोन कीर्तने झाली. पहिले कीर्तन रा. रा. वामनराव आबाजी मोडक यांनी प्रसिद्ध महाराष्ट्रभक्त सोहिरोचा आंबियेकृत पदापैकी खालील पदांच्या आधारे केलें :-
हरिस्मरण विस्मरण तरि तुझे काय जिणेरे असून ॥धृ॥
स्वार्थचि साधिसी सार्थक नेणसी कोणासि पाहि तरी पुसून ॥
पुढे नाही गती मलिन झाली मति साधुचि संगति नसून ॥१॥
रती विलासी लंपट होसी मानस गेलें डसून ॥
लवकर सरकी  पडसिल नरकीं फुकट मरसिल कुसून ॥२॥
आळशि कामा उगा रिकामा थटाचि करिशी बसून ॥
कुकर्माच्या कांही वर्माच्या गोष्टी सांगसि कसून ॥३॥
शरीर फिरवी तुजला मिरवी देव असे रे रुसून ।
जवळि असुनि तुझे हृदयीं वसून भगवंत न ये दिसून ॥४॥
म्हणे सोहिरा गुरुनाथ हा माझ्या हृदयीं घुसून ॥
जनासि उद्धरावया कारणें वचन सांगतो ठसून ॥
वरील पदाचे विवेचन करितांना बुवांनी रामदासकृत दासबोध भगवद्गितादि ग्रंथातून आधार घेऊन कीर्तनाचा  पूर्वभाग संपविला. आणि शेवटी ग्रीस देशांतील  प्रसिद्ध महापुरुष साक्रेटीस यांचे चरित्र लाविले होते. या चरित्रातील पदरचना रा. मोडक यांनी आयत्यावेळी अगदी नवीन केली असून ती बरीच प्रेमळ व स्वाभाविक अशी झाली असल्यामुळे ती जशीच्या तशी सर्व येथें दिली आहे. --- सुबोध पत्रिका.

आर्या --- झाला ग्रेकी देशीं साकृति नामा महामना ज्ञानी ।
सुविशुद्ध चरित ज्याचे प्रेरी कविमन तदीय गुणज्ञानी ॥१॥
श्लोक--- संतासि स्वान्त:करण प्रवृत्ति । प्रमाण ऐशी कविराय उक्ति ॥
ज्याच्या चरित्रीं सुयथार्थ वाटे । स्मरोनियां तद्यश प्रेम दाटे ॥१॥
आर्या - जो बाह्य संपदेते क्षुद्र गणुनि आत्मसंपदा जोडी ॥
न तया यश लाभाची तैशी जसि ज्ञानप्राप्तिची गोडी ॥१॥
गांभीर्ये उदचीसम धैर्ये गिरिसा धरासम क्षमेने ॥
वाटे लाजवेइ तद्यश विबुध यशालाहि स्वीय उपमेनें ॥२॥
शब्डज्ञाने मोहित जन सारज्ञानी व मुख सरळ असें ॥
पाहुनि नित्य तयांते बोधी हित धर्मनय दुजे न तसें ॥३॥
इतर सकल ज्ञान विफल जो आत्मज्ञान लाधले लाधले नाही ॥
ते जोडावे यत्ने सतत विवेकें करोनि सुजनां हीं ॥४॥
सृष्टिज्ञाना परिसहि मज नीतिज्ञान वाटतें थोर ॥
जेणें शुद्ध क्रियत्वें आत्मगतीचा टळे सकळ घोर ॥५॥

श्लोक ---- बोधूनि ऐकें सकलां जनातें । यथार्थ ज्ञानी वळवी मनातें ।
ज्ञान भ्रमा शोधुनि तत्वचिंता । लावी कराया जनसंघचित्त्ता ॥१॥
जिज्ञासुभावें सुविनम्र वाचे । संभाषणे जाड्य हरी जनांचे ॥
सुबुद्धिचा पूर्ण विकास व्हाया । परोपकारार्थचि साधुकाया ॥२॥
मन: कायवाचा विवेकानुरोवें । सदा वर्तती उज्वले ज्ञानबोधे ॥
जयाची नकां तो वेवेकांसि मानी । म्हणे कीं मला बोधि हे देववाणी ॥३॥

स्त्री त्याची क्रूरमती तोहि उदासीन परम संसारी ॥
म्हणुनि तया अपशब्दे ताडि परि कधिं तिला न तो वारी ॥२॥
मित्र विनोदें पुसती कां वरिली कर्कशा अशी जाया ॥
हांसुनि म्हणे तितिक्षा बहु अन्याये गृहांतचि शिकाया ॥२॥

ओंव्या --- या परि केलिया कांही काळ । जन दुराग्रही म्हणती सकळ ॥
कीं हा अमुचा करितो छळ ॥ वाग्जाळ आपुले पसरोनी ॥१॥
विपरीत बुद्धि बालकजनां । शिकवूनि भ्रष्ट करी तन्मना ॥
नवींच कल्पोनि दैवतें नाना । निंदी आमुच्या देवांतें ॥२॥
म्हणे सूर्यचंद्र नव्हती देव । हीं देवळ मंडळे जडस्वभाव ॥
ऐसे सांगूनि चाळवी भाव । जड मूढ बालकाचा ॥३॥
या परी गार्‍हाने करिती दुर्जन । तें ऐकोनि अधिकारीजन ।
म्हणती यासी देहान्तशासन । करोनि राष्ट्र रक्षावे ॥४॥
साकी --- जाउनि न्यायसभेस साकृती कळवी आपुले वृत्त ॥
कां मज वैरी छळिती मजवरी कोपुनि काय निमित्त ॥१॥
दिंड्या --- सरळ सब्दें कळविलें वृत्त साचे। विमल भावे प्रेरिले जेवि वाचे ॥
भय न चित्ती वाटले लेश त्याला । सत्यनिष्ठेने शांति यन्मनाला ॥१॥
पुसति न्यायाधिश तै साकृतीला ॥ योग्य शिक्षा कोणती तव कृतीला ॥
म्हणे लोकहिता वेंचिती काळ सारा न कधि चित्ती मी कुटूंबभारा ॥
पुढें न पडावी कांही मला चिंता ॥ करा ऐशी योजना काहीं आता ॥
करीन निश्चितमनें बोध नित्य लोका ॥ हीच शिक्षा मज योग्य कीं विलोका ॥३॥

साकी --- ऐकुनि उत्तर कोपति त्यावर न्यायाधिश अनेक ॥
म्हणती विषप्राशन शासन या योग्य असे कीं एक ॥१॥
श्लोक --- ऐकोनि तो निर्णय त्या सभेचा । बोले महात्मा नच खेद याचा ।
येणार तो मृत्यु कधी टळेना । कर्तव्यमार्गी स्थिरधी चळेना ॥१॥
श्लोक --- आत्मानात्म विचार सार करुनि शिष्यांसवे सर्वदा ॥
आनंदे मरणावधी दिन कमी मानी न तो आपदा
संतोषे विषपात्र सेवन करी कीं होय पीयूषते ॥
दैन्ये जीवन कष्ट तेंचि निधन प्रज्ञाप्रती भासतें ॥२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-12-06T20:12:46.9000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

frozen mercury process

  • गोठित पारा प्रक्रिया 
RANDOM WORD

Did you know?

हल्ली महिला पौरोहित्य करतात हे धर्मसंमत आहे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site